04:24pm | Mar 07, 2018 |
सातारा : जिल्ह्यात खळबळ माजवणारा आणि जिल्ह्यातील महसूल विभागाच्या अब्रुची लक्तरे वेशीवर टांगणारा तेटली, ता. जावली येथलि बोगस सातबारा प्रकरणी सातार्यातील स्थानिक गुन्हे शाखेने यापूर्वीच जावली तालुक्यासह सातार्यातील बड्या धेंडांना अटक केली होती. असे असतानाच काल रात्री दिनांक 6 रोजी स्थानिक गुन्हे शाखेने या प्रकरणी पोलीस पाटलासह राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या पदाधिकार्याला अटक केल्यामुळे जिल्ह्यातील राजकीय वर्तुळासह महसूल विभागामध्ये खळबळ उडाली आहे. तेटली बोगस सातबारा प्रकरण सुरुवातीपासून धसास लावण्यासाठी सातारा टुडे ने वस्तुनिष्ठ वार्तांकन केले होते. याची दखल मुख्यमंत्री कार्यालयासह सातारा जिल्हाधिकारी श्वेता सिंघल, सातारा पोलीस अधीक्षक संदीप पाटील यांना घ्यावी लागली होती. त्यामुळे या प्रकरणाची पाळेमुळे खणण्यासाठी सातारा टुडेने नेहमीच पुढाकार घेतला असल्यामुळे हे प्रकरण धसास लावण्यामध्ये सातारा टुडे चा सिंहाचा वाटा आहे.
याबाबतची सविस्तर माहिती अशी की, तेटली, ता. जावली येथे बोगस सातबारा तयार करुन त्याद्वारे शासनाच्या जमिनीची परस्पर विक्री केल्याचे प्रकरण सातारा टुडे ने उजेडात आणले होते. या प्रकरणाची व्याप्ती मोठी आहे. तसेच राजकीय, सामाजिक व महसूल विभागातीलही काही लोकांचा या प्रकरणात सहभाग असल्याबाबत सातारा टुडे ने वार्तांकन केले होते. त्यामुळे सातारा जिल्हाधिकारी कार्यालय व पोलीस यंत्रणा खडबडून जागी झाली होती. या दोन्ही यंत्रणांनी हाच धागा पकडून तपास केल्याने अनेक धक्कादायक बाबी समोर आलेल्या आहेत. तेटली, ता. जावली, जि. सातारा येथील सर्व्हे नं. 104/2, 109/4 मधील पैकी जमीन 1 हेक्टर 10 आर, 60 गुंठे, 8 गुंठे असे सर्व्हे नंबर अस्तित्वात नसताना त्या सर्व्हे नंबरचे बनावट ऑनलाईन सातबारे अस्तित्वात आणून त्या आधारे सातारा येथील बांधकाम व्यावसायिक श्रीधर कंग्राळकर, त्यांची पत्नी व मुलाच्या नावे बनावट साठेखत व खरेदीपत्र तयार करुन त्यांच्याकडून या व्यवहारासाठी 20 लाख रुपये घेतल्याची फिर्याद श्रीधर कंग्राळकर व त्यांच्या कुटूंबियांनी 29 जानेवारी रोजी मेढा पोलीस ठाण्यात दिली होती.
या प्रकरणाचा तपास सातारा येथील स्थानिक गुन्हे शाखा करीत आहे. त्या अनुषंगाने सातारा गुन्हे शाखा व मेढा पोलिसांनी संयुक्तरित्या या गुन्ह्याचा तपास केल्यानंतर नितीन भानुदास काळे (वय 34, रा. सैदापूर, ता. जि. सातारा), दिलीप भुवाल सहाणी (वय 27, रा. सैदापूर, सातारा), भरत नामदेव सूर्यवंशी (वय 32 रा. लांडेवाडी, औध, ता. खटाव, जि. सातारा), राहुल आनंद धनावडे (वय 28, रा. विवर, ता. जावली, जि. सातारा), संभाजी रावसाहेब घाटगे (वय 57 रा. सैदापूर, ता. जि. सातारा), सारिका राजेंद्र जाधव (वय 37 रा. आंबवडे खु. ता. जि. सातारा) यांचा या गुन्ह्यामध्ये सहभाग आढळून आल्यानंतर बोगस सातबारा तयार करणे, त्याद्वारे त्याचे दस्तावेज अस्तित्वात आणल्या प्रकरणी व बांधकाम व्यावसायिक श्रीधर कंग्राळकर यांची फसवणूक केल्याप्रकरणी त्यांच्या विरोधात मेढा पोलीस ठाण्यात भादंवि 420, 465, 466, 467, 468, 471, 472, 120 ब सह माहिती तंत्रज्ञान अधिनियम कलम 66, 66 क, 66 ड या कलमान्वये गुन्हा नोंद करून सबंधित संशयितांना अटक करण्यात आली होती. यातील काही संशयितांना याप्रकरणी जामीन मिळाला आहे.
एकूणच या प्रकरणाची व्याप्ती मोठी असल्यामुळे अनेक संशयितांची धरपकड सुरु आहे. जिल्ह्यातील अनेक राजकीय पुढार्यांचाही या प्रकरणामध्ये सहभाग आहे. अनेकांनी आपापले गॉडफादर शेधून कातडी बचाव पवित्रा घेतलेला आहे. याचाच परिपाक म्हणून काल दि. 6 रोजी सातारा स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेने संतोष काशीनाथ मालुसरे (वय ४०) रा. फूरुस ता. जावली या राष्ट्रवादीच्या पदाधिकार्यासह एकनाथ देवजी मालुसरे (वय ६३) रा. केळघर तर्फ सोळशी ता. जावली या माजी पोलीस पाटलाला काल मध्यरात्री १२:३० च्या सुमारास अटक केली आहे. आज त्यांना मेढा येथील प्रथम वर्ग न्यायदंडाधिकार्यांसमोर हजर केले जाणार आहे.
तेटली बोगस सातबारा प्रकरण दिसते एवढे नक्कीच सोपे नाही या बोगस सातबारा प्रकरणात अजूनही बढ्या राजकीय धेंडांचा समावेश आहे. या प्रकरणात पोलीस आपली भूमिका चोख बजावत आहेत. मात्र या प्रकरणात महसूल विभागाने प्रथमपासूनच सावध भूमिका घेतली आहे. या अतीसावध भूमिकेमुळेमुळेच तेटली बोगस सातबारा प्रकरणाप्रमाणेच जिल्ह्यातील इतर अनेक प्रकरणे दाबली जाण्याची शक्यता निर्माण झाली आहे. जिल्ह्यात अनेक ठिकाणी भूमाफीयांनी अश्या प्रकारे बोगस सातबारे तयार करून शासकीय जमिनीवर डल्ला मारला आहे. मात्र "दुसर्याच्या काठीने साप मारण्याची सवय लागलेल्या महसूल विभाग मात्र अजूनही कुंभकर्णी झोपेत असल्यामुळे आश्चर्य व्यक्त केले जात आहे. दरम्यान हा तपास सातारा येथील स्थानिक गुन्हे शाखेकडे असल्याने त्यांनी प्रथम पासूनच या प्रकरणात खमक्या पद्धतीने तपास करून अनेकांच्या मुसक्या आवळल्या आहेत. दरम्यान काल रात्री स्थानिक गुन्हे शाखेने या प्रकरणी दोघांना अटक करून आपली आगामी भूमिका स्पष्ट केली आहे.
सातारा जिल्ह्यात तब्बल पन्नास हजार नवमतदार |
स्व. यशवंतराव चव्हाण यांना भारतरत्न देण्याची मागणी पंतप्रधान मोदींकडे करणार |
कराड तालुक्याच्या विकासासाठी एकत्र प्रयत्न करूया: खा. उदयनराजे भोसले |
खोऱ्याने मते घेणाऱ्या नेत्यांनी केले पाटण खोऱ्याकडे दुर्लक्ष |
सातारा जिल्ह्यातील दोन पोलिस अधिकाऱ्यांसह ११ जणांना महासंचालक सन्मानचिन्ह जाहीर |
सांगलीच्या सिंचनासाठी मागणी झाली कमी |
पोटात चाकू भोसकून एकाला जिवे मारण्याचा प्रयत्न |
ठोसेघर येथे एकाचा डोक्यात दगड घालून निर्घृण खून |
उंच भरारी योजनेचे ब्रँन्ड ऍम्बेसिडर म्हणून मोनिका राठी तसेच सौरभ भोसले यांची निवड |
केट्स पॉईंट वरुन आत्महत्त्या केलेल्याचा मृतदेह दरीबाहेर काढण्यात यश |
शेंद्रे येथील तिहेरी अपघात प्रकरणी तिघांवर गुन्हा |
सुमारे अडीच लाखांच्या बांधकाम साहित्याची चोरी |
एकास मारहाण केल्याप्रकरणी पाच जणांवर गुन्हा |
सातार्यातून युवक बेपत्ता |
नागठाण्यात युवकाची आत्महत्या |
सांगलीच्या सिंचनासाठी मागणी झाली कमी |
पोटात चाकू भोसकून एकाला जिवे मारण्याचा प्रयत्न |
ठोसेघर येथे एकाचा डोक्यात दगड घालून निर्घृण खून |
उंच भरारी योजनेचे ब्रँन्ड ऍम्बेसिडर म्हणून मोनिका राठी तसेच सौरभ भोसले यांची निवड |
केट्स पॉईंट वरुन आत्महत्त्या केलेल्याचा मृतदेह दरीबाहेर काढण्यात यश |
शेंद्रे येथील तिहेरी अपघात प्रकरणी तिघांवर गुन्हा |
सुमारे अडीच लाखांच्या बांधकाम साहित्याची चोरी |
एकास मारहाण केल्याप्रकरणी पाच जणांवर गुन्हा |
सातार्यातून युवक बेपत्ता |
नागठाण्यात युवकाची आत्महत्या |
उदयनराजे यांना मतदान करून गादीचा सन्मान ठेवा |
जपानचे स्लिम लँडर तिसऱ्यांदा जागृत |
कोल्हापुरातील अंबाबाईच्या रथोत्सव |
छत्रपतींच्या वंशजांना जावळीचा स्वाभिमान सांगू नका |
माझ्याकडे विरोधकांच्या अनेक भानगडी |