वडूज : येथील पांडुरंग उर्फ दादासो ज्ञानदेव यादव (वय 70 ) यांनी झाडाला गळफास घेऊन आत्महत्या केल्याने वडूज परिसरात खळबळ उडाली.
याबाबत तक्रारी अर्जात असे नमूद केले होते की, संजय किसन जाधव, उर्फ भैय्या रा.पुसेसावळी, ता.खटाव,जि.सातारा याच्या कडून चार लाख रुपये दहा टक्के व्याजाने घेतले होते. त्यावेळी विजयचे वडिल पांडुरंग उर्फ दादासो ज्ञानदेव यादव यांच्याकडून साडेचार लाख रुपयांचे चेक घेतले होते. सदर रक्कमेपैकी आजअखेर दोन लाख रुपये व मायनी अर्बन बँकेच्या चेक ने 2 लाख 72 हजार रुपये दिलेले होते. असे मिळून 4 लाख 72 हजार जाधव यांच्या अकाउंट मध्ये जमा करून घेतले. सदरची रक्कम देतेवेळी पांडुरंग यादव यांच्याकडून साडेचार लाख रुपयांचा घेतलेले चेक संजय जाधव यांच्याकडेच आहेत. असे असतानाही देखील संजय जाधव यांनी पांडुरंग यादव यांच्याकडून दमदाटीने वडूज येथील गट क्रमांक 70/11/1/2 या जमीन मिळकती मधील 0.4 हेक्टर क्षेत्राचा दस्ताऐवज करून घेतला आहे.
मात्र पैसे दिले नाहीत. पण दस्तामध्ये सदर मिळकतीची खरेदी किंमत रक्कम रु.20 लाख,95 हजार दाखविण्यात आलेली आहे. तसेच संजय जाधव यांचा साथीदार किरण लोहारा रा.पुसेसावळी,ता.खटाव,जि.सातारा याच्या कडून संजय जाधव यांचे व्याजाचे पैसे देणेकरीता किरण लोहारा यांचेकडून रक्कम रु 40 हजार रुपये दहा टक्के व्याजाने घेवून संजय जाधव यांचे व्याजाचे पैसे दिले. त्यानंतर आणखी रक्कम 75 हजार रुपये दिले. त्यानंतर लोहारा यांना वेळोवेळी व्याज देवून, रक्कम 1 लाख रुपये एवढी रक्कम दिली आहे. तसेच माझेकडून सदर रक्कमेपोटी बँक ऑफ इंडियाचे कोरे सही केलेले दोन चेक त्यांनी घेतले घेतलेले आहेत. असे असतांना लोहारा यांनी इनोव्हा गाडी क्र.एमएच.02-ओएल-7362 ही गाडी दम-दाटी देवून घेवून गेले असल्याची लेखी तक्रार मृत पांडुरंग यांचा मुलगा विजय यादव याने लेखी तक्रारी अर्ज पोलीस ठाण्यात दिली होती.
यांबाबत घटनास्थळावरून समजलेली माहिती अशी की, पांडुरंग उर्फ दादासो ज्ञानदेव यादव यांचा मुलगा विजय पांडुरंग यादव याने खाजगी सावकाराकडून चार लाख रुपये दहा टक्के व्याजाने घेतले होते. त्याबदल्यात खाजगी सावकाराने साडे चार रुपयांचा चेक घेतले होते. खाजगी सावकाराच्या तगदयाला कंटाळून यापूर्वी जिल्हा पोलिस अधिक्षक, उपविभागीय पोलीस अधिकारी, वडूज पोलीस निरीक्षक यांच्याकडे खाजगी सावकारीच्या विरोधात तक्रारी अर्ज दिलेला होता. मात्र यावर पोलिसांनी कोणतीही दखल अथवा कारवाई न केल्याने आणि खाजगी सावकारांच्या तगादा मागे लागल्याने पांडुरंग यादव यांनी शनिवार दि. 8 रोजी सायंकाळी चार च्या सुमारास पेडगाव रोड येथील विठ्ठलनगर परिसरातील झाडाला गळफास घेऊन आत्महत्या केली. सदर घटना स्थळावर त्यांच्या कुटूंबातील मुलगा व नातेवाईक यांनी आक्रोश करीत आत्महत्येस जबाबदार असणाऱ्या उपविभागीय पोलीस अधिकारी बी. बी. महामुनी व पोलीस निरीक्षक अशोक पाटील यांच्यावर आणि खाजगी सावकार संजय किसन जाधव (रा. पुसेसावळी), त्याचा साथीदार किरण लोहारा ( रा. पुसेसावळी) आदींच्यावर गुन्हा दाखल होत नाही तोपर्यत आत्महत्या केलेला मृतदेह झाडापासून काढण्यास त्यांनी विरोध केला. त्यामुळे घटनास्थळावर मोठी खळबळ माजली.
सातारा जिल्ह्यात तब्बल पन्नास हजार नवमतदार |
स्व. यशवंतराव चव्हाण यांना भारतरत्न देण्याची मागणी पंतप्रधान मोदींकडे करणार |
कराड तालुक्याच्या विकासासाठी एकत्र प्रयत्न करूया: खा. उदयनराजे भोसले |
खोऱ्याने मते घेणाऱ्या नेत्यांनी केले पाटण खोऱ्याकडे दुर्लक्ष |
सातारा जिल्ह्यातील दोन पोलिस अधिकाऱ्यांसह ११ जणांना महासंचालक सन्मानचिन्ह जाहीर |
सांगलीच्या सिंचनासाठी मागणी झाली कमी |
पोटात चाकू भोसकून एकाला जिवे मारण्याचा प्रयत्न |
ठोसेघर येथे एकाचा डोक्यात दगड घालून निर्घृण खून |
उंच भरारी योजनेचे ब्रँन्ड ऍम्बेसिडर म्हणून मोनिका राठी तसेच सौरभ भोसले यांची निवड |
केट्स पॉईंट वरुन आत्महत्त्या केलेल्याचा मृतदेह दरीबाहेर काढण्यात यश |
शेंद्रे येथील तिहेरी अपघात प्रकरणी तिघांवर गुन्हा |
सुमारे अडीच लाखांच्या बांधकाम साहित्याची चोरी |
एकास मारहाण केल्याप्रकरणी पाच जणांवर गुन्हा |
सातार्यातून युवक बेपत्ता |
नागठाण्यात युवकाची आत्महत्या |
सांगलीच्या सिंचनासाठी मागणी झाली कमी |
पोटात चाकू भोसकून एकाला जिवे मारण्याचा प्रयत्न |
ठोसेघर येथे एकाचा डोक्यात दगड घालून निर्घृण खून |
उंच भरारी योजनेचे ब्रँन्ड ऍम्बेसिडर म्हणून मोनिका राठी तसेच सौरभ भोसले यांची निवड |
केट्स पॉईंट वरुन आत्महत्त्या केलेल्याचा मृतदेह दरीबाहेर काढण्यात यश |
शेंद्रे येथील तिहेरी अपघात प्रकरणी तिघांवर गुन्हा |
सुमारे अडीच लाखांच्या बांधकाम साहित्याची चोरी |
एकास मारहाण केल्याप्रकरणी पाच जणांवर गुन्हा |
सातार्यातून युवक बेपत्ता |
नागठाण्यात युवकाची आत्महत्या |
उदयनराजे यांना मतदान करून गादीचा सन्मान ठेवा |
जपानचे स्लिम लँडर तिसऱ्यांदा जागृत |
कोल्हापुरातील अंबाबाईच्या रथोत्सव |
छत्रपतींच्या वंशजांना जावळीचा स्वाभिमान सांगू नका |
माझ्याकडे विरोधकांच्या अनेक भानगडी |