सातारा : महागाईमुळे सर्वसामान्यांचे बजेट आता कोलमडू लागले आहे. शासनाने केलेल्या विविध दरवाढीचा फटका सर्वसामान्य नागरिकांना आता चांगलाच बसणार आहे. पेट्रोल व डिझेल या इंधनाच्या किंमती वाढत आहेत. याचा नकळत परिणाम इतर नागरिकंबरोबर फळ व भाजी विक्रेत्यांवर होणार असल्याने त्यांच्या किंमती देखील वाढल्या आहेत. तसेच ऐन उन्हाळयात विज वितरण कंपनीने केलेल्या बदलामुळे शेतकऱयांना याचा फटका बसत आहे. शेतीसाठी 8 तास तसेच घरगुतीसाठी 12 तास लाईट ठेवण्यात आली आहे.
विज बिलात देखील युनिट मागे किंमती वाढल्याने विज बिल देखील वाढून येत असल्याने सर्व सामन्यांच्या आवक्या बाहेर जावू लागले आहे. त्यामुळे सातारकर नागरिक हैराण झाले असून हेच का अच्छे दिन असा सवाल करू लागले आहेत. दिवसेंदिवस वाढत चाललेल्या महागाईमुळे सर्वसामन्य नागरिकांचे हाल होवू लागले आहेत. पेट्रोल व डिझेल या इंधन दर वाढीमुळे सर्व जनता हैराण होवू लागली आहे. 82 प्रति लिटर असणारे पेट्रोल आता 86 रूपयांवर पोहचल्याने याची झळ नागरिकांना बसत आहे. यामुळे वाहतूक दरवाढीवर देखील याचा परिणाम होणार आहे. माल वाहतूक करण्यासाठी लागणारी वाहतूक खर्चाची किंमत वाढल्याने नकळत इतर वस्तू देखील महागल्या आहेत. फळ-भाज्या तसेच इतर वस्तुसाठी करावी लागणाऱया वाहतुकीमुळे पालेभाज्या, फळे महागल्या आहेत.महागाईची झळ लाईट बिलात ही सोसावी लागत आहे. दिवसेंदिवस लाईटबिलच्या युनिटमध्येही वाढ होत आहे. शेतकऱयांसाठी शेतीसाठी लाईट फक्त आठ तास आणि घरगुती लाईट 24 तास ठेवल्याने शेतकऱयांचे चांगलेच हाल होत आहेत. शेतीसाठी रात्रीच्यावेळी आठ तास लाईट असल्याने रात्रीच्या वेळेसच शेतकऱयांना शेतीसाठी पाणी द्यावे लागत आहे. तसेच लाईट बिलमध्ये वाढीव युनिट मुळेलाईट बिल जास्त येत आहे.
सातारा जिल्ह्यात तब्बल पन्नास हजार नवमतदार |
स्व. यशवंतराव चव्हाण यांना भारतरत्न देण्याची मागणी पंतप्रधान मोदींकडे करणार |
कराड तालुक्याच्या विकासासाठी एकत्र प्रयत्न करूया: खा. उदयनराजे भोसले |
खोऱ्याने मते घेणाऱ्या नेत्यांनी केले पाटण खोऱ्याकडे दुर्लक्ष |
सातारा जिल्ह्यातील दोन पोलिस अधिकाऱ्यांसह ११ जणांना महासंचालक सन्मानचिन्ह जाहीर |
सांगलीच्या सिंचनासाठी मागणी झाली कमी |
पोटात चाकू भोसकून एकाला जिवे मारण्याचा प्रयत्न |
ठोसेघर येथे एकाचा डोक्यात दगड घालून निर्घृण खून |
उंच भरारी योजनेचे ब्रँन्ड ऍम्बेसिडर म्हणून मोनिका राठी तसेच सौरभ भोसले यांची निवड |
केट्स पॉईंट वरुन आत्महत्त्या केलेल्याचा मृतदेह दरीबाहेर काढण्यात यश |
शेंद्रे येथील तिहेरी अपघात प्रकरणी तिघांवर गुन्हा |
सुमारे अडीच लाखांच्या बांधकाम साहित्याची चोरी |
एकास मारहाण केल्याप्रकरणी पाच जणांवर गुन्हा |
सातार्यातून युवक बेपत्ता |
नागठाण्यात युवकाची आत्महत्या |
सांगलीच्या सिंचनासाठी मागणी झाली कमी |
पोटात चाकू भोसकून एकाला जिवे मारण्याचा प्रयत्न |
ठोसेघर येथे एकाचा डोक्यात दगड घालून निर्घृण खून |
उंच भरारी योजनेचे ब्रँन्ड ऍम्बेसिडर म्हणून मोनिका राठी तसेच सौरभ भोसले यांची निवड |
केट्स पॉईंट वरुन आत्महत्त्या केलेल्याचा मृतदेह दरीबाहेर काढण्यात यश |
शेंद्रे येथील तिहेरी अपघात प्रकरणी तिघांवर गुन्हा |
सुमारे अडीच लाखांच्या बांधकाम साहित्याची चोरी |
एकास मारहाण केल्याप्रकरणी पाच जणांवर गुन्हा |
सातार्यातून युवक बेपत्ता |
नागठाण्यात युवकाची आत्महत्या |
उदयनराजे यांना मतदान करून गादीचा सन्मान ठेवा |
जपानचे स्लिम लँडर तिसऱ्यांदा जागृत |
कोल्हापुरातील अंबाबाईच्या रथोत्सव |
छत्रपतींच्या वंशजांना जावळीचा स्वाभिमान सांगू नका |
माझ्याकडे विरोधकांच्या अनेक भानगडी |