02:39pm | Mar 04, 2018 |
सातारा : सत्ता लोकांसाठी राबवा, सत्तेचा उन्माद करु नका, जनता बरोबर असली तर आणि तरच लोकप्रतिनिधींना किंमत आहे, तुम्ही चांगलेच विकास कार्य ग्रामस्थांसाठी करणार यात आम्हाला शंका नाही, तुमच्या प्रत्येक कार्यातुन नेहमी सर्वांगिण विकास साधला गेला पाहीजे अशा शब्दात, खासदार श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले यांनी नवनिर्वाचित सदस्यांना उद्युक्त करताना, सदैव लोकांबरोबर रहा असा मार्मिक सल्ला दिला.
परळी खोर्यातील मौजे लुमणेखोल येथील ग्रामपंचायतीवर निर्विवाद वर्चस्व मिळवलेल्या खासदार श्रीमंत छत्रपती उदयनराजे गटाच्या नवनिर्वाचित सदस्यांचा सत्कार करताना, खासदार श्रीमंत छत्रपती उदयनराजे अनौपचारीक बोलत होते.यावेळी माजी पंचायत समिती सदस्य बबनराव देवरे, जिल्हापरिषदेचे माजी सभापती सुनील काटकर, जिल्हापरिषदेचे माजी उपाध्यक्ष रवि साळुंखे, माजी जिल्हापरिषद सदस्य भिकूभाउ भोसले, उरमोडी धरणग्रस्त समितीचे अध्यक्ष वसंतराव भंडारे प्रमुख उपस्थित होते.
सातारा लगत परळी खोर्यातील जनता,खासदार श्रीमंत छत्रपती उदयनराजें भोसले यांना मानणारी आहे. राज्य सरकारचे आधी धरण मग पूनर्वसन या धोरणात आधी पूनर्वसन आणि मग धरण अशी जाहिर भुमिका मांडून धरणग्रस्तांचे तारणहार असलेल्या खासदार उदयनराजेंवर परळी खोर्यातील जनतेचा प्रचंड विश्वास आहे. त्यामुळेच येथुन पुढील काळात, परळी खोर्यात उदयनराजेंच्या नेतृत्वाखाली निरंतर विकास साधण्याचा प्रयत्न केला जाईल असे उद्गार यावेळी पंचायत समितीचे माजी सदस्य बबनराव देवरे यांनी व्यक्त केले.
यावेळी उदयनराजे गटाच्या सुरुवातील बिनविरोध निवडुन आलेल्या तसेच पांच जागांसाठी झालेल्या निवडणुकीत निवडुन आलेले सदस्य सौ.रंजना लाड,हणमंत राउत, यांचेसह सरपंच सौ.कोमल दिपेंद्र भंडारे,सदस्य सौृकलाबाई श्रीरंग माने, कमल नारायण माने, संपत आनंदा माने, किसन भिकू चिकणे, यांचा सत्कार खासदार श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले यांनी करताना त्यांना शुभेच्छा दिल्याृ.
यावेळी आर.वाय .जाधवसर, लक्ष्मण गुजर, महाराष्ट्र प्रकल्पग्रस्त संघटनेचे अध्यक्ष नानासाहेब शिंदे,ग्रामस्थ मंडळ, लुमणेखोल, मुंबई मंडळाचे अध्यक्ष अशोकराव माने, ग्रामस्थ मंडळाचे अध्यक्ष रविंद्र भंडारे, वसंतराव माने, सुरेंद्र भंडारे, हणमंतराव भिलारे, तुकाराम बा. माने, जयराम भंडारे, रविंद्र माने, मारुती भि.माने, बाबुराव भंडारे गुरुजी, मनोहर भंडारे, अरुण माने, प्रदिप शं.माने, विजय भंडारे, शंकर लाड, अशोक भंडारे, माजी सरपंच श्रीमती लक्ष्मीबाई जगन्नाथ माने, यांचेसह बहुसंख्य ग्रामस्थ उपस्थित होते.
दरम्यान, जावली तालुक्यातील बेलावडे येथील ग्रामपंचायत सार्वत्रिक निवडणुकीत सरपंचांसह सर्व सदस्य खासदार श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले यांना मानणारे निवडुन आलेले आहेत. तर सातारा शहरालगल कोंडवे, संभाजीनगर, खिंडवाडी येथील प्रतिष्ठेच्या ठरलेल्या पोटनिवडणुकीतही खासदार श्रीमंत छत्रपतीउदयनराजे भोसले यांना मानणारे सदस्य मोठया फरकाने निवडुन आले.
सातारा जिल्ह्यात तब्बल पन्नास हजार नवमतदार |
स्व. यशवंतराव चव्हाण यांना भारतरत्न देण्याची मागणी पंतप्रधान मोदींकडे करणार |
कराड तालुक्याच्या विकासासाठी एकत्र प्रयत्न करूया: खा. उदयनराजे भोसले |
खोऱ्याने मते घेणाऱ्या नेत्यांनी केले पाटण खोऱ्याकडे दुर्लक्ष |
सातारा जिल्ह्यातील दोन पोलिस अधिकाऱ्यांसह ११ जणांना महासंचालक सन्मानचिन्ह जाहीर |
सांगलीच्या सिंचनासाठी मागणी झाली कमी |
पोटात चाकू भोसकून एकाला जिवे मारण्याचा प्रयत्न |
ठोसेघर येथे एकाचा डोक्यात दगड घालून निर्घृण खून |
उंच भरारी योजनेचे ब्रँन्ड ऍम्बेसिडर म्हणून मोनिका राठी तसेच सौरभ भोसले यांची निवड |
केट्स पॉईंट वरुन आत्महत्त्या केलेल्याचा मृतदेह दरीबाहेर काढण्यात यश |
शेंद्रे येथील तिहेरी अपघात प्रकरणी तिघांवर गुन्हा |
सुमारे अडीच लाखांच्या बांधकाम साहित्याची चोरी |
एकास मारहाण केल्याप्रकरणी पाच जणांवर गुन्हा |
सातार्यातून युवक बेपत्ता |
नागठाण्यात युवकाची आत्महत्या |
सांगलीच्या सिंचनासाठी मागणी झाली कमी |
पोटात चाकू भोसकून एकाला जिवे मारण्याचा प्रयत्न |
ठोसेघर येथे एकाचा डोक्यात दगड घालून निर्घृण खून |
उंच भरारी योजनेचे ब्रँन्ड ऍम्बेसिडर म्हणून मोनिका राठी तसेच सौरभ भोसले यांची निवड |
केट्स पॉईंट वरुन आत्महत्त्या केलेल्याचा मृतदेह दरीबाहेर काढण्यात यश |
शेंद्रे येथील तिहेरी अपघात प्रकरणी तिघांवर गुन्हा |
सुमारे अडीच लाखांच्या बांधकाम साहित्याची चोरी |
एकास मारहाण केल्याप्रकरणी पाच जणांवर गुन्हा |
सातार्यातून युवक बेपत्ता |
नागठाण्यात युवकाची आत्महत्या |
उदयनराजे यांना मतदान करून गादीचा सन्मान ठेवा |
जपानचे स्लिम लँडर तिसऱ्यांदा जागृत |
कोल्हापुरातील अंबाबाईच्या रथोत्सव |
छत्रपतींच्या वंशजांना जावळीचा स्वाभिमान सांगू नका |
माझ्याकडे विरोधकांच्या अनेक भानगडी |