नवी दिल्ली : ‘लष्कर- ए- तोयबा’ या दहशतवादी संघटनेने आता नवीन मोबाईल फोनची निर्मिती केली असून हे फोन ट्रेस करता येणार नाही. भारतीय सैन्याने कुपवाडा येथून अटक केलेल्या दहशतवाद्याच्या चौकशीतून हा खुलासा झाला आहे.
सुरक्षा दलांनी एप्रिलमध्ये कुपवाडा येथून झैबुल्लाह उर्फ हमझा या दहशतवाद्याला अटक केली होती. २० वर्षांचा झैबुल्लाह हा मूळचा पाकिस्तानचा असून त्याचे वडील पाकमधील आयकर विभागात अधिकारी आहेत. झैबुल्लाह आणि त्याचे पाच साथीदार पाकव्याप्त काश्मीरमधून मार्चमध्ये भारतात आले. २० मार्च रोजी झालेल्या चकमकीत त्याचे पाच साथीदार मारले गेले. या चकमकीत झैबुल्लाह देखील जखमी झाला. पण तिथून पळ काढण्यात तो यशस्वी झाला होता. अखेर ७ एप्रिल रोजी तो सुरक्षा दलांच्या जाळ्यात अडकला. झैबुल्लाहची राष्ट्रीय तपास यंत्रणेच्या (एनआयए) अधिकाऱ्यांनी कसून चौकशी केली असता त्याने काही धक्कादायक खुलासे केले आहेत.
अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर
लष्कर- ए- तोयबाने दहशतवादी कारवायांसाठी आता अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर सुरु केल्याचे झैबुल्लाहने सांगितले. ‘लष्कर’ने स्वत: मोबाईल फोन तयार केले असून हे मोबाईल फोन ट्रेस करता येत नाही. तसेच या फोनमध्ये एक चिप टाकल्यावर मोबाईलपासून जवळ जो टॉवर असेल त्याचं नेटवर्क पकडेल. या आधारे फोनवरुन कॉल करणे शक्य होईल. गुप्तचर यंत्रणांनी हा कॉल टॅप करण्याचा प्रयत्न केला तर तो कॉल कट होऊन जाईल, अशी माहिती झैबुल्लाहने दिली आहे. एनआयएने ही माहिती गुप्तचर यंत्रणांना दिली असून याबाबत अधिक माहिती घेतली जात आहे, असे सूत्रांनी सांगितले.
बुरहान वानी आणि दहशतवाद्यांची भरती
२० वर्षांचा झैबुल्लाह २०१७ मध्ये ‘लष्कर’मध्ये सामील झाला. पाकिस्तानच्या कानाकोपऱ्यातून जवळपास ४५० तरुणांना ‘जिहाद’साठी संघटनेत सामील करुन घेण्यात आले. दहशतवाद्यांच्या प्रशिक्षण तळावर आलेली मुले १५ ते २५ वर्षे या वयोगटातील होती, अशी माहिती झैबुल्लाहने दिली. बुरहान वानीचा दाखला देत या तरुणांची माथी भडकवली जात होती आणि त्यांचे ब्रेन वॉ़श केले जात होते, असे चौकशीतून उघड झाले आहे. ‘लष्कर’च्या तळावर झकीऊर रेहमान लख्वी हा देखील आला होता, असे त्याने एनआयएच्या अधिकाऱ्यांना दिली.
सातारा जिल्ह्यात तब्बल पन्नास हजार नवमतदार |
स्व. यशवंतराव चव्हाण यांना भारतरत्न देण्याची मागणी पंतप्रधान मोदींकडे करणार |
कराड तालुक्याच्या विकासासाठी एकत्र प्रयत्न करूया: खा. उदयनराजे भोसले |
खोऱ्याने मते घेणाऱ्या नेत्यांनी केले पाटण खोऱ्याकडे दुर्लक्ष |
सातारा जिल्ह्यातील दोन पोलिस अधिकाऱ्यांसह ११ जणांना महासंचालक सन्मानचिन्ह जाहीर |
सांगलीच्या सिंचनासाठी मागणी झाली कमी |
पोटात चाकू भोसकून एकाला जिवे मारण्याचा प्रयत्न |
ठोसेघर येथे एकाचा डोक्यात दगड घालून निर्घृण खून |
उंच भरारी योजनेचे ब्रँन्ड ऍम्बेसिडर म्हणून मोनिका राठी तसेच सौरभ भोसले यांची निवड |
केट्स पॉईंट वरुन आत्महत्त्या केलेल्याचा मृतदेह दरीबाहेर काढण्यात यश |
शेंद्रे येथील तिहेरी अपघात प्रकरणी तिघांवर गुन्हा |
सुमारे अडीच लाखांच्या बांधकाम साहित्याची चोरी |
एकास मारहाण केल्याप्रकरणी पाच जणांवर गुन्हा |
सातार्यातून युवक बेपत्ता |
नागठाण्यात युवकाची आत्महत्या |
सांगलीच्या सिंचनासाठी मागणी झाली कमी |
पोटात चाकू भोसकून एकाला जिवे मारण्याचा प्रयत्न |
ठोसेघर येथे एकाचा डोक्यात दगड घालून निर्घृण खून |
उंच भरारी योजनेचे ब्रँन्ड ऍम्बेसिडर म्हणून मोनिका राठी तसेच सौरभ भोसले यांची निवड |
केट्स पॉईंट वरुन आत्महत्त्या केलेल्याचा मृतदेह दरीबाहेर काढण्यात यश |
शेंद्रे येथील तिहेरी अपघात प्रकरणी तिघांवर गुन्हा |
सुमारे अडीच लाखांच्या बांधकाम साहित्याची चोरी |
एकास मारहाण केल्याप्रकरणी पाच जणांवर गुन्हा |
सातार्यातून युवक बेपत्ता |
नागठाण्यात युवकाची आत्महत्या |
उदयनराजे यांना मतदान करून गादीचा सन्मान ठेवा |
जपानचे स्लिम लँडर तिसऱ्यांदा जागृत |
कोल्हापुरातील अंबाबाईच्या रथोत्सव |
छत्रपतींच्या वंशजांना जावळीचा स्वाभिमान सांगू नका |
माझ्याकडे विरोधकांच्या अनेक भानगडी |