12:56am | Mar 25, 2019 |
सातारा : सातारा लोकसभा मतदारसंघाचे विद्यमान खासदार उदयनराजे भोसले यांच्या विरोधात युतीकडून कोण याबाबतचा पेच अनेक दिवसांपासून सुरु होता. आज कोल्हापुरात झालेल्या महायुतीच्या मेळाव्यात भाजप नेते तथा अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळाचे अध्यक्ष नरेंद्र पाटील यांना सातारा लोकसभा मतदारसंघातून महायुतीकडून उमेदवारी जाहीर झाली आहे.
राष्ट्रवादी कॉंग्रेस पार्टीकडून सातारा लोकसभेसाठी विद्यमान खासदार उदयनराजेंचे नाव उमेदवार म्हणून घोषित करण्यात आल्यानंतर नुकतेच शिवसेनेत पुन्हा प्रवेश केलेले पुरुषोत्तम जाधव व भाजप नेते तथा अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळाचे अध्यक्ष नरेंद्र पाटील यांच्या नावाची युतीमधून चर्चा होती. मात्र याबाबत युतीकडून अधिकृत नावाची घोषणा करण्यात आली नव्हती. आज कोल्हापुरात झालेल्या महायुतीच्या मेळाव्यात राष्ट्रवादीच्या खा. उदयनराजेंच्या विरोधात शिवसेनेकडून नरेंद्र पाटील यांच्या नावावर शिक्कामोर्तब करण्यात आला आहे. सातारा लोकसभा मतदारसंघ युती अंतर्गत शिवसेनेकडे आहे. त्यामुळे काही दिवसांपूर्वी खंडाळा कुस्तिगीर संघाचे अध्यक्ष पुरुषोत्तम जाधव हे शिवसेनेकडून लोकसभा लढवण्यासाठी इच्छुक होते व त्यासाठी त्यांनी शिवसेनेत प्रवेशही केला होता. मात्र नरेंद्र पाटलांनी थेट मुख्यमंत्र्यांकडून ‘जॅक’ लावून ‘मातोश्री’वर जाऊन शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्याकडे आपल्या उमेदवारीची गळ घातली होती. दरम्यान, आज महायुतीच्या कोल्हापुरात झालेल्या मेळाव्यात राष्ट्रवादीचे खासदार उदयनराजेंच्या विरोधात नरेंद्र पाटील यांना सातारा लोकसभेची उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे.
सातारा जिल्ह्यात तब्बल पन्नास हजार नवमतदार |
स्व. यशवंतराव चव्हाण यांना भारतरत्न देण्याची मागणी पंतप्रधान मोदींकडे करणार |
कराड तालुक्याच्या विकासासाठी एकत्र प्रयत्न करूया: खा. उदयनराजे भोसले |
खोऱ्याने मते घेणाऱ्या नेत्यांनी केले पाटण खोऱ्याकडे दुर्लक्ष |
सातारा जिल्ह्यातील दोन पोलिस अधिकाऱ्यांसह ११ जणांना महासंचालक सन्मानचिन्ह जाहीर |
सांगलीच्या सिंचनासाठी मागणी झाली कमी |
पोटात चाकू भोसकून एकाला जिवे मारण्याचा प्रयत्न |
ठोसेघर येथे एकाचा डोक्यात दगड घालून निर्घृण खून |
उंच भरारी योजनेचे ब्रँन्ड ऍम्बेसिडर म्हणून मोनिका राठी तसेच सौरभ भोसले यांची निवड |
केट्स पॉईंट वरुन आत्महत्त्या केलेल्याचा मृतदेह दरीबाहेर काढण्यात यश |
शेंद्रे येथील तिहेरी अपघात प्रकरणी तिघांवर गुन्हा |
सुमारे अडीच लाखांच्या बांधकाम साहित्याची चोरी |
एकास मारहाण केल्याप्रकरणी पाच जणांवर गुन्हा |
सातार्यातून युवक बेपत्ता |
नागठाण्यात युवकाची आत्महत्या |
सांगलीच्या सिंचनासाठी मागणी झाली कमी |
पोटात चाकू भोसकून एकाला जिवे मारण्याचा प्रयत्न |
ठोसेघर येथे एकाचा डोक्यात दगड घालून निर्घृण खून |
उंच भरारी योजनेचे ब्रँन्ड ऍम्बेसिडर म्हणून मोनिका राठी तसेच सौरभ भोसले यांची निवड |
केट्स पॉईंट वरुन आत्महत्त्या केलेल्याचा मृतदेह दरीबाहेर काढण्यात यश |
शेंद्रे येथील तिहेरी अपघात प्रकरणी तिघांवर गुन्हा |
सुमारे अडीच लाखांच्या बांधकाम साहित्याची चोरी |
एकास मारहाण केल्याप्रकरणी पाच जणांवर गुन्हा |
सातार्यातून युवक बेपत्ता |
नागठाण्यात युवकाची आत्महत्या |
उदयनराजे यांना मतदान करून गादीचा सन्मान ठेवा |
जपानचे स्लिम लँडर तिसऱ्यांदा जागृत |
कोल्हापुरातील अंबाबाईच्या रथोत्सव |
छत्रपतींच्या वंशजांना जावळीचा स्वाभिमान सांगू नका |
माझ्याकडे विरोधकांच्या अनेक भानगडी |