05:13pm | Jun 09, 2019 |
सातारा : मान्सुन येणार म्हणून आकाशाकडे डोळे लावून बसलेल्या सातारकरांना आज पहाटे पडलेल्या पावसामुळे दिलासा मिळाला आहे. आज पहाटे मेघगर्जनेसह मान्सुनने सातारा शहर व परिसरात हजेरी लावल्यामुळे शेतकरी वर्ग मात्र सुखावलेला आहे.
गेल्या दोन महिन्यात वळीवाच्या पावसाने दडी मारल्यामुळे शेतकरी चिंतातुर झाला होता. एक जूनला अंदमानात मान्सुन हजेरी लावत असतो. परंतू यंदा अंदमानातच मान्सुन उशिरा दाखल झाल्यामुळे महाराष्ट्रासह देशातील शेतकरी चिंताग्रस्त झाला होता. यंदा 93 टक्के पाऊस पडणार असल्याचा अंदाज स्कायमॅटने दिला आहे. 4 जूनला केरळमध्ये मान्सून दाखल होईल तसेच महाराष्ट्रात 10 जूनपासून मान्सूनच्या पावसाला सुरुवात होईल, असाही अंदाज स्कायमॅटने दिला होता. हाच अंदाज तंतोतंत खरा ठरवत आज पहाटेपासून मेघगर्जनेसह पावसाने सातारा शहर व परिसरात हजेरी लावली. सध्या सातारा जिल्ह्यात पाण्याची भीषण टंचाई जाणवत आहे. महाराष्ट्राची वरदायिनी असलेल्या कोयना धरणातही काही टक्केच पाणीसाठा उरलेला आहे. त्यामुळे वीजनिर्मितीवरही परिणाम झालेला आहे. त्यामुळे जिल्ह्यासह महाराष्ट्रावर लोडशेडिंगची टांगती तलवार आहे. आज झालेल्या पावसामुळे शेतकर्यांमध्ये चैतन्याचे वातावरण निर्माण झाले असले तरी जिल्ह्यातील काही भागात मान्सुनने दडी मारलेली आहे.
सातारा जिल्ह्यात तब्बल पन्नास हजार नवमतदार |
स्व. यशवंतराव चव्हाण यांना भारतरत्न देण्याची मागणी पंतप्रधान मोदींकडे करणार |
कराड तालुक्याच्या विकासासाठी एकत्र प्रयत्न करूया: खा. उदयनराजे भोसले |
खोऱ्याने मते घेणाऱ्या नेत्यांनी केले पाटण खोऱ्याकडे दुर्लक्ष |
सातारा जिल्ह्यातील दोन पोलिस अधिकाऱ्यांसह ११ जणांना महासंचालक सन्मानचिन्ह जाहीर |
सांगलीच्या सिंचनासाठी मागणी झाली कमी |
पोटात चाकू भोसकून एकाला जिवे मारण्याचा प्रयत्न |
ठोसेघर येथे एकाचा डोक्यात दगड घालून निर्घृण खून |
उंच भरारी योजनेचे ब्रँन्ड ऍम्बेसिडर म्हणून मोनिका राठी तसेच सौरभ भोसले यांची निवड |
केट्स पॉईंट वरुन आत्महत्त्या केलेल्याचा मृतदेह दरीबाहेर काढण्यात यश |
शेंद्रे येथील तिहेरी अपघात प्रकरणी तिघांवर गुन्हा |
सुमारे अडीच लाखांच्या बांधकाम साहित्याची चोरी |
एकास मारहाण केल्याप्रकरणी पाच जणांवर गुन्हा |
सातार्यातून युवक बेपत्ता |
नागठाण्यात युवकाची आत्महत्या |
सांगलीच्या सिंचनासाठी मागणी झाली कमी |
पोटात चाकू भोसकून एकाला जिवे मारण्याचा प्रयत्न |
ठोसेघर येथे एकाचा डोक्यात दगड घालून निर्घृण खून |
उंच भरारी योजनेचे ब्रँन्ड ऍम्बेसिडर म्हणून मोनिका राठी तसेच सौरभ भोसले यांची निवड |
केट्स पॉईंट वरुन आत्महत्त्या केलेल्याचा मृतदेह दरीबाहेर काढण्यात यश |
शेंद्रे येथील तिहेरी अपघात प्रकरणी तिघांवर गुन्हा |
सुमारे अडीच लाखांच्या बांधकाम साहित्याची चोरी |
एकास मारहाण केल्याप्रकरणी पाच जणांवर गुन्हा |
सातार्यातून युवक बेपत्ता |
नागठाण्यात युवकाची आत्महत्या |
उदयनराजे यांना मतदान करून गादीचा सन्मान ठेवा |
जपानचे स्लिम लँडर तिसऱ्यांदा जागृत |
कोल्हापुरातील अंबाबाईच्या रथोत्सव |
छत्रपतींच्या वंशजांना जावळीचा स्वाभिमान सांगू नका |
माझ्याकडे विरोधकांच्या अनेक भानगडी |