RNI REG.NO. MAHMAR/2014/56135

What are you looking for?

Contact Us

Address:

Email:

Tel:

Sadar Bazar, Satara, Maharashtra 415001

contact@tmnnews.com

02162 237 474

What are you looking for?

×

आत्मविश्वास गमावल्यानेच त्यांचे घरातले उमेदवार

17 February 2019 at 00:46

ना. चंद्रकांतदादा पाटील यांची शरद पवारांवर टिका : आठवडयातच युतीचा निर्णय होईल

कराड : राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी या वयात आपला आत्मविश्वास गमावला आहे. त्यामुळे आगामी लोकसभा निवडणुकीसाठी ते घरातील उमेदवारी देत आहेत. अशी टिका राज्याचे महसूलमंत्री ना. चंद्रकांतदादा पाटील यांनी केली. दरम्यान, शिवसेना-भाजपा युतीचा निर्णय या आठवडयातच होईल असे स्पष्ट संकेतही त्यांनी दिली.

भारतीय जनता पार्टीची क्लस्टर बैठक आज (शनिवारी) येथील टिळक हायस्कूलमध्ये पार पडली. त्यानंतर झालेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते. यावेळी भाजपाचे महाराष्ट्र प्रदेश महामंत्री आ. सुरेश हाळवनकर, निताताई केळकर, अण्णसाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळाचे अध्यक्ष ना. नरेंद्र पाटील,  श्री विठ्ठल रूक्मिणी मंदिरे समितीेचे अध्यक्ष ना. डॉ. अतुल भोसले, महाराष्ट्र राज्य सहकार परिषदेचे अध्यक्ष शेखर चरेगावकर, भाजपाचे जिल्हाध्यक्ष विक्रम पावसकर, अ‍ॅड. भरत पाटील यांची उपस्थिती होती.

ना.चंद्रकांतदादा पाटील म्हणाले, लोकसभा निवडणुकीसाठी येत्या 7 ते 8 मार्चला अचारसंहिता लागेल. तत्पूर्वी शिवसेना-भाजपा युतीसाठी दोन्ही पक्षाची बोलणी सुरू असून येत्या आठवडाभरात युतीचा निर्णय होईल. युतीचा निर्णय  झाल्याशिवाय  त्या-त्या मतदार संघातील जागा कोणाकडे आहे हे सांगता येणार नाही.  परंतु त्या-त्या मतदार संघात ताकदीचे उमेदवार दिले जाणार आहेत. भाजपाच्या विद्यमान खासदारांना पुन्हा संधी दिली जाणार आहे असे सांगून त्यांनी सांगली लोकसभा मतदार संघासाठी संजयकाका पाटील यांची उमेदवारी कायम असल्याचे  सांगितले. 

माढा लोकसभा मतदार संघात राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्या उमेदवारीबाबत विचारलेल्या प्रश्नावर बोलताना ते म्हणाले, माढामधून कोणीही उभा राहू दे, त्या ताकदीचा उमेदवार भाजपाकडून दिला जाणार आहे. या वयातही त्यांचा आत्मविश्वास गेेला आहे. त्यामुळे ते घरातीलच उमेदवार देत आहेत. अशी टिका ना.चंद्रकांतदादा पाटील यांनी शरद पवार यांचे नाव न घेता केली.

आ. सुरेश हाळवणकर म्हणाले, सातारा, सांगली, कोल्हापूर, हातकंणगले या चार लोकसभा मतदार संघातील भाजपाची ही पूर्व नियोजित क्लस्टर बैठक होती. पुलवामा जिल्हयातील दहशतवादी हल्ल्यात शहीद झालेल्या वीर जवानांना या बैठकीत श्रद्धांजली वाहण्यात आली. या बैठकीत कोणत्याही फुलांचा वापर करण्यात आला नाही.  चार लोकसभा मतदार संघाचा एक क्लस्टर असे महाराष्ट्रात 17 क्लस्टर आहेत. 48 लोकसभा मतदार संघातील शक्तीकेंद्र प्रमुखांचे हे संमेलन होते. एका लोकसभा मतदार संघामधून 800 ते 900 प्रमुख पदाधिकारी या संमेलनाला उपस्थित होते. या बैठकीमध्ये भाजपाच्यावतीने विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. यामध्ये प्रत्येक जिल्हयांमध्ये शहीद वीर जवानांना श्रद्धांजली वाहण्यात येणार आहे. मेरा परिवार भाजप परिवार या कार्यक्रमातून 60 हजार झेंडे लावण्यात येणार आहेत. जनसंपर्क अभियानांतून महाराष्ट्रातील 1 कोटी भाजपाचे सदस्य सरकारच्या योजनेची माहिती घरोघरी देणार आहे. असे देशात 11 कोटी भाजपाचे सदस्य सक्रीय आहेत. तसेच विविध योजनेचा लाभ घेतलेले 22 कोटी लाभार्थी आहेत. 26 फेब्रुवारी रोजी महाराष्ट्रातील लोकसभा मतदार संघात ‘विकासाची दिपावली कमल दिपावली’ हे अभियान राबविण्यात येणार आहे. दि. 28 फेब्रुवारी रोजी संपूर्ण मंडल स्तरावर पंतप्रधान नरेंद्र मोदी भाजपाच्या शक्ती केंद्राशी संवाद साधणार आहेत. दि. 3 मार्च रोजी एकाच वेळी ग्रामीण व शहरी भागात मोटारसायकल रॅली काढण्यात येणार आहे. ग्रामीण भागात दिडशे किलोमीटर व शहरी भागात साठ किलोमीटर अशी रॅली असणार आहे. 

भाजपाच्या आजच्या क्लस्टर बैठकीला महाराष्ट्र प्रदेश संघटनमंत्री व्ही. सतीश यांनी मार्गदर्शन केले.  यावेळी प्रदेश चिटणीस मकरंद देशपांडे, कृषी राज्यमंत्री सदाभाऊ खोत, पुणे म्हाडाचे अध्यक्ष समरजीत घाडगे, आ. अमल महाडिक, पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समितीचे अध्यक्ष महेश जाधव, भाजपाचे प्रवक्ते माधव भंडारी, खा. संजयकाका पाटील, शेखर इनामदार आदी पदाधिकारी उपस्थित होते. 

महाराष्ट्रात 45 हजार भाजपाचे बुथ आहेत. हे बुथ म्हणजे भाजपाची शक्ती केेंद्रे आहेत. या सर्व शक्ती केंद्राची नियुक्ती झाली आहेत. कार्यकर्त्यांची मोठी फळी भाजपामध्ये सक्रीय आहे. भाजपा संघटनात्मक बांधणीमध्ये देशामध्ये प्रथम क्रमांकावर असल्याचे आ. सुरेश हाळवणकर यांनी सांगितले.

 

जावली तालुक्यातील अवैद्य दारू विक्रेत्यांवर मोक्का अंतर्गत कारवाई करावी

गेली ११ वर्ष जावली तालुक्यात सुरु असलेली १३ दारू दुकाने महिलांनी व व्यसनमुक्ती संघटनांनी ऐतिहासिक पाऊल उचलून बंद केली होती.

4 hours before

एकावर पोस्को अंतर्गत गुन्हा

कराड जवळील एका गावात नऊ वर्षीय मुलीवर अत्याचार केल्याप्रकरणी एकावर पोस्को अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

4 hours before

तलावात बुडून युवकाचा मृत्यू

बामणवाडी (ता.कराड) येथे जांभळा नावच्या शिवारात असलेल्या कृषि विभागाच्या पाजर तलावात युवकाचा बुडून मृत्यू झाला.

4 hours before

सातार्‍यातून ट्रॅक्टर, दोन दुचाकी चोरी

सातारा शहर परिसरातून अज्ञात चोरट्यांनी तीन ठिकठिकाणाहून ट्रॅक्टर व दोन दुचाकी चोरुन नेला असून याप्रकरणी शहर पोलिस ठाण्यात तीन गुन्हे दाखल झाले आहेत.

4 hours before