11:04pm | Oct 09, 2019 |
मेढा : जावली तालुक्यातील देवस्थान जमिनीच्या सातबाऱ्यावरील शिक्क्याचा विषय शिवेंद्रसिंहराजे आणि आम्ही एकत्र बसून मिटवण्यासाठी कटिबद्ध आहोत, असे प्रतिपादन श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले यांनी केले. दरम्यान विकासकामे करताना आम्ही कधी राजकारण करत नाही. मात्र आम्ही जांच्याबरोबर होतो त्यांनी केवळ आमचा वापरच केला, अशी टीका त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस वर केली.
महायुतीतील लोकसभा पोटनिवडणुकीचे भाजपचे अधिकृत उमेदवार श्री.छ.उदयनराजे भोसले व विधानसभेचे उमेदवार शिवेंद्रराजे भोसले यांच्या प्रचारार्थ मेढा ता.जावली येथील मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. त्याप्रसंगी श्रीमंत शिवेंद्रराजे भोसले, माजी आ. सदाशिव सपकाळ,माजी शिक्षण सभापती अमित कदम,जि.प. सदस्या सौ. अर्चनाताई रांजणे,मेढ्याच्या नगराध्यक्ष सौ.द्रोपदा मुकणे, विधानसभा संपर्कप्रमुख एकनाथ ओंबळे,पांडुरंग जवळ,रिपाईचे तालुकाध्यक्ष एकनाथ रोकडे, युवानेते ज्ञानदेव रांजणे,भाजपा जिल्हा उपाध्यक्ष बुवासाहेब पिसाळ, सुनील काटकर, बाळासाहेब गोसावी, सयाजी शिंदे आदी उपस्थित होते.
उदयनराजे भोसले म्हणाले, गेल्या निवडणूक प्रचारावेळी आम्ही सातबाऱ्यावरील शिक्के काढण्याचे आश्वासन दिले होते. मात्र तीन महिन्यात राजीनामा दिल्याने हा विषय मिटवता आला नाही. मात्र शिवेंद्रसिंहराजे आणि माझी या विषयावर चर्चा झाली असून निवडणूक प्रक्रिया झाल्यानंतर हा विषय तात्काळ मिटवला जाईल. त्यासाठी संबंधित गावात कमिटी नेमून हा विषय मिटवला जाईल.
युवक व बेरोजगारांची आर्थिक उन्नती उंचावण्यासाठी जावलीत अनेक महत्त्वकांक्षी प्रकल्प होणे गरजेचे आहे. यासाठी शिवेंद्रराजे यांच्यासारखा तुम्हाला जपणारा चांगला नेता मिळाला आहे. जावळीला गतिमान नेतृत्व लाभल्याने मतदारसंघाचा अधिक विकास झाला आहे. बाबाराजेंनाही येथील जनतेचे मोठे पाठबळ लाभत आहे. आमच्यामुळे तुम्ही नसून तुमच्यामुळे आम्ही आहोत,हीच जाण ठेवून जावलीचा विकास करणार आहे. आम्ही दोघे आज किंवा भविष्यात कधीही राजकारण न करता आपणा सर्वांना बरोबर घेऊन विकासकामे करणार आहे,अशी ग्वाही यावेळी उदयनराजेंनी दिली.
श्रीमंत शिवेंद्रसिंहराजे भोसले म्हणाले जावली तालुक्यातील प्रत्येक वाडीवस्तीमध्ये विकास कामे पोचून अनेक सर्वसामान्यांचे प्रश्न मार्गी लावली आहेत. येथील बोंडारवाडी धरणासारखे अनेक महत्त्वकांक्षी प्रकल्प भाजपाच्या माध्यमातून तडीस नेण्यासाठी मी कटिबद्ध आहे. तसेच कुसुंबी मार्गे रस्ता डांबरीकरण करून मेढा भाग हा कोयनेशी जोडल्याने लोकांच्या सुविधा उपलब्ध झाल्या आहेत. सरकारच्या माध्यमातून पुढील पाच वर्षात उर्वरित विकासकामे करून मतदारसंघाचा विकास व प्रश्नांना प्राधान्य देऊ.
दरम्यान दोन्ही राज्यांच्या प्रचारार्थ शहरातून ढोल-ताशांच्या गजरात व फटाक्यांची आतिषबाजी करत भव्य रॅली काढण्यात आली. यावेळी जावळीतील अनेक कार्यकर्ते,पदाधिकारी व नागरिक,महिला बहुसंख्येने उपस्थित होत्या. यावेळी ज्येष्ठ कार्यकर्ते रवी परामणे, योगेश गोळे,सौ.कविता धनवडे, विकास देशपांडे, विजय शेलार,सचिन जवळ, रामभाऊ शेलार, सौ.जयश्री पवार,कांतीभाई देशमुख, शिवाजीराव मर्ढेकर आदी उपस्थित होते.
सातारा जिल्ह्यात तब्बल पन्नास हजार नवमतदार |
स्व. यशवंतराव चव्हाण यांना भारतरत्न देण्याची मागणी पंतप्रधान मोदींकडे करणार |
कराड तालुक्याच्या विकासासाठी एकत्र प्रयत्न करूया: खा. उदयनराजे भोसले |
खोऱ्याने मते घेणाऱ्या नेत्यांनी केले पाटण खोऱ्याकडे दुर्लक्ष |
सातारा जिल्ह्यातील दोन पोलिस अधिकाऱ्यांसह ११ जणांना महासंचालक सन्मानचिन्ह जाहीर |
सांगलीच्या सिंचनासाठी मागणी झाली कमी |
पोटात चाकू भोसकून एकाला जिवे मारण्याचा प्रयत्न |
ठोसेघर येथे एकाचा डोक्यात दगड घालून निर्घृण खून |
उंच भरारी योजनेचे ब्रँन्ड ऍम्बेसिडर म्हणून मोनिका राठी तसेच सौरभ भोसले यांची निवड |
केट्स पॉईंट वरुन आत्महत्त्या केलेल्याचा मृतदेह दरीबाहेर काढण्यात यश |
शेंद्रे येथील तिहेरी अपघात प्रकरणी तिघांवर गुन्हा |
सुमारे अडीच लाखांच्या बांधकाम साहित्याची चोरी |
एकास मारहाण केल्याप्रकरणी पाच जणांवर गुन्हा |
सातार्यातून युवक बेपत्ता |
नागठाण्यात युवकाची आत्महत्या |
सांगलीच्या सिंचनासाठी मागणी झाली कमी |
पोटात चाकू भोसकून एकाला जिवे मारण्याचा प्रयत्न |
ठोसेघर येथे एकाचा डोक्यात दगड घालून निर्घृण खून |
उंच भरारी योजनेचे ब्रँन्ड ऍम्बेसिडर म्हणून मोनिका राठी तसेच सौरभ भोसले यांची निवड |
केट्स पॉईंट वरुन आत्महत्त्या केलेल्याचा मृतदेह दरीबाहेर काढण्यात यश |
शेंद्रे येथील तिहेरी अपघात प्रकरणी तिघांवर गुन्हा |
सुमारे अडीच लाखांच्या बांधकाम साहित्याची चोरी |
एकास मारहाण केल्याप्रकरणी पाच जणांवर गुन्हा |
सातार्यातून युवक बेपत्ता |
नागठाण्यात युवकाची आत्महत्या |
उदयनराजे यांना मतदान करून गादीचा सन्मान ठेवा |
जपानचे स्लिम लँडर तिसऱ्यांदा जागृत |
कोल्हापुरातील अंबाबाईच्या रथोत्सव |
छत्रपतींच्या वंशजांना जावळीचा स्वाभिमान सांगू नका |
माझ्याकडे विरोधकांच्या अनेक भानगडी |