11:55pm | Mar 05, 2018 |
सातारा : वीजबिल वसुली व वीजमीटर तपासणी मोहीम राबविणाऱ्या महावितरणच्या अधिकाऱ्यांना घरामध्ये कोंडून मारहाण करणाऱ्या तीन आरोपींना सहा महिने सक्तमजुरीची शिक्षा व प्रत्येकी नऊ हजार रुपयांचा दंड नांदेड जिल्ह्यातील उमरी न्यायालयाच्या प्रथमवर्ग न्यायदंडाधिकाऱ्यांनी ठोठावला आहे.
उमरी येथील महावितरणचे कनिष्ठ अभियंता सुनील कासनाळे हे २५ नोव्हेंबर २०१२ रोजी आपल्या सहकारी कर्मचाऱ्यांसोबत सिंधी या गावी वीजबिल वसुली व मीटरची तपासणी मोहीम राबवित होते. यावेळी शिवाजी पुयड हे अनधिकृतरित्या आकडा टाकून वीज वापरत असल्याचे आढळून आले. आकडा टाकून वीज चोरल्याबद्दलचा रीतसर पंचनामा करीत असताना शिवाजी पुयड आणि अन्य दोघांनी घराचा दरवाजा बंद करून पंचनाम्याचे कागदपत्र फाडून टाकले. त्याचबरोबर पंचनाम्याचे चित्रीकरण करणारे कर्मचारी बालाजी ढेरे यांना उग्रसेन पुयड व मारोती पुयड या आरोपींनी हातपाय धरून मारहाण करत मोबाईल काढून घेतला. तसेच इतर कर्मचाऱ्यांनाही कागदपत्रे फाडत धक्काबुक्की करत मारहाण करण्यात आली.
या प्रकरणी न्यायालयात दोषारोपपत्र दाखल झाल्यानंतर सरकार पक्षाने पाच साक्षीदार तपासले. ३ मार्च २०१८ रोजी प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी एन. डी. जाधव यांनी उमरी तालुक्यातील सिंधी येथील नितीन बालाजी पुयड, उग्रसेन शिवाजी पुयड व मारोती शिवाजी पुयड या तिघांना भा.दं.वि.च्या ३५३, ३४२, २०१, ५०४, ५०६ सह ३४ या कलमांतर्गत प्रत्येकी सहा महिने सक्तमजुरीची शिक्षा व प्रत्येकी नऊ हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावली आहे. सरकार पक्षातर्फे अजीम खान यांनी काम पाहिले.
एकास मारहाण केल्याप्रकरणी पाच जणांवर गुन्हा |
सातार्यातून युवक बेपत्ता |
नागठाण्यात युवकाची आत्महत्या |
उदयनराजे यांना मतदान करून गादीचा सन्मान ठेवा |
जपानचे स्लिम लँडर तिसऱ्यांदा जागृत |
कोल्हापुरातील अंबाबाईच्या रथोत्सव |
छत्रपतींच्या वंशजांना जावळीचा स्वाभिमान सांगू नका |
माझ्याकडे विरोधकांच्या अनेक भानगडी |
महाभकास आघाडीला निवडणुकीत जागा दाखवा |
साताऱ्यात मेघगर्जनेसह बरसल्या पावसाच्या सरी |
जनता बँकेत पुर्नगठीत बोर्ड ऑफ मॅनेजमेंटच्या चेअरमनपदी विनोद कुलकर्णी |
बोंडारवाडीसह धरणांची कामे मार्गी लावणार उदयनराजेंचे आश्वासन |
दलित महासंघ,पॅंथरचा उदयनराजेंना जाहीर पाठींबा |
सातारकरांना बाहेरच्यांनी स्वाभिमान शिकवू नये |
साताऱ्यात कोट्यावधीची कामे हीच आपली जमेची बाजू |
कोल्हापुरातील अंबाबाईच्या रथोत्सव |
छत्रपतींच्या वंशजांना जावळीचा स्वाभिमान सांगू नका |
माझ्याकडे विरोधकांच्या अनेक भानगडी |
महाभकास आघाडीला निवडणुकीत जागा दाखवा |
साताऱ्यात मेघगर्जनेसह बरसल्या पावसाच्या सरी |
जनता बँकेत पुर्नगठीत बोर्ड ऑफ मॅनेजमेंटच्या चेअरमनपदी विनोद कुलकर्णी |
बोंडारवाडीसह धरणांची कामे मार्गी लावणार उदयनराजेंचे आश्वासन |
दलित महासंघ,पॅंथरचा उदयनराजेंना जाहीर पाठींबा |
सातारकरांना बाहेरच्यांनी स्वाभिमान शिकवू नये |
साताऱ्यात कोट्यावधीची कामे हीच आपली जमेची बाजू |
जुगार प्रकरणी एकावर कारवाई |
नोकरीच्या अमिषाने सुमारे पावणे सहा लाखांची फसवणूक |
शहरातील दोन वेगवेगळ्या घटनांमध्ये दोनजण बेपत्ता |
विवाहितेला आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी पती विरुध्द गुन्हा |
शाहूनगर येथे घरफोडी |