01:33am | Aug 05, 2018 |
कोरेगाव : कोरेगाव शहरानजीक कुमठे फाटा परिसरात सदगुरुनगर कॉलनी येथे शुक्रवार दिनांक 3 ऑगस्ट 2018 रोजी सायंकाळी 6.30 च्या सुमारास रुपाली राजेंद्र काळे (वय 36) रा. सदगुरुनगर, कोरेगाव या विवाहितेने राहत्या घरी छताच्या लोखंडी अँगलला साडीच्या सहाय्याने गळाफास लावून आत्महत्या केल्याची घटना घडली.
मृत विवाहिता रुपाली काळे हिच्या हातामध्ये मरणापूर्वी आत्महत्या करण्यापूर्वी स्वहस्ते लिहिलेली चिठ्ठी सापडल्याने आणि त्या चिठ्ठीमध्ये कोरेगाव शहरात शिवाजीनगर परिसरातील खाजगी हॉस्पिटलमध्ये प्रॅक्टीस करणार्या देशमुख नावाच्या डॉक्टरच्या नामोल्लेख केल्याचे आढळल्याने सदगुरु परिसरातील नागरिकांनी शनिवारी सकाळीच कोरेगाव पोलीस स्टेशन समोर मोठी गर्दी करुन त्या चिठ्ठीत उल्लेख केलेला संबंधित डॉक्टरवर कोरेगाव पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करावा अशी मागणी करुन संबंधित मयत विवाहितेचा मृतदेह अंत्यसंस्कारापासून काही काळ रोखून धरला होता.
याबाबत अधिक माहिती अशी की, कोरेगाव शहरानजीक असलेल्या कुमठे फाटा परिसरात असलेल्या सदगुरुनगर कॉलनीत रुपाली राजेंद्र काळे ही विवाहिता तिचा पती राजेंद्र, सासू कांताबाई, सासरे गुलाबराव मारुती काळे आणि तिच्या तीन मुली दिप्ती, रिया, ऐश्वर्या यांच्या समवेत रहात होती. शुक्रवार, दिनांक 3 ऑगस्ट रोजी तिच्या माहेरची खडखडवाडी (ता. कोरेगाव) गावची यात्रा असल्याने रुपाली हिचे पती राजेंद्र काळे आपल्या मुली रिया आणि दिप्ती यांना घेवून सायंकाळी 4 च्या सुमारास यात्रेसाठी सासुरवाडीला खडखडवाडी येथे आले होते. सायंकाळी 6.30 च्या सुमारास मोठी मुलगी ऐश्वर्याचा फोन आला. व तीने रडत रडतच आई रुपालीने गळफास घेतल्याची खबर वडिलांना आणि मामा संदीप भोसले यांना दिली. यावर सर्वजण धावत कोरेगाव येथे आले. त्यावेळी रुपाली काळे हिने राहत्या घरी लोखंडी अँगलला साडीने गळफास घेऊन आत्महत्या केल्याचे दिसून आले. यावेळी रुपाली काळे या विवाहितेच्या हातामध्ये आत्महत्येपुर्वी स्वहस्ताक्षराने लिहिलेली चिठ्ठी आढळून आली. त्यामध्ये कोरेगाव येथील शिवाजीनगर परिसरातील एका खाजगी हॉस्पिटलमध्ये प्रॅक्टीस करणार्या देशमुख नावाच्या डॉक्टरच्या नामोल्लेख असल्याचे आढळून आले. त्यामुळे संबंधित डॉक्टरवर गुन्हा नोंदवावा अशी मागणी सदगुरुनगर आणि काळेवाडी (ता. खटाव), येथील ग्रामस्थांनी कोरेगाव पोलीस स्टेशनसमोर येवून केली. आणि रुपालीचा मृतदेह ताब्यात घेण्यास काही काळ नकार केला. कोरेगाव पोलीसांनी कारवाईचे आश्वासन दिल्यानंतर रुपालीचा मृतदेह ताब्यात घेवून तिच्यावर तिच्या गावी काळेवाडी, (ता. खटाव) येथे अंत्यसंस्कार केला.
सातारा जिल्ह्यात तब्बल पन्नास हजार नवमतदार |
स्व. यशवंतराव चव्हाण यांना भारतरत्न देण्याची मागणी पंतप्रधान मोदींकडे करणार |
कराड तालुक्याच्या विकासासाठी एकत्र प्रयत्न करूया: खा. उदयनराजे भोसले |
खोऱ्याने मते घेणाऱ्या नेत्यांनी केले पाटण खोऱ्याकडे दुर्लक्ष |
सातारा जिल्ह्यातील दोन पोलिस अधिकाऱ्यांसह ११ जणांना महासंचालक सन्मानचिन्ह जाहीर |
सांगलीच्या सिंचनासाठी मागणी झाली कमी |
पोटात चाकू भोसकून एकाला जिवे मारण्याचा प्रयत्न |
ठोसेघर येथे एकाचा डोक्यात दगड घालून निर्घृण खून |
उंच भरारी योजनेचे ब्रँन्ड ऍम्बेसिडर म्हणून मोनिका राठी तसेच सौरभ भोसले यांची निवड |
केट्स पॉईंट वरुन आत्महत्त्या केलेल्याचा मृतदेह दरीबाहेर काढण्यात यश |
शेंद्रे येथील तिहेरी अपघात प्रकरणी तिघांवर गुन्हा |
सुमारे अडीच लाखांच्या बांधकाम साहित्याची चोरी |
एकास मारहाण केल्याप्रकरणी पाच जणांवर गुन्हा |
सातार्यातून युवक बेपत्ता |
नागठाण्यात युवकाची आत्महत्या |
सांगलीच्या सिंचनासाठी मागणी झाली कमी |
पोटात चाकू भोसकून एकाला जिवे मारण्याचा प्रयत्न |
ठोसेघर येथे एकाचा डोक्यात दगड घालून निर्घृण खून |
उंच भरारी योजनेचे ब्रँन्ड ऍम्बेसिडर म्हणून मोनिका राठी तसेच सौरभ भोसले यांची निवड |
केट्स पॉईंट वरुन आत्महत्त्या केलेल्याचा मृतदेह दरीबाहेर काढण्यात यश |
शेंद्रे येथील तिहेरी अपघात प्रकरणी तिघांवर गुन्हा |
सुमारे अडीच लाखांच्या बांधकाम साहित्याची चोरी |
एकास मारहाण केल्याप्रकरणी पाच जणांवर गुन्हा |
सातार्यातून युवक बेपत्ता |
नागठाण्यात युवकाची आत्महत्या |
उदयनराजे यांना मतदान करून गादीचा सन्मान ठेवा |
जपानचे स्लिम लँडर तिसऱ्यांदा जागृत |
कोल्हापुरातील अंबाबाईच्या रथोत्सव |
छत्रपतींच्या वंशजांना जावळीचा स्वाभिमान सांगू नका |
माझ्याकडे विरोधकांच्या अनेक भानगडी |