कराड : शेती व्यवसाय मुळातच अडचणीत आला असताना शेतीसाठी लागणार्या खतांच्या किमती प्रति गोणी 200 ते 300 रुपयांनी वाढ करण्यात आले आहेत. या अन्यायकारक वाडीच्या निषेधार्थ बळीराजा शेतकरी संघटनेच्यावतीने कराड येथे निदर्शने करण्यात आली. संघटनेच्या पदाधिकार्यांनी कराड तहसील कार्यालयाच्या प्रवेशद्वारावर सरकार विरोधी घोषणा देत निदर्शने करत वाढीव खताच्या किमती कमी करण्याची जोरदार मागणी केली. यावेळी कार्यकर्त्यांनी केंद्रसरकारच्या निषेधार्थात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या प्रतिकात्मक पुतळ्याचे दहन करण्याचा प्रयत्न केला मात्र, पोलिसांनी वेळीच हस्तक्षेप करून आंदोलकांना रोखले. पोलीस उपनिरीक्षक शिवराम खाडे, रुपाली कदम, हवालदार संतोष जाधव यांच्यासह कराड शहर पोलीस ठाण्याच्या कर्मचार्यांनी आंदोलकांचे मन परिवर्तन केले.
यावेळी वाढलेल्या खताच्या किमती तात्काळ कमी करून शेतकर्यांना दिलासा द्यावा अन्यथा बळीराजा शेतकरी संघटनेच्या माध्यमातून तीव्र आंदोलन करण्याचा इशारा संघटनेचे केंद्रीय अध्यक्ष पंजाबराव पाटील यांनी दिला. शेतकरी संघटनेच्या वतीने तहसीलदार राजेश चव्हाण यांना खताच्या किमती करणे कमी करण्याबाबत निवेदनही देण्यात आले. यावेळी संघटनेचे जिल्हाध्यक्ष साजिद मुल्ला सुनील कोळी, उत्तम साळुंखे, सागर कांबळे पोपट जाधव यांच्यासह अन्य पदाधिकारी उपस्थित होते.
सध्या शेतकरी शेतीमालाला भाव नसल्यामुळे आर्थिक अडचणीत सापडला आहे त्यातच केंद्र सरकारने शेतीसाठी लागणार्या खतांच्या किमती मध्ये 20% वाढ केली आहे त्यामुळे प्रति गोणी शेतकर्याला दोनशे ते तीनशे रुपये जादा मोजून खरेदी करावी लागत आहे सरकारने शेतकर्यांना उध्वस्त करण्याचे नियोजन बद्ध कार्यक्रम गेल्या काही दिवसांपासून राबविण्यास सुरुवात केली आहे हे खपवून घेतले जाणार नाही. त्यामुळे सरकारने वाढविलेल्या खतांच्या किमती तात्काळ कमी कराव्यात आणि शेतकर्यांना दिलासा द्यावा अन्यथा शेतकर्यांना न्याय मिळवून देण्यासाठी बळीराजा शेतकरी संघटनेच्या माध्यमातून तीव्र आंदोलन करण्यात येईल, या आंदोलनामुळे होणार्या सर्वस्वी परिणामांना प्रशासन व सरकार जबाबदार राहील असे या निवेदनात नमूद करण्यात आले आहे.तहसीलदार राजेश चव्हाण यांना निवेदन देताना पंजाबराव पाटील, साजीद मुल्ला, सुनील कोळी व अन्य.
सातारा जिल्ह्यात तब्बल पन्नास हजार नवमतदार |
स्व. यशवंतराव चव्हाण यांना भारतरत्न देण्याची मागणी पंतप्रधान मोदींकडे करणार |
कराड तालुक्याच्या विकासासाठी एकत्र प्रयत्न करूया: खा. उदयनराजे भोसले |
खोऱ्याने मते घेणाऱ्या नेत्यांनी केले पाटण खोऱ्याकडे दुर्लक्ष |
सातारा जिल्ह्यातील दोन पोलिस अधिकाऱ्यांसह ११ जणांना महासंचालक सन्मानचिन्ह जाहीर |
सांगलीच्या सिंचनासाठी मागणी झाली कमी |
पोटात चाकू भोसकून एकाला जिवे मारण्याचा प्रयत्न |
ठोसेघर येथे एकाचा डोक्यात दगड घालून निर्घृण खून |
उंच भरारी योजनेचे ब्रँन्ड ऍम्बेसिडर म्हणून मोनिका राठी तसेच सौरभ भोसले यांची निवड |
केट्स पॉईंट वरुन आत्महत्त्या केलेल्याचा मृतदेह दरीबाहेर काढण्यात यश |
शेंद्रे येथील तिहेरी अपघात प्रकरणी तिघांवर गुन्हा |
सुमारे अडीच लाखांच्या बांधकाम साहित्याची चोरी |
एकास मारहाण केल्याप्रकरणी पाच जणांवर गुन्हा |
सातार्यातून युवक बेपत्ता |
नागठाण्यात युवकाची आत्महत्या |
सांगलीच्या सिंचनासाठी मागणी झाली कमी |
पोटात चाकू भोसकून एकाला जिवे मारण्याचा प्रयत्न |
ठोसेघर येथे एकाचा डोक्यात दगड घालून निर्घृण खून |
उंच भरारी योजनेचे ब्रँन्ड ऍम्बेसिडर म्हणून मोनिका राठी तसेच सौरभ भोसले यांची निवड |
केट्स पॉईंट वरुन आत्महत्त्या केलेल्याचा मृतदेह दरीबाहेर काढण्यात यश |
शेंद्रे येथील तिहेरी अपघात प्रकरणी तिघांवर गुन्हा |
सुमारे अडीच लाखांच्या बांधकाम साहित्याची चोरी |
एकास मारहाण केल्याप्रकरणी पाच जणांवर गुन्हा |
सातार्यातून युवक बेपत्ता |
नागठाण्यात युवकाची आत्महत्या |
उदयनराजे यांना मतदान करून गादीचा सन्मान ठेवा |
जपानचे स्लिम लँडर तिसऱ्यांदा जागृत |
कोल्हापुरातील अंबाबाईच्या रथोत्सव |
छत्रपतींच्या वंशजांना जावळीचा स्वाभिमान सांगू नका |
माझ्याकडे विरोधकांच्या अनेक भानगडी |