सातारा : बावधन, ता. वाई येथील तलाठी शंकर मल्हारी कोळेकर (वय ३४) रा. धोम कॉलनी, वाई हे २० हजार रुपयांची लाच स्वीकारताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या जाळ्यात अडकले.
याबाबत मिळालेली माहिती अशी, की तक्रारदार याचा दि. २३ ऑगस्ट रोजी पहाटे वाळूचा पकडलेला ट्रॅक्टर कारवाई न करता सोडून दिला म्हणून तलाठी शंकर कोळेकर यांनी तक्रारदार यांना ४० हजार रुपयांची लाचेची मागणी केल्या बाबतचा लेखी तक्रारी अर्ज लाचलुचपत प्रतिबंधक विभागाला प्राप्त झाला होता. लेखी तक्रारी अर्जाची पडताळणी केल्यानंतर दि. २३ रोजी वाळूचा पकडलेला ट्रक कारवाई न करता सोडून दिला म्हणून व भविष्यात कारवाई न करण्यासाठी तडजोडीअंती २० हजार रुपयांची लाचेची मागणी करून ती लाच वाई तहसीलदार यांच्या शासकीय निवासस्थाना समोरील रस्त्यावर स्वीकारल्यानंतर लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने तलाठ्याला रंगेहात पकडले. दरम्यान तलाठी शंकर कोळेकर यांच्यावर वाई पोलीस स्टेशन येथे भ्रष्टाचार प्रतिबंधक अधिनियमाखाली गुन्हा दाखल करण्याची कारवाई रात्री उशिरापर्यंत सुरू होती.
या कारवाईमध्ये लाच लुचपत प्रतिबंधक विभागाचे पोलीस उपाधीक्षक राजेश बनसोडे, श्रीमती सुषमा चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपाधीक्षक अशोक शिर्के, सहाय्यक फौजदार आनंदराव सपकाळ, पोलीस हवालदार संजय साळुंखे, पोलीस नाईक संजय अडसूळ, अजित कर्णे, प्रशांत ताटे, मारुती अडागळे, श्रद्धा माने, संभाजी काटकर, विशाल खरात, तुषार भोसले, निलेश येवले, निलेश वायदंडे, शितल सपकाळ यांनी सहभाग घेतला.
दरम्यान लाच मागणी संबंधाने तक्रार असल्यास पोलीस उप अधीक्षक, लाचलुचपत प्रतिबंधक विभाग, जिल्हा कोषागार कार्यालयाजवळ, सदर बाझार, सातारा येथे अथवा कार्यालयीन दूरध्वनी क्रमांक ०२१६२/ २३८१३९ वर संपर्क साधावा असे आवाहन करण्यात आले आहे.
सातारा जिल्ह्यात तब्बल पन्नास हजार नवमतदार |
स्व. यशवंतराव चव्हाण यांना भारतरत्न देण्याची मागणी पंतप्रधान मोदींकडे करणार |
कराड तालुक्याच्या विकासासाठी एकत्र प्रयत्न करूया: खा. उदयनराजे भोसले |
खोऱ्याने मते घेणाऱ्या नेत्यांनी केले पाटण खोऱ्याकडे दुर्लक्ष |
सातारा जिल्ह्यातील दोन पोलिस अधिकाऱ्यांसह ११ जणांना महासंचालक सन्मानचिन्ह जाहीर |
सांगलीच्या सिंचनासाठी मागणी झाली कमी |
पोटात चाकू भोसकून एकाला जिवे मारण्याचा प्रयत्न |
ठोसेघर येथे एकाचा डोक्यात दगड घालून निर्घृण खून |
उंच भरारी योजनेचे ब्रँन्ड ऍम्बेसिडर म्हणून मोनिका राठी तसेच सौरभ भोसले यांची निवड |
केट्स पॉईंट वरुन आत्महत्त्या केलेल्याचा मृतदेह दरीबाहेर काढण्यात यश |
शेंद्रे येथील तिहेरी अपघात प्रकरणी तिघांवर गुन्हा |
सुमारे अडीच लाखांच्या बांधकाम साहित्याची चोरी |
एकास मारहाण केल्याप्रकरणी पाच जणांवर गुन्हा |
सातार्यातून युवक बेपत्ता |
नागठाण्यात युवकाची आत्महत्या |
सांगलीच्या सिंचनासाठी मागणी झाली कमी |
पोटात चाकू भोसकून एकाला जिवे मारण्याचा प्रयत्न |
ठोसेघर येथे एकाचा डोक्यात दगड घालून निर्घृण खून |
उंच भरारी योजनेचे ब्रँन्ड ऍम्बेसिडर म्हणून मोनिका राठी तसेच सौरभ भोसले यांची निवड |
केट्स पॉईंट वरुन आत्महत्त्या केलेल्याचा मृतदेह दरीबाहेर काढण्यात यश |
शेंद्रे येथील तिहेरी अपघात प्रकरणी तिघांवर गुन्हा |
सुमारे अडीच लाखांच्या बांधकाम साहित्याची चोरी |
एकास मारहाण केल्याप्रकरणी पाच जणांवर गुन्हा |
सातार्यातून युवक बेपत्ता |
नागठाण्यात युवकाची आत्महत्या |
उदयनराजे यांना मतदान करून गादीचा सन्मान ठेवा |
जपानचे स्लिम लँडर तिसऱ्यांदा जागृत |
कोल्हापुरातील अंबाबाईच्या रथोत्सव |
छत्रपतींच्या वंशजांना जावळीचा स्वाभिमान सांगू नका |
माझ्याकडे विरोधकांच्या अनेक भानगडी |