07:27pm | May 15, 2018 |
सातारा : आज सकाळी महाबळेश्वर येथील पोलो ग्राऊंडवर बॉलिवूडमधील सुप्रसिद्ध अभिनेता अजय देवगणचे चार्टर विमान कोसळले असून या अपघातामध्ये चार्टर विमान चालक जागीच ठार झाला असून अजय देवगणची प्रकृती गंभीर असून त्याला अधिक उपचारासाठी पुणे येथे हलविण्यात आले आहे, अशा आशयाचा मॅसेज व्हॉटस्ऍप ग्रुपवर मुंबईसह महाराष्ट्रभर फिरत असल्यामुळे खळबळ उडाली आहे.
या अपघाताबाबत सातारा टुडे च्या प्रतिनिधीने अधिक माहिती घेतली असता ही घटना केवळ अफवाच असल्याचे निदर्शनास आलेले आहे. अजय देवगण सध्या त्याच्या आगामी चित्रपटाच्या चित्रीकरणामध्ये व्यस्त आहे. या चित्रपटाचे चित्रीकरण महाबळेश्वर आणि परिसरामध्ये सुरु आहे. या चित्रपटाच्या चित्रीकरणाला येत असतानाच आज सकाळी अजय देवगणचे चार्टर विमान महाबळेश्वर येथे कोसळले असा मॅसेज महाराष्ट्रातील व देशातील अनेक व्हॉटस्ऍप ग्रुपवर सकाळी सकाळी फिरत असल्याने अनेकांच्या काळजात धस्स झाले. माहिती घेण्यासाठी अनेकांनी सातारा टुडे च्या कार्यालयात फोन करुन वस्तुस्थिती जाणण्याचा प्रयत्न केला. मात्र याबाबत महाबळेश्वर पोलीस ठाण्यातून माहिती घेतली असता ही अफवाच असल्यावर शिक्कामोर्तब झाला आहे. जे विमान महाबळेश्वरमध्ये कोसळलेले दाखविण्यात आले आहे, त्याचा एअरलाईन कोड पीआर-टीसीसी आहे. भारतीय चार्टर विमानांना व्हि टी (व्हॉईसरॉय टेरीटरी) हा कोड असतो. त्यामुळे या चार्टर विमानाबाबत अधिक माहिती घेण्याचा प्रयत्न केला असता दाखविण्यात आलेले छोटेखानी विमान फिलीपाईन्स या देशातील आहे, तसेच कराड सोडल्यास जिल्ह्यात कोठेही विमानतळ नाही, त्यामुळे महाबळेश्वर येथे विमान उतरविण्याचा प्रश्नच उद्भवत नाही. कोणाच्या तरी सुपिक डोक्यातील कल्पनेमुळे अशा घटना सोशल मिडियावर व्हायरल होत असतात आणि शिकला सवरलेला समाजही अशा गोष्टी कोणतीही खातरजमा न करता आपल्याकडेच ब्रेकिंग न्यूज असल्याच्या अविर्भावात फॉरवर्ड करीत असतो. या मॅसेजमुळे अजय देवगणही वैतागला असल्याची माहिती अजय देवगणच्या एका निकटवर्तीयाने सातारा टुडे शी बोलताना सांगितली.
सातारा जिल्ह्यात तब्बल पन्नास हजार नवमतदार |
स्व. यशवंतराव चव्हाण यांना भारतरत्न देण्याची मागणी पंतप्रधान मोदींकडे करणार |
कराड तालुक्याच्या विकासासाठी एकत्र प्रयत्न करूया: खा. उदयनराजे भोसले |
खोऱ्याने मते घेणाऱ्या नेत्यांनी केले पाटण खोऱ्याकडे दुर्लक्ष |
सातारा जिल्ह्यातील दोन पोलिस अधिकाऱ्यांसह ११ जणांना महासंचालक सन्मानचिन्ह जाहीर |
सांगलीच्या सिंचनासाठी मागणी झाली कमी |
पोटात चाकू भोसकून एकाला जिवे मारण्याचा प्रयत्न |
ठोसेघर येथे एकाचा डोक्यात दगड घालून निर्घृण खून |
उंच भरारी योजनेचे ब्रँन्ड ऍम्बेसिडर म्हणून मोनिका राठी तसेच सौरभ भोसले यांची निवड |
केट्स पॉईंट वरुन आत्महत्त्या केलेल्याचा मृतदेह दरीबाहेर काढण्यात यश |
शेंद्रे येथील तिहेरी अपघात प्रकरणी तिघांवर गुन्हा |
सुमारे अडीच लाखांच्या बांधकाम साहित्याची चोरी |
एकास मारहाण केल्याप्रकरणी पाच जणांवर गुन्हा |
सातार्यातून युवक बेपत्ता |
नागठाण्यात युवकाची आत्महत्या |
सांगलीच्या सिंचनासाठी मागणी झाली कमी |
पोटात चाकू भोसकून एकाला जिवे मारण्याचा प्रयत्न |
ठोसेघर येथे एकाचा डोक्यात दगड घालून निर्घृण खून |
उंच भरारी योजनेचे ब्रँन्ड ऍम्बेसिडर म्हणून मोनिका राठी तसेच सौरभ भोसले यांची निवड |
केट्स पॉईंट वरुन आत्महत्त्या केलेल्याचा मृतदेह दरीबाहेर काढण्यात यश |
शेंद्रे येथील तिहेरी अपघात प्रकरणी तिघांवर गुन्हा |
सुमारे अडीच लाखांच्या बांधकाम साहित्याची चोरी |
एकास मारहाण केल्याप्रकरणी पाच जणांवर गुन्हा |
सातार्यातून युवक बेपत्ता |
नागठाण्यात युवकाची आत्महत्या |
उदयनराजे यांना मतदान करून गादीचा सन्मान ठेवा |
जपानचे स्लिम लँडर तिसऱ्यांदा जागृत |
कोल्हापुरातील अंबाबाईच्या रथोत्सव |
छत्रपतींच्या वंशजांना जावळीचा स्वाभिमान सांगू नका |
माझ्याकडे विरोधकांच्या अनेक भानगडी |