RNI REG.NO. MAHMAR/2014/56135

What are you looking for?

Contact Us

Address:

Email:

Tel:

Sadar Bazar, Satara, Maharashtra 415001

contact@tmnnews.com

02162 237 474

What are you looking for?

×

'... तर मोदींना मारणार'; बडतर्फ जवानाचा व्हिडिओ

07 May 2019 at 15:19

नवी दिल्ली : वाराणसी मतदार संघातून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या विरोधात उमेदवारी अर्ज दाखल करणारे बीएसएफचे बडतर्फ जवान तेजबहादूर यादव यांचा एक व्हिडिओ चांगलाच व्हायरल होत आहे. 'तुम्ही मला ५० कोटी द्या, मी मोदींना मारतो', असे आक्षेपार्ह वक्तव्य यादव या व्हिडिओत करताना दिसत आहेत. यादव यांना विचारलेल्या एका प्रश्नाला उत्तर देताना त्यांनी हे विधान केले आहे. मात्र, आपण तेव्हा नशेत होतो आणि आता आपल्याला ब्लॅकमेल करण्यासाठी या व्हिडिओचा वापर केला जात असे असे यादव यांचे म्हणणे आहे. 

तुम्ही मोदी यांना मारू शकता का?, असा प्रश्न एका व्यक्तीने यादव यांना विचारला. त्याला उत्तर देताना यादव यांनी वरील आक्षेपार्ह विधान केले. या उत्तरावर व्हिडिओत यादव यांना उद्देशून एक व्यक्ती म्हणते, ' भारतात तर कुणी देणार नाही, ( ५० कोटी) पाकिस्तानात देणार.' या उत्तर देताना पुन्हा तेजबहादूर म्हणतात, ' मी देशाशी द्रोह करू शकत नाही.' हा व्हिडिओ आपलाच असून तो मे-जून २०१७ मधील असल्याचे यादव यांनी स्पष्ट केले आहे. 

त्या वेळी निवडणूक लढवण्याचा माझा इरादा नव्हता. मात्र, मला नोकरीवरून काढून टाकल्यानंतर दिल्लीत झालेल्या आंदोलनादरम्यान अनेक लोकांनी माझी भेट घेतली, असे यादव यांनी सांगितले. हा व्हिडिओ तयार करणाऱ्यांचा नेमका उद्देश काय होता हे मला माहीत नव्हते. लष्करात तर दारू पिण्यास मुभा आहे, असेही अनेक लोक त्यावेळी म्हणत होते, असेही ते म्हणाले. माझा विरोध करण्यासाठी भारतीय जनता पक्षाचे लोक काय काय बाहेर काढतील याचा नेम नाही, असे म्हणत तेजबहादूर यांनी भाजपवर टीका केली. 

दरम्यान, पंतप्रधान मोदी यांच्या विरोधातील विरोधकांच्या हिंसक योजना पाहून आम्ही स्तब्ध आहोत अशी प्रतिक्रिया भाजप प्रवक्ता जी. व्ही. एल. नरसिंह यांनी व्यक्त केली आहे. 

समाजवादी पक्षाने वाराणसीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या विरोधात तेजबहादूर यादव यांना उमेदवारी दिली होती. मात्र त्यांचा उमेदवारी अर्ज रद्द झाला. लष्करात निकृष्ट दर्जाचे जेवण मिळण्याबाबतचा तेजबहादूर यांचा व्हिडिओ व्हायरल झाला होता. त्यानंतर त्यांच्यावर शिस्तभंगाची कारवाई करत नोकरीवरून काढून टाकण्यात आले होते. 

 

देशात 2014 पेक्षा मोठी मोदी लाट!

देशात पुन्हा मोदी लाट आली असून, भाजपने एकट्याने 299 मतदारसंघात आघाडी घेतली आहे. भाजपच्या नेतृत्वाखालील एनडीए 349 मतदारसंघात आघाडीवर आहे. त्यामुळे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली भाजपला एकट्याला पुन्हा बहुमत मिळणार आहे.

4 hours before

जम्मू-काश्मीरमध्ये चकमकीत दहशतवादी ठार

जम्मू-काश्मीरमधील कुलगाममध्ये सुरक्षा रक्षक आणि दहशतवादी यांच्यामध्ये झालेल्या चकमकीत एक दहशतवादी ठार झाला आहे. परिसरामध्ये काही दहशतवादी लपल्याची माहिती असून, जवानांनी शोध मोहिम सुरू ठेवली आहे, अशी माहिती अधिकाऱयांनी आज (बुधवार) दिली.

yesterday