02:57pm | Nov 13, 2018 |
सातारा : पुणे बेंगळूरु राष्ट्रीय महामार्गावर सातारा तालुक्यातील वळसे गावच्या हद्दीत भरधाव वेगाने जाणाऱ्या खाजगी शिवशाही बसने ऊस वाहतूक करणाऱ्या बैलगाडीला जोरदार धडक दिली. या झालेल्या अपघातात ऊसतोड कामगार महिला जागीच ठार झाली. या घटनेची माहिती मिळताच पोलिस घटनास्थळी पोहचले आहेत.मात्र, कामगारांच्या सुरक्षिततेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.
वळसे (ता.सातारा) गावच्या हद्दीत महामार्गावर भरधाव वेगाने जाणाऱ्या खाजगी शिवशाही बसने दुपारी शेंद्रे येथील अजिंक्यतारा सहकारी साखर कारखान्याकडे ऊस भरून घेवून निघालेल्या बैलगाडीला पाठीमागून जोरात धडक दिली. यामध्ये बैलगाडी पलटी झाल्याने गाडीच्यावर बसलेली ऊसतोड महिला खाजगी शिवशाही बसच्या पुढील चाकाखाली सापडून जागीच ठार झाली. मृत ऊसतोड महिलेचे नाव नीता भागवत बांगर (वय ३०,रा. मूळ. सावरगाव, गेवराई, जि, बीड)असे आहे. अपघातानंतर सातारा बाजूकडे जाणारी वाहतूक एक तास ठप्प झाली होती. या अपघाताने पुन्हा एकदा ऊस वाहतूक करणाऱ्या कामगारांना विमा कंपनीचा लाभ मिळणार का?असा प्रश्न उपस्थित करण्यात येत आहे.
अपघाताची माहिती समजताच बोरगाव पोलिस ठाण्याचे सहाय्यक पोलिस निरीक्षक संतोष चौधरी व पोलीस जवान, कराड ट्रॅफिकचे पोलिस उपनिरीक्षक अशोक जाधव व कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेऊन वाहतूक पूर्ववत केली.
सातारा जिल्ह्यात तब्बल पन्नास हजार नवमतदार |
स्व. यशवंतराव चव्हाण यांना भारतरत्न देण्याची मागणी पंतप्रधान मोदींकडे करणार |
कराड तालुक्याच्या विकासासाठी एकत्र प्रयत्न करूया: खा. उदयनराजे भोसले |
खोऱ्याने मते घेणाऱ्या नेत्यांनी केले पाटण खोऱ्याकडे दुर्लक्ष |
सातारा जिल्ह्यातील दोन पोलिस अधिकाऱ्यांसह ११ जणांना महासंचालक सन्मानचिन्ह जाहीर |
सांगलीच्या सिंचनासाठी मागणी झाली कमी |
पोटात चाकू भोसकून एकाला जिवे मारण्याचा प्रयत्न |
ठोसेघर येथे एकाचा डोक्यात दगड घालून निर्घृण खून |
उंच भरारी योजनेचे ब्रँन्ड ऍम्बेसिडर म्हणून मोनिका राठी तसेच सौरभ भोसले यांची निवड |
केट्स पॉईंट वरुन आत्महत्त्या केलेल्याचा मृतदेह दरीबाहेर काढण्यात यश |
शेंद्रे येथील तिहेरी अपघात प्रकरणी तिघांवर गुन्हा |
सुमारे अडीच लाखांच्या बांधकाम साहित्याची चोरी |
एकास मारहाण केल्याप्रकरणी पाच जणांवर गुन्हा |
सातार्यातून युवक बेपत्ता |
नागठाण्यात युवकाची आत्महत्या |
सांगलीच्या सिंचनासाठी मागणी झाली कमी |
पोटात चाकू भोसकून एकाला जिवे मारण्याचा प्रयत्न |
ठोसेघर येथे एकाचा डोक्यात दगड घालून निर्घृण खून |
उंच भरारी योजनेचे ब्रँन्ड ऍम्बेसिडर म्हणून मोनिका राठी तसेच सौरभ भोसले यांची निवड |
केट्स पॉईंट वरुन आत्महत्त्या केलेल्याचा मृतदेह दरीबाहेर काढण्यात यश |
शेंद्रे येथील तिहेरी अपघात प्रकरणी तिघांवर गुन्हा |
सुमारे अडीच लाखांच्या बांधकाम साहित्याची चोरी |
एकास मारहाण केल्याप्रकरणी पाच जणांवर गुन्हा |
सातार्यातून युवक बेपत्ता |
नागठाण्यात युवकाची आत्महत्या |
उदयनराजे यांना मतदान करून गादीचा सन्मान ठेवा |
जपानचे स्लिम लँडर तिसऱ्यांदा जागृत |
कोल्हापुरातील अंबाबाईच्या रथोत्सव |
छत्रपतींच्या वंशजांना जावळीचा स्वाभिमान सांगू नका |
माझ्याकडे विरोधकांच्या अनेक भानगडी |