फलटण : सुरवडी ता. फलटण येथील कमिन्स इंडिया या कंपनीच्या सुपरवायझरला राहत्या घरी पार्किंगमध्ये तीन अज्ञात इसमांनी मारहाण केल्याची घटना फलटण येथे घडली आहे. मारहाण झालेल्या सुपरवायझर वरती खाजगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. फलटण शहर पोलीस ठाण्यात याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
फलटण शहर पोलिस ठाण्यातून मिळालेल्या माहितीनुसार, आज दि. 12 रोजी प्रशांतकुमार कार्तिक चंद्र जैना (वय - 32) मुळ राहणार सदानंदपूर जि. बालेश्वर, ओरिसा, हल्ली राहणार 406, हडको कॉलनी, फलटण ता. फलटण फिर्यादी यांना दुचाकीवरून आलेल्या अज्ञात बेदम मारहाण केली आहे. प्रशांतकुमार कार्तिक जैना यांनी दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे कि, नेहमीप्रमाणे मी सकाळी नऊ ते सायंकाळी साडेपाच पर्यत कमिन्स इंडियामध्ये ड्युटी असल्याने सकाळी साडे आठ वाजता माझ्या दुचाकीवरून कंपनीत ड्युटीकरीता गेले त्यावर दिवसभर ते ड्युटीवर होतो. आज सायंकाळी साडेपाच वाजता कामावरून सुटल्यानंतर संध्याकाळी साडे सहाच्या दरम्यान राहत असलेल्या ठिकाणी आलो असता, गाडी पार्किंग करीत असताना पाठीमागुन गेटमधुन कोणीतरी तीन इसम त्यांचे तोडास कपडा बांधलेले पाठीमागुन आले व त्यांनी काही एक न विचारता त्यांचे हातातील केबल वायरने डोक्यात तसेच डाव्या हातावर मारहाण करु लागले. त्यावर त्यांनी मारहाण करणाऱ्याना तुम्ही लोक का मारहाण करीत आहात. असे विचारले असता त्यांनी तु कंपनीत सुपरवाझरचे काम करतो म्हणून काहीही करणार का ? असे म्हणुन त्या तीन अज्ञात इसमानी केबल वायरने मारहाण केली. यावेळी जैना यांनी मोठ्याने त्यांचा मित्र राकेश यास आवाज दिल्याने तो रुममधुन धावत आला. त्यावर ते तिघेही अज्ञात मारहाण करणारे इसम तेथुन पळुन गेले. ते अज्ञात मारहाण करणारे इसम कोण होते ते जैना यांना समजले नाही. यानंतर जैना व त्यांचा मित्र राकेश यांनी फलटण शहर पोलीस ठाण्यात जाऊन मारहाण केले प्रकरणी अज्ञात तिघांच्या विरोधात तक्रार दाखल केली आहे. दरम्यान जैना उपचाराकरीता खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
सातारा जिल्ह्यात तब्बल पन्नास हजार नवमतदार |
स्व. यशवंतराव चव्हाण यांना भारतरत्न देण्याची मागणी पंतप्रधान मोदींकडे करणार |
कराड तालुक्याच्या विकासासाठी एकत्र प्रयत्न करूया: खा. उदयनराजे भोसले |
खोऱ्याने मते घेणाऱ्या नेत्यांनी केले पाटण खोऱ्याकडे दुर्लक्ष |
सातारा जिल्ह्यातील दोन पोलिस अधिकाऱ्यांसह ११ जणांना महासंचालक सन्मानचिन्ह जाहीर |
सांगलीच्या सिंचनासाठी मागणी झाली कमी |
पोटात चाकू भोसकून एकाला जिवे मारण्याचा प्रयत्न |
ठोसेघर येथे एकाचा डोक्यात दगड घालून निर्घृण खून |
उंच भरारी योजनेचे ब्रँन्ड ऍम्बेसिडर म्हणून मोनिका राठी तसेच सौरभ भोसले यांची निवड |
केट्स पॉईंट वरुन आत्महत्त्या केलेल्याचा मृतदेह दरीबाहेर काढण्यात यश |
शेंद्रे येथील तिहेरी अपघात प्रकरणी तिघांवर गुन्हा |
सुमारे अडीच लाखांच्या बांधकाम साहित्याची चोरी |
एकास मारहाण केल्याप्रकरणी पाच जणांवर गुन्हा |
सातार्यातून युवक बेपत्ता |
नागठाण्यात युवकाची आत्महत्या |
सांगलीच्या सिंचनासाठी मागणी झाली कमी |
पोटात चाकू भोसकून एकाला जिवे मारण्याचा प्रयत्न |
ठोसेघर येथे एकाचा डोक्यात दगड घालून निर्घृण खून |
उंच भरारी योजनेचे ब्रँन्ड ऍम्बेसिडर म्हणून मोनिका राठी तसेच सौरभ भोसले यांची निवड |
केट्स पॉईंट वरुन आत्महत्त्या केलेल्याचा मृतदेह दरीबाहेर काढण्यात यश |
शेंद्रे येथील तिहेरी अपघात प्रकरणी तिघांवर गुन्हा |
सुमारे अडीच लाखांच्या बांधकाम साहित्याची चोरी |
एकास मारहाण केल्याप्रकरणी पाच जणांवर गुन्हा |
सातार्यातून युवक बेपत्ता |
नागठाण्यात युवकाची आत्महत्या |
उदयनराजे यांना मतदान करून गादीचा सन्मान ठेवा |
जपानचे स्लिम लँडर तिसऱ्यांदा जागृत |
कोल्हापुरातील अंबाबाईच्या रथोत्सव |
छत्रपतींच्या वंशजांना जावळीचा स्वाभिमान सांगू नका |
माझ्याकडे विरोधकांच्या अनेक भानगडी |