12:23am | Apr 22, 2019 |
सातारा : माथाडी कामगारांसाठी नवी मुंबई येथे असलेली राखीव घरे अपात्र लोकांना मिळवून देण्याचे आमिष दाखवून, 104 जणांची फसवणूक झाल्याचा प्रकार चव्हाट्यावर आला आहे. या प्रकरणात तब्बल चार कोटी 51 लाख रुपयांची फसवणूक झाली असून आपल्या नेत्याच्या कोट्यातून घरे मिळवून देण्याचे आमिष दाखवणाऱ्या आणि सर्वसामान्य लोकांना फसवणाऱ्या दोघांवर एपीएमसी वाशी पोलिसांत गुन्हा दाखल झाला आहे. या प्रकरणात माथाडी नेते नरेंद्र पाटील यांच्या सहीने सिडकोला पत्र ( जावक क्रमांक एमके/एमबी/एनपी/१०६/१५ ) दिले असून या घोटाळ्यातील आरोपी हे नरेंद्र पाटील यांचे निकटवर्तीय असल्याचे उघड झाले आहे. या घोटाळ्यात सर्वसामान्य कुटूंबे कर्जबाजारी होऊन त्यांच्यावर उपासमारीची वेळ आली आहे. त्यामुळे संपूर्ण घोटाळ्याची कसून चौकशी झाली पाहिजे. तसेच माथाडींच्या हक्काची घरे विकून मलई खाणारा तो बोका कोण? याचा शोधही लागला पाहिजे. कारण ती सर्व पीडित कुटूंबे दहशतीच्या छायेत रहात आहेत. त्यामुळे श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले यांच्यावर दहशतीचा आरोप करणाऱ्या नरेंद्र पाटील यांनी आधी घर घोटाळ्यातील दहशतीचे उत्तर द्यावे. मगच उदयनराजेंवर बेछूट आरोप करावेत. असा गंभीर इशारा ॲड. डी. जी. बनकर यांनी दिला आहे.
याबाबत ॲड. बनकर यांनी प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकातील माहितीनुसार, माथाडी कामगारानां त्यांच्या हक्काची घरे मिळावीत, यासाठी कामगार युनियनच्या प्रयत्नातून एक प्रकल्प पुढे आला. त्यानुसार पात्र माथाडी कामगारांची यादी बनवण्यात आली. त्यामधूनच काही अपात्र लोकांची नावे घुसवून घरे विकणारी टोळी उदयास आली. या गुन्ह्यांमध्ये महाराष्ट्र राज्य माथाडी ट्रान्सपोर्ट आणि जनरल कामगार युनियनच्या पतसंस्थेचा कर्मचारी दिलीप उर्फ भाऊसाहेब यादव व संतोष चव्हाण यांचा समावेश असल्याचे उघडकीस आले आहे. शासनाने नवी मुंबईत स्थलांतरित झालेल्या माथाडी कामगारांना 1993 झाली 5000 तर 1999 साली 490 घरांचे वाटप केले होते. यापूर्वीही माथाडी कामगारांसाठी राखीव असलेली घरे इतर संस्थांना देण्याचा प्रकार उघडकीस आला होता. त्याच पद्धतीने आमिष दाखवून फसवणूक करणाऱ्यांचे रॅकेट उघडकीस आले आहे. या प्रकरणातील पीडित प्रदीप वाडकर यांच्यासह 104 जणांनी वाशी पोलिसांत तक्रार केली आहे. विशेष म्हणजे या प्रकरणातील संशयित आरोपी हे सातारा लोकसभा मतदारसंघातील एक उमेदवार नरेंद्र पाटील यांचे निकटवर्तीय आहेत. तसेच या घोटाळ्यात वापर केलेले पत्र हे श्री. पाटील यांच्या सहीनेच सिडकोला दिले आहे. त्याचा श्री. पाटील यांनी खुलासा करावा, अशी मागणी ॲड. बनकर यांनी केली आहे.
या घर घोटाळ्यातील आरोपी दिलीप यादव याने सामान्य लोकांचा विश्वास संपादित करून सन 2014 मध्ये आपल्या नेत्यांच्या कोट्यातून माथाडी कामगारांसाठी राखीव असलेली घरे मिळवून देण्याचे आमिष दाखवले होते. शिवाय 1992 साली माथाडी कामगार नसलेल्या लोकांना माथाडी कामगारांच्या कोट्यातून घरे मिळाली असल्याचेही सांगितले. त्यानंतर त्याने प्रत्येकी 50 हजार रुपये घेऊन, संबंधित लोकांचा माथाडी कामगार मंडळाचा नोंदणी अर्ज भरून घेतला. तसेच प्रत्येकाकडून घरासाठी टोकन स्वरूपात जमा केलेले सुमारे साडेचार कोटी रुपये घेतल्यानंतर त्यांच्या नावाचा उल्लेख असलेले युनियनचे पत्र दाखवून हे शिफारसपत्र सिडकोकडे पाठवल्याचे आरोपींनी भासवल्याची माहीतीही ॲड. बनकर यांनी दिली.
वास्तविक युनियनचे जावक नंबर, तारीख आणि नरेंद्र पाटील यांच्या सहीचे हे पत्र तक्रारदारांची दिशाभूल करण्यासाठी वापरण्यात आले. हा सर्व उद्योग नरेंद्र पाटील यांच्या संगनमतानेच करण्यात आल्याचा आमचा आरोप असून तक्रारदारांकडून घेतलेले पैसे परत देण्यात यादव आणि चव्हाण यांच्याकडून टाळाटाळ होत आहे. त्यामुळे या प्रकरणात नरेंद्र पाटील यांचा प्रत्यक्ष व अप्रत्यक्ष सहभाग असल्याचे उघड होत आहे. सत्तेचा आणि पदाचा गैरवापर करून सर्वासामान्यांची फसवणूक केल्याचा आरोपही ॲड. बनकर यांनी केला आहे.
या घर घोटाळ्याची चौकशी होऊन दोषींवर कठोर कारवाई व्हावी या मागणीसाठी तक्रारदार प्रदीप वाडकर यांनी पोलिस प्रशासनाकडे वारंवार मागणी केली. मात्र राजकिय दबावापोटी कसलीही कारवाई झाली नाही. याउलट श्री. वाडकर यांच्यावर दबाव आणला गेला. मात्र त्या दबावाला न घाबरता वाडकर यांनी उपोषण करून कारवाईची मागणी केली. पण श्री. वाडकर यांनाचा एपीएमसी येथे उपोषणस्थळी मारहाण झाली. काही गुंडानी पोलिसांच्या डोळ्यादेखत ही मारहाण करून त्यांना उपोषणस्थळापासून हाकलून लावले. त्यानंतर त्यांनी सीबीडी बेलापूर कोर्टात १४१७/२०१७ ही खासगी फौजदारी याचिका दाखल केली होती. मात्र या याचिकेतसुद्धा संबंधित आरोपीनी व कटातील सहभागी व्यक्तीनी वेळकाढूपणा केला. त्यामुळे भेदरलेल्या वाडकर यांनी उच्च न्यायालयाचा दरवाजा ठोठावला. उच्च न्यायालयात ५६९६/२०१८ ही फौजदारी याचिका दाखल करून न्याय देण्याची मागणी केली आहे. या दोन्ही याचिका अद्याप प्रलंबित आहेत. त्यामुळे या घोटाळ्याची सखोल चौकशी व्हावी, अशी मागणी अॅड. बनकर यांनी केली आहे.
जे नरेंद्र पाटील श्रीमंत छत्रपती उदयनराजे यांच्यावर दहशतीचे बेछूट आरोप करतात. त्याच नरेंद्र पाटलांच्या दहशतीचा हा ढळढळीत पुरावा चव्हाट्यावर आला आहे. या प्रकरणात फसवणूक झालेली बाधित कुटूंबे दहशतीच्या छायेखाली जगत आहेत. त्यांनी घरे मिळण्याच्या अपेक्षेने पै पै जमवून दिलेले पैसे आता परत मिळत नसल्यामुळे ही सर्वसामान्य कुटूंबे न्यायाच्या प्रतिक्षेत आहेत. या प्रकरणातील आरोपी हे नरेंद्र पाटील यांचे जवळचे नातेवाईक असल्यामुळे स्वत: पाटील यांनी तक्रारदारांवर दबाव आणल्याचा आरोपही ॲड. बनकर यांनी या प्रसिद्धीपत्रकात केला आहे.
सातारा जिल्ह्यात तब्बल पन्नास हजार नवमतदार |
स्व. यशवंतराव चव्हाण यांना भारतरत्न देण्याची मागणी पंतप्रधान मोदींकडे करणार |
कराड तालुक्याच्या विकासासाठी एकत्र प्रयत्न करूया: खा. उदयनराजे भोसले |
खोऱ्याने मते घेणाऱ्या नेत्यांनी केले पाटण खोऱ्याकडे दुर्लक्ष |
सातारा जिल्ह्यातील दोन पोलिस अधिकाऱ्यांसह ११ जणांना महासंचालक सन्मानचिन्ह जाहीर |
सांगलीच्या सिंचनासाठी मागणी झाली कमी |
पोटात चाकू भोसकून एकाला जिवे मारण्याचा प्रयत्न |
ठोसेघर येथे एकाचा डोक्यात दगड घालून निर्घृण खून |
उंच भरारी योजनेचे ब्रँन्ड ऍम्बेसिडर म्हणून मोनिका राठी तसेच सौरभ भोसले यांची निवड |
केट्स पॉईंट वरुन आत्महत्त्या केलेल्याचा मृतदेह दरीबाहेर काढण्यात यश |
शेंद्रे येथील तिहेरी अपघात प्रकरणी तिघांवर गुन्हा |
सुमारे अडीच लाखांच्या बांधकाम साहित्याची चोरी |
एकास मारहाण केल्याप्रकरणी पाच जणांवर गुन्हा |
सातार्यातून युवक बेपत्ता |
नागठाण्यात युवकाची आत्महत्या |
सांगलीच्या सिंचनासाठी मागणी झाली कमी |
पोटात चाकू भोसकून एकाला जिवे मारण्याचा प्रयत्न |
ठोसेघर येथे एकाचा डोक्यात दगड घालून निर्घृण खून |
उंच भरारी योजनेचे ब्रँन्ड ऍम्बेसिडर म्हणून मोनिका राठी तसेच सौरभ भोसले यांची निवड |
केट्स पॉईंट वरुन आत्महत्त्या केलेल्याचा मृतदेह दरीबाहेर काढण्यात यश |
शेंद्रे येथील तिहेरी अपघात प्रकरणी तिघांवर गुन्हा |
सुमारे अडीच लाखांच्या बांधकाम साहित्याची चोरी |
एकास मारहाण केल्याप्रकरणी पाच जणांवर गुन्हा |
सातार्यातून युवक बेपत्ता |
नागठाण्यात युवकाची आत्महत्या |
उदयनराजे यांना मतदान करून गादीचा सन्मान ठेवा |
जपानचे स्लिम लँडर तिसऱ्यांदा जागृत |
कोल्हापुरातील अंबाबाईच्या रथोत्सव |
छत्रपतींच्या वंशजांना जावळीचा स्वाभिमान सांगू नका |
माझ्याकडे विरोधकांच्या अनेक भानगडी |