RNI REG.NO. MAHMAR/2014/56135

What are you looking for?

Contact Us

Address:

Email:

Tel:

Sadar Bazar, Satara, Maharashtra 415001

contact@tmnnews.com

02162 237 474

What are you looking for?

×

राज्य सरकारी कर्मचार्‍यांची दिवाळी; जानेवारीपासून सातवा वेतन आयोग

06 October 2018 at 18:18

पुणे : यंदाच्या वर्षी राज्यातील लाखो शासकीय अधिकारी व कर्मचार्‍यांची दिवाळी जोरात होणार असल्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जाहीर केले आहे. जानेवारी २०१९ पासून या सर्वांना सातवा वेतन आयोग लागू होण्याच्या दृष्टीने शासनाने शुक्रवारी रात्री उशीरा महत्त्‍वाचे पाऊल उचलले आहे. याचबरोबर महागाई भत्त्याची थकबाकी सुद्धा मिळणार असल्यामुळे सर्व राज्य सरकारी कार्यालयांमध्ये आनंदाचे वातावरण राहणार आहे. 

शुक्रवारी मुख्यमंत्र्यांच्या वर्षा निवासस्थानी रात्री उशिरा झालेल्या बैठकीमध्ये मुख्य सचिव दिनेश कुमार जैन व इतर विविध अधिकारी तसेच राजपत्रीत अधिकारी महासंघाचे मुख्य सल्लागार ग. दी. कुलथे व कर्मचारी संघटनांसमवेत चर्चा केली. यामध्ये पाच दिवसांचा आठवडा व निवृत्तीचे वय ६० वर्ष करण्याबाबत, शासन लवकरच निर्णय घेईल, असे आश्वासन देण्यात आले. तसेच निर्धारित तारीख जानेवारी २०१६ पासून सातवा वेतन आयोग लागू केला जाणार होता. 

सहाव्या वेतन आयोगातील त्रुटी दूर करण्यासाठी समिती

सरकारने के पी बक्षी यांच्या अध्यक्षतेखाली एक समिती नेमली आहे. सहाव्या वेतन आयोगात अनेक अधिकारी व कर्मचार्‍यांच्या वेतनात त्रुटी राहील्या आहेत. याबाबत बक्षी समिती सुनावण्या घेत आहे व ते काम अंतिम टप्यात आहे. ही समिती लवकरच आपला अहवाल सरकारसमोर मांडेल. केंद्र सरकारच्या वेतन निश्चिती सूत्रानुसार जानेवारी २०१९ पासून वेतन लाभ देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. याचबरोबर महागई भत्त्याची १४ महिन्यांची थकबाकी सुद्धा देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. हे सर्व करण्यासाठी ४८०० कोटी रुपयांची तरतूद करणार असल्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगीतले.  

शिक्षकांच्या प्रश्‍नांसाठी अभ्यासगट

मुख्यमंत्री पुढे म्हणाले की, चतुर्थ श्रेणी कर्मचारी व शिक्षकांच्या प्रश्नांवर मुख्य सचिवांनी स्वतंत्र बैठक घ्यावी. नवीन अंशदायी निवृत्तीवेतन योजनेत आवश्यक त्या सुधारणा सुचवण्यासाठी व उपस्‍थित शंकांचे निराकरण करण्यासाठी शासन स्तरावर अभ्यासगटाची नेमणूक करावी व आपला अहवाल सादर करण्याचे आदेश दिले आहेत.


छावण्यातील सोयी, दुष्काळी उपाय योजनांसाठीही आता वापरता येणार आमदार निधी

राज्यातील दुष्काळी परिस्थितीमुळे निर्माण झालेल्या परिस्थितीवर मात करण्यासाठी आमदार स्थानिक विकास निधीचा उपयोग करण्यास मान्यता देण्याचा शासन निर्णय आज राज्य शासनाने जारी केला.

22 hours before

राज्यात लोकसभा निवडणूक मतमोजणीची तयारी पूर्ण

लोकसभा निवडणूकीची मतमोजणी गुरुवार दि. 23 मे रोजी होणार असून राज्यात मतमोजणीची तयारी पूर्ण झाली आहे.

yesterday

गेवराई तालुक्यात तिहेरी अपघात

गेवराई तालुक्यातील कोळगाव येथे कार आणि स्कॉर्पिओ आणि दुचाकीच्या तिहेरी अपघातात गरोदर महिलेचा जळून अक्षरश: कोळसा झाला आहे. कल्याण- विशाखापट्टणम या राष्ट्रीय महामार्ग क्र. 222 वर मंगळवारी 11 वाजेच्या सुमारास हा भीषण अपघात झाला.

21 May 2019 at 19:39

ICC World Cup 2019 | विश्वचषक विजेत्या संघाला आजवरचं सर्वोच्च इनाम

आयसीसी क्रिकेट विश्वचषकाचं काऊण्टडाऊन सुरु झाल्यामुळे चाहत्यांची उत्सुकता शिगेला पोहचली आहे. विजेतेपदाचा चषक उंचावणाऱ्या संघावर बक्षिसांची खैरात होणार, हे साहजिकच. विश्वविजेत्याला यंदा किती रुपयाचं इनाम मिळणार याची माहिती समोर आली आहे.

21 May 2019 at 16:17