सातारा : सातारामधील करंजे येथे घरफोडी केल्याप्रकरणी शाहूपुरी पोलिसांनी दोघांना अटक केली. चोरीला गेलेला 64 हजार रुपये किंमतीचा सर्व ऐवज जप्त केला. दरम्यान, संशयितांमध्ये मुंबई, मानखुर्द येथील सोनाराचाही समावेश असून पोलिस संशयितांकडे कसून चौकशी करत आहेत. दत्ता उत्तम घाडगे (रा.करंजे) व जयसिंग उर्फ विनोद तुकाराम केदार (रा.मानखुर्द, मुंबई) अशी दोन्ही संशयितांची नावे असून यातील केदार हा सोनार आहे. दरम्यान, या चोरीप्रकरणी तुळशीराम गणपत चव्हाण (वय 61, रा,करंजे, सातारा) यांनी दि. 6 मे रोजी घरफोडी झाल्याबाबत शाहूपुरी पोलिस ठाण्यात तक्रार दिली होती.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, 5 मेला तक्रारदार तुळशीराम चव्हाण हे घराला कुलुप लावून दरवाजा लगतच किल्ली बाजूला ठेवून बाहेर पडले होते. यावेळी अज्ञाताने संबंधित घराची किल्ली ताब्यात घेवून घरातून रोख रकमेसह सोन्याचे दागिने असा एकूण 64 हजार रुपयांचा ऐवज चोरी केला होता. पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाल्यानंतर शाहूपुरी पोलिस ठाण्याचे पोलिस हवालदार किशोर जाधव व जयराम पवार यांना संशयित चोरट्याबाबतची माहिती मिळाली.
शाहूपुरी पोलिसांनी संशयित दत्ता घाडगे याला ताब्यात घेतल्यानंतर त्याने चोरीची कबुली दिली. सोन्याच्या दागिन्याबाबत चौकशी केल्यानंतर त्याने ते सोने विनोद केदार या सोनाराला मुंबई येथे विकले असल्याचे सांगितले. अखेर पोलिसांनी दोघांकडे चौकशी करुन सर्व मुद्देमाल जप्त केला. पोलिस अधीक्षक संदीप पाटील, पोलिस उपअधीक्षक डॉ.खंडेराव धरणे यांच्या मार्गदर्शनाखाली पोनि किशोर धुमाळ, पोनि चंद्रकांत बेदरे, पोलिस हवालदार किशोर जाधव, जयराम पवार, प्रवीण गोरे, लैलेश फडतरे, अमित माने, स्वप्नील कुंभार, मोहन पवार, पंकज मोहिते यांनी कारवाईमध्ये सहभाग घेतला.
सातारा जिल्ह्यात तब्बल पन्नास हजार नवमतदार |
स्व. यशवंतराव चव्हाण यांना भारतरत्न देण्याची मागणी पंतप्रधान मोदींकडे करणार |
कराड तालुक्याच्या विकासासाठी एकत्र प्रयत्न करूया: खा. उदयनराजे भोसले |
खोऱ्याने मते घेणाऱ्या नेत्यांनी केले पाटण खोऱ्याकडे दुर्लक्ष |
सातारा जिल्ह्यातील दोन पोलिस अधिकाऱ्यांसह ११ जणांना महासंचालक सन्मानचिन्ह जाहीर |
सांगलीच्या सिंचनासाठी मागणी झाली कमी |
पोटात चाकू भोसकून एकाला जिवे मारण्याचा प्रयत्न |
ठोसेघर येथे एकाचा डोक्यात दगड घालून निर्घृण खून |
उंच भरारी योजनेचे ब्रँन्ड ऍम्बेसिडर म्हणून मोनिका राठी तसेच सौरभ भोसले यांची निवड |
केट्स पॉईंट वरुन आत्महत्त्या केलेल्याचा मृतदेह दरीबाहेर काढण्यात यश |
शेंद्रे येथील तिहेरी अपघात प्रकरणी तिघांवर गुन्हा |
सुमारे अडीच लाखांच्या बांधकाम साहित्याची चोरी |
एकास मारहाण केल्याप्रकरणी पाच जणांवर गुन्हा |
सातार्यातून युवक बेपत्ता |
नागठाण्यात युवकाची आत्महत्या |
सांगलीच्या सिंचनासाठी मागणी झाली कमी |
पोटात चाकू भोसकून एकाला जिवे मारण्याचा प्रयत्न |
ठोसेघर येथे एकाचा डोक्यात दगड घालून निर्घृण खून |
उंच भरारी योजनेचे ब्रँन्ड ऍम्बेसिडर म्हणून मोनिका राठी तसेच सौरभ भोसले यांची निवड |
केट्स पॉईंट वरुन आत्महत्त्या केलेल्याचा मृतदेह दरीबाहेर काढण्यात यश |
शेंद्रे येथील तिहेरी अपघात प्रकरणी तिघांवर गुन्हा |
सुमारे अडीच लाखांच्या बांधकाम साहित्याची चोरी |
एकास मारहाण केल्याप्रकरणी पाच जणांवर गुन्हा |
सातार्यातून युवक बेपत्ता |
नागठाण्यात युवकाची आत्महत्या |
उदयनराजे यांना मतदान करून गादीचा सन्मान ठेवा |
जपानचे स्लिम लँडर तिसऱ्यांदा जागृत |
कोल्हापुरातील अंबाबाईच्या रथोत्सव |
छत्रपतींच्या वंशजांना जावळीचा स्वाभिमान सांगू नका |
माझ्याकडे विरोधकांच्या अनेक भानगडी |