RNI REG.NO. MAHMAR/2014/56135

What are you looking for?

Contact Us

Address:

Email:

Tel:

Sadar Bazar, Satara, Maharashtra 415001

contact@tmnnews.com

02162 237 474

What are you looking for?

×

माजी आ. येळगावकरांचे उदयनराजेंना भाजप प्रवेशाचे आवतन

09 October 2018 at 03:47

स्वगृही परतण्याची पत्रकार परिषदेत मागणी

सातारा : उदयनराजे, तुम्ही आणखी किती अवहेलना करुन घेणार आहात? राष्ट्रवादीच्या नेत्यांकडून सातत्याने तुम्हांला अपमानित केलं जात आहे. आता बास झालं. यापुढे अपमान खपवून घेवू नका. तुम्ही छत्रपतींचे वंशज आहात. त्याचा स्वाभिमान बाळगा अन् आता तरी राष्ट्रवादी सोडा, असा मित्रत्वाचा सल्ला डॉ. दिलीप येळगावकर यांनी खा. उदयनराजे यांना दिला आहे. राष्ट्रवादीला रामराम करुन दाखवून द्या, पुन्हा स्वगृही भाजपमध्ये या, तुमच्या उमदेवारीसाठी मी प्रयत्न करेन, असेही डॉ. येळगावकर म्हणाले.

सोमवारी शासकीय विश्रामगृह येथे आयोजित पत्रकार परिषदेत डॉ. दिलीप येळगावकर बोलत होते. ते म्हणाले, पुणे येथे खा. उदयनराजे राष्ट्रवादीचे नेते शरद पवार यांच्या भेटीसाठी गेले होते. तेव्हा दहा दिवसांनी या असे सांगून उदयनराजेंना अपमानित करण्यात आले होते. हा संदर्भ देत डॉ. येळगावकर पुढे म्हणाले, राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये तुम्हांला सातत्याने अपमानित करण्यात येत आहे. तुम्ही छत्रपतींचे वंशज आहात. यापुढे अवहेलना खपवून घेवू नका. स्वाभिमान बाळगा अन् राष्ट्रवादीला रामराम करुन दाखवून द्या. तुम्ही जेम्स लेन प्रकरणावरुन भाजपमधून बाहेर पडला होता. जेम्स लेन प्रकरण चुकीचेच आहे, त्याचे मी कधीही समर्थन करणार नाही. अटलबिहारी वाजपेयी यांनी याप्रकरणी योग्य भूमिका घेतली होती. त्यामुळे तेवढया कारणावरुन भाजप सोडण्याची गरजच नव्हती, असे बोलून उदयनराजेंनी भाजपमध्ये यावे, त्यांच्या उमेदवारीसाठी प्रयत्न करीन, असे डॉ. येळगावकर यांनी सांगितले. मी त्यांचा जवळचा मित्र आहे. मी बाजीप्रभू देशपांडेंचा वंशज आहे. उदयनराजेंच्या जवळ राहून कधीही स्वार्थ साधला नाही. उलट त्यांच्यासाठी आमदारकीवर पाणी सोडून त्यांच्या अडचणीच्या काळात धावून गेलो. त्यामुळे मला मित्रत्वाच्या नात्याने त्यांच्याविषयी बोलण्याचा अधिकार आहे. याच नात्याने मी त्यांना सल्ला देईन की, उदयनराजेंना मोठं व्हायचं असेल तर त्यांनी आपल्या बोलण्यावर नियंत्रण ठेवावे, अशी मी तळमळीने त्यांना विनंती करीत आहे. दुसरे महत्वाचे म्हणजे सावंतसारखी हलकट माणसे त्यांनी दूर करावीत, असाही सल्ला डॉ. येळगावकर यांनी उदयनराजेंना दिला आहे. 

पाणी वाटपात माण-खटाववर अन्याय नको !

दरम्यान, उरमोडी उपसा सिंचन योजनेत माण-खटावच्या जनतेवर अन्याय होता कामा नये. उरमोडीचे पाणी बोगद्यातून कण्हेरच्या आरफळ कालव्यात सोडले जात आहे. उरमोडीच्या पाण्यासाठी वेगळी वितरण व्यवस्था नसल्याने यात नेमकं उरमोडीचं पाणी किती अन् कण्हेर धरणातील पाणी किती, हे समजू शकत नाही. आरफळ कालव्याद्वारे हे पाणी कोंबडवाडी तलावात सोडले जाते. यातील थोडं पाणी माण-खटावला तर पुढे याच कालव्यातून अधिक पाणी सांगलीला नेलं जाते. उरमोडीचं वाटयाचं पाणी माण-खटावला मिळालेच पाहिजे. त्यात अन्याय होता कामा नये. त्यासाठी वेगळी वितरण व्यवस्था उभारावी. एकतर उरमोडीचं पाणी थेट वाठार-किरोलीला आणावे किंवा थेट पाईपलाईनद्वारे कोंबडवाडी तलावात सोडावे, अशी आमची मागणी आहे. त्यासाठी शासनाकडे पाठपुरावा सुरु आहे. यासाठी प्रसंगी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्याकडे सुध्दा धाव घेवू, असे डॉ. येळगावकर यांनी सांगितले. 

मुद्रा योजनेत बँकांकडून उद्योजकांवर अन्याय

मुद्रा योजनेचे कर्ज मागणी करण्यासाठी बँकेकडे जाणार्‍या उद्योजकांना बँक अधिकार्‍यांकडून चांगली वागणूक मिळत नाही. कर्ज देण्यात टाळाटाळ सुरु आहे. स्टेट बँक आणि महाराष्ट्र बँकेचे मग्रुर अधिकारी तर जिल्हाधिकार्‍यांना सुध्दा दाद देत नाहीत, असा माझा अनुभव आहे. याप्रकरणी लवकरच जिल्हाधिकार्‍यांना विनंती करुन बैठक घेणार आहोत, असे डॉ. येळगावकर यांनी स्पष्ट केले. टोलनाक्यावर आंदोलन केल्याप्ररकणीच्या खटल्यासंदर्भात बोलताना ते म्हणाले, गेली काही वर्षे ही केस काढून घेण्यासाठी माझा शासनस्तरावर पाठपुरावा सुरु होता. त्याला यश आले अन् सध्या ही केस काढण्यासंबंधीची प्रक्रिया सुरु आहे. यासंबंधी काही वाहिन्यांनी दिलेले वृत्त खातरजमा न करताच दिले आहे, असे सांगून डॉ. येळगावकर यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली. याप्रसंगी भाजपचे रमेश जाधव, सुर्यवंशी हे पदाधिकारी उपस्थित होते.

चौंडेश्वरीनगर व मलकापूर येथील मस्जीदींचे अतिक्रमण हटवा

चौंडेश्वरीनगर गोवारे, व मलकापूर ,ता. कराड येथे सरकारी खुल्या जागेत मस्जीदीचे अनाधिकृतपणे व बेकायदेशीर बांधकाम करण्यात आले आहे.

5 hours before

मलटण मध्ये घरफोडी ; साडेसात लाखांचे सोन्याचे दागिने लांबवले

येथील उपनगर असलेल्या मलटण येथील काळुबाई नगर येथे बंद घराचे कुलूप तोडून 37 तोळ्याचे सोन्याचे दागिने अज्ञात चोरट्यांनी लंपास केले आहेत.

4 hours before

बालकाच्या अपघाती मृत्यूस कारणीभूत ठरलेल्या कार चालकास सक्तमजुरी

शिंदेवाडी ता.खंडाळा गावच्या हद्दीमध्ये महामार्ग ओलांडणाऱ्या पाच वर्षाच्या मुलाच्या मृत्यूप्रकरणी पुणे येथील एका कार चालकाला खंडाळा न्यायालयाने दोषी ठरवले आहे.

6 hours before

जमाव व शस्त्रबंदी आदेश भंग केल्याप्रकरणी खा. उदयनराजे, आ. शिवेद्रराजेंसह ७५ समर्थकांवर गुन्हे

सोमवारी भरदुपारी दारूच्या दुकानासमोर खा. उदयनराजे व आ. शिवेंद्रराजे भोसले यांच्यासह समर्थकांमध्ये झालेल्या टशन नंतर शाहुपूरी पोलिस ठाण्यात एकूण दोन गुन्हे दाखल झाले आहेत.

6 hours before