03:06pm | Oct 23, 2018 |
कराड : शासनाच्या विविध योजनांचा प्रचार, प्रसार व्हावा तसेच राज्यातील तळागाळातील युवकांच्या कला-गुणांना वाव व प्रोत्साहन मिळावे या उद्देशाने भारतीय जनता युवा मोर्चाचे प्रदेशाध्यक्ष आ. योगेश टिळकेर यांच्या नेतृत्वाखाली क्रिडा व सांस्कृतिक स्पर्धांचे आयोजन करण्यात आले आहे. दि.३० ऑक्टोबर पासून होणार्या या स्पर्धा ७५ दिवस चालणार असून, विधानसभा क्षेत्र स्तरावर राज्यातील बाब म्हणजे या स्पर्धेत खेळविल्या जाणार्या विविध क्रिडा प्रकाराला केंद्र तसेच राज्य शासनाच्या विविध लोकाभिमुख योजनांची नांवे देण्यात आल आहेेत. सदर स्पर्धांच्या पश्चिम महाराष्ट्र (विभाग) सहसंयोजक पदी भारतीय जनता युवा मोर्चाचे चिटणीस सुदर्शन पाटसकर यांनी नियुक्ती करण्यात आली असून, त्यांच्या संयोजनाखाली पुणे, सातारा, सांगली, कोल्हापूर व सोलापूर जिल्हयातील स्पर्धा घेण्यात येणार आहेत.
भारतीय जनता पक्षाच्यावतीने राज्यातील सुमारे ३ कोटी जनतेशी थेट संपर्क साधण्याचे उद्दिष्ट निश्चित करण्यात आले आहे. त्याचाच एक भाग म्हणून भारतीय जनता युवा मोर्चाच्या माध्यमातून ५० लाख तरूणांशी संपर्क साधता यावा या उद्देशाने आ. योगेश टिळेकर यांच्या नेतृत्वाखाली व मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मार्गदर्शनाखाली सी.एम.चषक नावाने या स्पर्धांचे आयोजन करण्यात आले आहे. या स्पर्धेत सहभागी होणार्या खेळाडूंना विधानसभा क्षेत्र, जिल्हास्तर, विभागस्तर ते राज्यस्तरीय स्पर्धेत गुणवत्तेनुसार खेळता येणार आहे. तसेच स्पर्धेतील विजयी खेळाडू व संघ यांचा महामहिम राष्ट्रपती यांच्या हस्ते सन्मा केला जाणार आहे. दि. ३१ ऑक्टोबर रोजी राज्यातील सरकारला ४ वर्षे पूर्ण होत आहेत. त्या पार्श्वभूमीवर दि.३० ऑक्टोबर रोजी या स्पर्धा सुरू होणार असून दि.१२ जानेवारी रोजी स्वामी विवेकानंद यांच्या जयंती व राष्ट्रीय युवक दिनाचे महत्व लक्षात घेवून स्पर्धांचा समारोप होणार आहे.
स्पर्धेत सहभागी होण्यास इच्छूक असणार्या युवकांना ऑनलाईन तसेच ऑफलाईन नाव नोंदणी करता येणार आहे. पश्चिम विभागामध्ये एकूण १२ प्रकारच्या स्पर्धा होणार असून यामध्ये क्रिडा आयुष्यमान भारत क्रिकेट, जलयुक्त शिवार व्हॉलीबॉल, शेतकरी सन्मान कबड्डी, सौभाग्य खो-खो, कौशल्य भारत कॅरम, रिले १०० मी. व ४००मी., मॅरेथॉन स्पर्धा, स्वच्छ भारत कुस्ती तर सांस्कृतिक उज्वला नृत्य स्पर्धा, उजाला गायन स्पर्धा इंद्रधनुष्य चित्रकला, मेक इन इंडिया रांगोळी स्पर्धांचा समावेश करण्यात आला आहे. पश्चिम विभागात घेतल्या जाणार्या स्पर्धांचे नेतृत्व पश्चिम विभागाचे सह संयोजक सुदर्शन पाटसकर हे करणार आहेत.
एस.एम.एस., व्हॉट्सऍप, आय.व्ही.आर.एस., फेसबुक, इन्स्ट्राग्राम, युटयुब आदी माध्यमातून स्पर्धांचा प्रचार, प्रसार केला जाणार असल्याची माहिती त्यांनी दिली. तसेच या स्पर्धांसाठी स्वतंत्र मोबाईल् ऍप तयार करण्यात आले असून युवकांना त्याद्वारे नाव नोंदणी करता येईल. त्याचबरोबर ७८७८७८५०५० या क्रमांकावर मिस्ड कॉल देवून अथवा नोंदणीकृत सदस्याद्वारे ऑफलाईन फॉर्म भरून ही नाव नोंदणी करता येईल असे त्यांनी सांगितले.
या स्पर्धेची अधिक सविस्तर माहिती लालहरीहरज्ञ.लेा या संकेतस्थळावर युवकांना उपलब्ध होणार असून अधिकाधिक युवकांनी आपल्या कला-गुणांना वाव देण्यासाठी या स्पर्धेत सहभागी व्हावे असे आवाहन ही सुदर्शन पाटसकर यांनी सांगितले.
सातारा जिल्ह्यात तब्बल पन्नास हजार नवमतदार |
स्व. यशवंतराव चव्हाण यांना भारतरत्न देण्याची मागणी पंतप्रधान मोदींकडे करणार |
कराड तालुक्याच्या विकासासाठी एकत्र प्रयत्न करूया: खा. उदयनराजे भोसले |
खोऱ्याने मते घेणाऱ्या नेत्यांनी केले पाटण खोऱ्याकडे दुर्लक्ष |
सातारा जिल्ह्यातील दोन पोलिस अधिकाऱ्यांसह ११ जणांना महासंचालक सन्मानचिन्ह जाहीर |
सांगलीच्या सिंचनासाठी मागणी झाली कमी |
पोटात चाकू भोसकून एकाला जिवे मारण्याचा प्रयत्न |
ठोसेघर येथे एकाचा डोक्यात दगड घालून निर्घृण खून |
उंच भरारी योजनेचे ब्रँन्ड ऍम्बेसिडर म्हणून मोनिका राठी तसेच सौरभ भोसले यांची निवड |
केट्स पॉईंट वरुन आत्महत्त्या केलेल्याचा मृतदेह दरीबाहेर काढण्यात यश |
शेंद्रे येथील तिहेरी अपघात प्रकरणी तिघांवर गुन्हा |
सुमारे अडीच लाखांच्या बांधकाम साहित्याची चोरी |
एकास मारहाण केल्याप्रकरणी पाच जणांवर गुन्हा |
सातार्यातून युवक बेपत्ता |
नागठाण्यात युवकाची आत्महत्या |
सांगलीच्या सिंचनासाठी मागणी झाली कमी |
पोटात चाकू भोसकून एकाला जिवे मारण्याचा प्रयत्न |
ठोसेघर येथे एकाचा डोक्यात दगड घालून निर्घृण खून |
उंच भरारी योजनेचे ब्रँन्ड ऍम्बेसिडर म्हणून मोनिका राठी तसेच सौरभ भोसले यांची निवड |
केट्स पॉईंट वरुन आत्महत्त्या केलेल्याचा मृतदेह दरीबाहेर काढण्यात यश |
शेंद्रे येथील तिहेरी अपघात प्रकरणी तिघांवर गुन्हा |
सुमारे अडीच लाखांच्या बांधकाम साहित्याची चोरी |
एकास मारहाण केल्याप्रकरणी पाच जणांवर गुन्हा |
सातार्यातून युवक बेपत्ता |
नागठाण्यात युवकाची आत्महत्या |
उदयनराजे यांना मतदान करून गादीचा सन्मान ठेवा |
जपानचे स्लिम लँडर तिसऱ्यांदा जागृत |
कोल्हापुरातील अंबाबाईच्या रथोत्सव |
छत्रपतींच्या वंशजांना जावळीचा स्वाभिमान सांगू नका |
माझ्याकडे विरोधकांच्या अनेक भानगडी |