मुंबई : आगामी विधानसभा निवडणुकीत चेंबूर मतदारसंघात रिपब्लिकन पक्षाची अधिकृत उमेदवारी रिपाइं चे महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्ष दिपकभाऊ निकाळजे यांनाच देणार असल्याची घोषणा करीत चेंबूर विधानसभेच्या जागेवर रिपाइंचा दावा रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री ना रामदास आठवले यांनी केला आहे.
चेंबूर छेडानगर येथे रिपाइं चे राज्य उपाध्यक्ष दिपकभाऊ निकाळजे यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित कार्यकर्ता मेळाव्यात ना रामदास आठवले बोलत होते.यावेळी रिपाइं चे राष्ट्रीय प्रवक्ते आणि महाराष्ट्र शासनाचे राज्यमंत्री ना. अविनाश महातेकर, कुमार जित आठवले, राष्ट्रीय सरचिटणीस मोहनलाल पाटील, रिपाइंचे मुंबई अध्यक्ष गौतम सोनवणे, सुनीताताई चव्हाण, महेंद्र मानकर, कांतिकुमार जैन, कैलास सुरवाडे आदी अनेक मान्यवर उपस्थित होते.यावेळी रिपाइंतर्फे रोजगार मेळाव्याचेही आयोजन करण्यात आले होते.
आगामी विधानसभा निवडणुकीत रिपब्लिकन पक्षाला किमान 10 जागा मित्रपक्षाने सोडल्या पाहिजेत.त्यासाठी राज्यातील रिपब्लिकन पक्षाचे बालेकिल्ले असणाऱ्या मतदारसंघात रिपब्लिकन पक्षाने तुल्यबळ उमेदवारांच्या नावांची चाचपणी चालू केली असून त्या अंतर्गत चेंबूर हा रिपाइं चा बालेकिल्ला असणाऱ्या मतदारसंघात दिपकभाऊ निकाळजे यांना रिपाइं ची उमेदवारी देण्याची घोषणा ना रामदास आठवले यांनी केली आहे. भाजप शिवसेना महायुती सोबत रिपब्लिकन पक्ष राहणार असून आगामी विधानसभा निवडणुकीत महायुतीतून रिपाइं चे किमान 10 आमदार निवडून आणण्याचा निर्धार यावेळी ना रामदास आठवले यांनी व्यक्त केला. मागील विधानसभा निवडणुकीत चेंबूर मतदारसंघात रिपाइं चे दिपकभाऊ निकाळजे थोड्या मतदानाच्या फरकाने पराभूत झाले होते.त्यावेळी मित्रपक्ष भाजप चे कोणतेही नेते दिपकभाऊ निकाळजे यांच्या प्रचाराला आले नव्हते. यावेळी मात्र भाजप शिवसेना रिपाइं यांच्या महायुती मुळे रिपाइं चे दिपकभाऊ निकाळजे निवडून येतील असा विश्वास ना. रामदास आठवले यांनी व्यक्त केला.
एकास मारहाण केल्याप्रकरणी पाच जणांवर गुन्हा |
सातार्यातून युवक बेपत्ता |
नागठाण्यात युवकाची आत्महत्या |
उदयनराजे यांना मतदान करून गादीचा सन्मान ठेवा |
जपानचे स्लिम लँडर तिसऱ्यांदा जागृत |
कोल्हापुरातील अंबाबाईच्या रथोत्सव |
छत्रपतींच्या वंशजांना जावळीचा स्वाभिमान सांगू नका |
माझ्याकडे विरोधकांच्या अनेक भानगडी |
महाभकास आघाडीला निवडणुकीत जागा दाखवा |
साताऱ्यात मेघगर्जनेसह बरसल्या पावसाच्या सरी |
जनता बँकेत पुर्नगठीत बोर्ड ऑफ मॅनेजमेंटच्या चेअरमनपदी विनोद कुलकर्णी |
बोंडारवाडीसह धरणांची कामे मार्गी लावणार उदयनराजेंचे आश्वासन |
दलित महासंघ,पॅंथरचा उदयनराजेंना जाहीर पाठींबा |
सातारकरांना बाहेरच्यांनी स्वाभिमान शिकवू नये |
साताऱ्यात कोट्यावधीची कामे हीच आपली जमेची बाजू |
कोल्हापुरातील अंबाबाईच्या रथोत्सव |
छत्रपतींच्या वंशजांना जावळीचा स्वाभिमान सांगू नका |
माझ्याकडे विरोधकांच्या अनेक भानगडी |
महाभकास आघाडीला निवडणुकीत जागा दाखवा |
साताऱ्यात मेघगर्जनेसह बरसल्या पावसाच्या सरी |
जनता बँकेत पुर्नगठीत बोर्ड ऑफ मॅनेजमेंटच्या चेअरमनपदी विनोद कुलकर्णी |
बोंडारवाडीसह धरणांची कामे मार्गी लावणार उदयनराजेंचे आश्वासन |
दलित महासंघ,पॅंथरचा उदयनराजेंना जाहीर पाठींबा |
सातारकरांना बाहेरच्यांनी स्वाभिमान शिकवू नये |
साताऱ्यात कोट्यावधीची कामे हीच आपली जमेची बाजू |
जुगार प्रकरणी एकावर कारवाई |
नोकरीच्या अमिषाने सुमारे पावणे सहा लाखांची फसवणूक |
शहरातील दोन वेगवेगळ्या घटनांमध्ये दोनजण बेपत्ता |
विवाहितेला आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी पती विरुध्द गुन्हा |
शाहूनगर येथे घरफोडी |