07:04pm | May 14, 2018 |
सातारा : दरवर्षी सातारा जिल्हा मध्यवर्ती बँकेला विविध पुरस्कार मिळतात. या पुरस्काराचे खरे मानकरी असलेले बँकेचे कर्मचारी यंदा नाराज असून जिल्हा बँकेला 16 कोटी 89 लाख रुपयांचा ढोबळ नफा झाला असला तरी सुमारे 1250 कर्मचार्यांच्या बक्षीस पगाराला कात्री लावण्यात आली आहे. याबाबत बँक कर्मचारी संघटनेने बँकेचे चेअरमन शिवेंद्रसिंहराजे भोसले व सरव्यवस्थापक डॉ. राजेंद्र सरकाळे यांच्याशी चर्चा करुन बक्षीस पगाराबाबत अंतिम निर्णय घेतला जाणार आहे.
सातारा जिल्हा बँकेच्या एकून 6566 कोटी ठेवी आहेत. तर 4453 कोटी कर्ज व 3326 कोटींची गुंतवणूक असून 492 कोटींचे स्वभांडवल आहे. असे एकूण 1100 कोटी रुपयांचा व्यवहार सन 17-18च्या आर्थिक वर्षात झाल्याची माहिती बँकेने दिली आहे. बँकेने 19 कोटी 36 लाख आयकर भरला असून राखीव निधी 8 कोटी 75 लाख, शेती व पतस्थैर्य निधी 5 कोटी 25 लाख, तंत्रज्ञान विकास निधी 1 कोटी, इमारत निधी 1 कोटी, गुंतवणूक चढ-उतार निधी 2 कोटी, सेवक कल्याण निधी 50 लाख, सोने भाव चढ-उतार निधी 23 लाख, धर्मादाय निधी 5 लाख व भागभांडवलावरील लाभांश 16 कोटी 22 लाखाची तरतूद केली आहे. गेल्यावर्षी जिल्हा बँकेने कर्मचार्यांना 21 टक्के बक्षीस पगार दिला होता. त्यामुळे कर्मचार्यांमध्ये खुशीचे वातावरण झाले होते. यंदाच्या वर्षी नोटबंदीमुळे तसेच इतर कारणाने बँकेच्या नफ्यामध्ये घट झाली आहे. ही घट भरुन काढण्यासाठी कर्मचार्यांच्या बक्षीस पगाराचे 8.20 कोटी रुपये एवढी रक्कम कर्मचार्यांना दिली जाणार नाही, अशी भीती व्यक्त होत आहे. त्यामुळे कर्मचार्यांमध्ये नाराजी पसरली असली तरी संचालकांसमोर ती व्यक्त करण्याचे धाडस अद्याप कोणी केलेले नाही.
वार्षिक वेतनाच्या 16.66 टक्के एवढे बक्षीस पगार जिल्हा बँकेने देण्याचे मान्य केले आहे. यामध्ये काही प्रमाणात वाढ होण्याची शक्यता आहे. जिल्हा बँकेच्या कर्मचार्यांनी आपल्या न्याय्य मागणीसाठी आंदोलन करणे गरजेचे आहे. परंतू पाठिमागील अनुभव पाहता असे धाडस कोणी करणार नाही, याचा ठाम विश्वास जिल्हा बँकेच्या संचालकांना आहे. त्यामुळे याबाबत कर्मचार्यांची बाजू मांडण्यासाठी बँकेचे कर्मचारी प्रतिनिधी प्रयत्नशील आहेत.
सातारा जिल्ह्यात तब्बल पन्नास हजार नवमतदार |
स्व. यशवंतराव चव्हाण यांना भारतरत्न देण्याची मागणी पंतप्रधान मोदींकडे करणार |
कराड तालुक्याच्या विकासासाठी एकत्र प्रयत्न करूया: खा. उदयनराजे भोसले |
खोऱ्याने मते घेणाऱ्या नेत्यांनी केले पाटण खोऱ्याकडे दुर्लक्ष |
सातारा जिल्ह्यातील दोन पोलिस अधिकाऱ्यांसह ११ जणांना महासंचालक सन्मानचिन्ह जाहीर |
सांगलीच्या सिंचनासाठी मागणी झाली कमी |
पोटात चाकू भोसकून एकाला जिवे मारण्याचा प्रयत्न |
ठोसेघर येथे एकाचा डोक्यात दगड घालून निर्घृण खून |
उंच भरारी योजनेचे ब्रँन्ड ऍम्बेसिडर म्हणून मोनिका राठी तसेच सौरभ भोसले यांची निवड |
केट्स पॉईंट वरुन आत्महत्त्या केलेल्याचा मृतदेह दरीबाहेर काढण्यात यश |
शेंद्रे येथील तिहेरी अपघात प्रकरणी तिघांवर गुन्हा |
सुमारे अडीच लाखांच्या बांधकाम साहित्याची चोरी |
एकास मारहाण केल्याप्रकरणी पाच जणांवर गुन्हा |
सातार्यातून युवक बेपत्ता |
नागठाण्यात युवकाची आत्महत्या |
सांगलीच्या सिंचनासाठी मागणी झाली कमी |
पोटात चाकू भोसकून एकाला जिवे मारण्याचा प्रयत्न |
ठोसेघर येथे एकाचा डोक्यात दगड घालून निर्घृण खून |
उंच भरारी योजनेचे ब्रँन्ड ऍम्बेसिडर म्हणून मोनिका राठी तसेच सौरभ भोसले यांची निवड |
केट्स पॉईंट वरुन आत्महत्त्या केलेल्याचा मृतदेह दरीबाहेर काढण्यात यश |
शेंद्रे येथील तिहेरी अपघात प्रकरणी तिघांवर गुन्हा |
सुमारे अडीच लाखांच्या बांधकाम साहित्याची चोरी |
एकास मारहाण केल्याप्रकरणी पाच जणांवर गुन्हा |
सातार्यातून युवक बेपत्ता |
नागठाण्यात युवकाची आत्महत्या |
उदयनराजे यांना मतदान करून गादीचा सन्मान ठेवा |
जपानचे स्लिम लँडर तिसऱ्यांदा जागृत |
कोल्हापुरातील अंबाबाईच्या रथोत्सव |
छत्रपतींच्या वंशजांना जावळीचा स्वाभिमान सांगू नका |
माझ्याकडे विरोधकांच्या अनेक भानगडी |