05:35pm | Sep 22, 2018 |
सातारा : फलटणच्या ‘श्रीराम’ सहकारी साखर कारखान्याचे निवृत्त कामगार ग्रॅच्युईटीची रक्कम न मिळाल्यामुळे दि. 17 सप्टेंबरपासून फलटण येथील अधिकार गृहासमोर ऍड. नरसिंह निकम यांच्या नेतृत्वाखाली उपोषणास बसले होते. अखेर आज कामगारांची एकजुट व ‘सातारा टुडे’च्या दणक्यामुळे ‘श्रीराम’च्या अध्यक्षांसह व्यवस्थापनाला कामगारांसमोर नाक घासावे लागले. तसेच सुमारे साठ कामगारांची 2 कोटी रुपयांची ग्रॅच्युईटीची रक्कम 30 नोव्हेंबरपर्यंत देण्याची लेखी हमी फलटण शहर पोलीस ठाण्यात देण्यात आल्यामुळे आज सकाळी कामगारांनी उपोषण स्थगित केले.
2012 साली श्रीराम सहकारी साखर कारखान्यातून सुमारे दीडशे कामगार सेवानिवृत्त झाले होते. पंधरा दिवसांच्या कालावधीमध्ये निवृत्त कामगारांच्या ग्रॅच्युईटीची रक्कम देणे बंधनकारक असतानासुद्धा ‘श्रीराम’च्या अध्यक्ष, उपाध्यक्ष व दाढीवाल्या बाबांनी 6 कोटी रुपयांची रक्कम परस्पर हाणली होती. 2012 पासून हे निवृत्त कामगार ग्रॅच्युईटीच्या रकमेसाठी लढा देत होते. सुमारे एक वर्षापूर्वी फलटण तालुका संघर्ष समितीचे अध्यक्ष ऍड. नरसिंह निकम व ‘सातारा टुडे’ने निवृत्त कामगारांच्या ग्रॅच्युईटीची रक्कम त्वरित अदा करावी, यासाठी लढा उभारला होता. ‘सातारा टुडे’ने निवृत्त कामगारांच्या ग्रॅच्युईटीची रक्कम खाणार्या दाढीवाल्या बाबांचा पर्दाफाश करीत फलटणकरांसमोर त्यांचे पितळ उघडे पाडले होते. त्यामुळे ‘जनाची नाही तर मनाची’ प्रमाणे सुमारे दोन महिन्यांपूर्वी ‘श्रीराम’ने निवृत्त 90 कामगारांची चार कोटी रुपयांची ग्रॅच्युईटीची रक्कम अदा केली होती. दरम्यान, दिलेला शब्द ‘श्रीराम’च्या व्यवस्थापनाने पाळला नाही. 60 कामगारांची सुमारे 2 कोटी रुपयांची देणी देणे श्रीराम बाकी होते. मात्र, श्रीराम या 60 कामगारांबाबत चालढकल करीत होते.
अखेर दि. 17 सप्टेंबर रोजी या 60 कामगारांची ग्रॅच्युईटीची रक्कम मिळण्यासाठी कामगारांनी फलटण येथील अधिकारगृहासमोर ऍड. नरसिंह निकम यांच्या नेतृत्वाखाली उपोषणाला सुरुवात केली होती. परवाच ‘सातारा टुडे’ने श्रीरामचे सर्वेसर्वा असणार्या फलटण नरेशांची ‘चंपी’ केली होती. त्यानंतर काल श्रीरामचे डॉ. बाळासाहेब शेंडे, व्हा. चेअरमन नितीन भोसले, कार्यकारी संचालक सी. डी. तळेकर यांनी उपोषणस्थळी जावून निवृत्त कामगारांना उपोषण सोडण्याबाबतची विनंती केली. मात्र, दोन कोटी घेतल्याशिवाय जागचे हालणार नाही, अशी भूमिका कामगारांनी घेतली होती. त्यानंतर हे प्रकरण फलटण शहर पोलीस ठाण्यात गेल्यानंतर कारखान्याच्या चेअरमनसह व्यवस्थापनाने फलटण शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक प्रकाश सावंत यांच्यासमोर ग्रॅच्युईटीची रक्कम देण्याची लेखी हमी दिली. यामध्ये 30 नोव्हेंबर 2018 पर्यंत ग्रॅच्युईटीची 2 कोटी रुपयांची रक्कम देण्याचे लेखी मान्य केले. त्यानंतर आज सकाळी कारखान्याचे चेअरमन व व्यवस्थापनातील पदाधिकार्यांनी पोलिसांच्या उपस्थितीत कामगारांना लेखी हमी देवून हे उपोषण सोडण्याची विनंती केली. त्यानंतर कामगारांनी सरबत पिऊन उपोषण सोडले.
यावेळी निवृत्त कामगारांनी फलटण तालुका संघर्ष समितीचे ऍड. नरसिंह निकम यांच्यासह निवृत्त कामगारांच्या ग्रॅच्युईटीची रक्कम मिळण्यासाठी पाठपुरावा करणार्या ‘सातारा टुडे’चेही आभार मानले.
सातारा जिल्ह्यात तब्बल पन्नास हजार नवमतदार |
स्व. यशवंतराव चव्हाण यांना भारतरत्न देण्याची मागणी पंतप्रधान मोदींकडे करणार |
कराड तालुक्याच्या विकासासाठी एकत्र प्रयत्न करूया: खा. उदयनराजे भोसले |
खोऱ्याने मते घेणाऱ्या नेत्यांनी केले पाटण खोऱ्याकडे दुर्लक्ष |
सातारा जिल्ह्यातील दोन पोलिस अधिकाऱ्यांसह ११ जणांना महासंचालक सन्मानचिन्ह जाहीर |
सांगलीच्या सिंचनासाठी मागणी झाली कमी |
पोटात चाकू भोसकून एकाला जिवे मारण्याचा प्रयत्न |
ठोसेघर येथे एकाचा डोक्यात दगड घालून निर्घृण खून |
उंच भरारी योजनेचे ब्रँन्ड ऍम्बेसिडर म्हणून मोनिका राठी तसेच सौरभ भोसले यांची निवड |
केट्स पॉईंट वरुन आत्महत्त्या केलेल्याचा मृतदेह दरीबाहेर काढण्यात यश |
शेंद्रे येथील तिहेरी अपघात प्रकरणी तिघांवर गुन्हा |
सुमारे अडीच लाखांच्या बांधकाम साहित्याची चोरी |
एकास मारहाण केल्याप्रकरणी पाच जणांवर गुन्हा |
सातार्यातून युवक बेपत्ता |
नागठाण्यात युवकाची आत्महत्या |
सांगलीच्या सिंचनासाठी मागणी झाली कमी |
पोटात चाकू भोसकून एकाला जिवे मारण्याचा प्रयत्न |
ठोसेघर येथे एकाचा डोक्यात दगड घालून निर्घृण खून |
उंच भरारी योजनेचे ब्रँन्ड ऍम्बेसिडर म्हणून मोनिका राठी तसेच सौरभ भोसले यांची निवड |
केट्स पॉईंट वरुन आत्महत्त्या केलेल्याचा मृतदेह दरीबाहेर काढण्यात यश |
शेंद्रे येथील तिहेरी अपघात प्रकरणी तिघांवर गुन्हा |
सुमारे अडीच लाखांच्या बांधकाम साहित्याची चोरी |
एकास मारहाण केल्याप्रकरणी पाच जणांवर गुन्हा |
सातार्यातून युवक बेपत्ता |
नागठाण्यात युवकाची आत्महत्या |
उदयनराजे यांना मतदान करून गादीचा सन्मान ठेवा |
जपानचे स्लिम लँडर तिसऱ्यांदा जागृत |
कोल्हापुरातील अंबाबाईच्या रथोत्सव |
छत्रपतींच्या वंशजांना जावळीचा स्वाभिमान सांगू नका |
माझ्याकडे विरोधकांच्या अनेक भानगडी |