01:18am | Apr 06, 2020 |
सातारा : कोरोना (कोविड-19) संसर्गाच्या अनुषंगाने गेली पंधरा दिवस सातारा शहरात लॉक डाऊन आहे. त्यामुळे अत्यावश्यक सेवा पुरविणारे लोक सोडले तर सर्वजण घरात बसून कोरोनाचा सामना करीत आहेत, तर अनेक खाजगी तसेच निमशासकीय क्षेत्रातील नोकरदार वर्क फ्रॉम होम करीत आहेत. असे असताना सातारा शहरातील सगळ्यात मोठी इंटरनेट सुविधा देणार्या जॉयस्टर या कंपनीची सेवा बंद असल्याने वर्क फ्रॉम होमचा पूर्णत: बोजवारा उडालेला आहे.
संपूर्ण देशभर अभूतपूर्व लॉक डाऊन जाहीर केल्यामुळे कॉर्पोरेट, शासकीय, निमशासकीय तसेच खाजगी क्षेत्रातील काम करणार्या लोकांनी घरातूनच वर्क फ्रॉम होम करीत कोरोना विषाणू संसर्गाचा मोठा सामना केलेला आहे. ऑफिस नसेल म्हणून काय झाले? वर्क फ्रॉम होम म्हणत अनेकांनी देशाची अर्थव्यवस्था सावरण्याचा प्रयत्न करीत आहेत. कितीही मोठी आपत्ती आली तर आम्ही त्याचा धैर्याने मुकाबला करु शकतो, हे अनेकांनी या कृतीद्वारे दाखवून दिले आहे. इतर गरजांप्रमाणेच दैनंदिन कामकाजासाठी इंटरनेट सेवा महत्त्वाची मानली जाते. त्यामुळे लॉक डाऊन असतानाही इंटरनेट सेवेचा अत्यावश्यक सेवेमध्ये समावेश केलेला आहे.
सातारा जिल्ह्यात विविध कंपन्या इंटरनेट सेवा देत आहेत. या कंपन्यांचे हजारो ग्राहक आहेत. इंटरनेट सेवा अत्यावश्यक असल्याने अनेकांनी या सेवांचे किमान एक वर्षाचे आगावू भाडे भरलेले आहे. त्यामुळे इंटरनेट कंपन्यांना ग्राहकांना बारा महिने चोवीस तास सेवा द्यावी लागते. नैसर्गिक आपत्तीमध्ये काही काळ इंटरनेट सेवा बंद होते. परंतू त्यानंतर काही तासांतच ती पूर्ववतही केली जाते. मात्र असे असताना लॉक डाऊनमध्ये वर्क फ्रॉम होमचे आदेश असतानाही सातारा शहरात इंटरनेट सेवा पुरविणार्या जॉयस्टर या कंपनीने गेल्या दोन दिवसांपासून आपली सेवा बंद केल्यामुळे हजारो ग्राहकांच्या महत्त्वाच्या कामांचा बोजवारा उडालेला आहे. तसेच या कंपनीचा सातारा शहरातील ऑपरेटर असलेल्या नेहा नेट या कंपनीनेही आपले कार्यालय बंद करुन ग्राहक सेवा नंबरही बंद केल्यामुळे नक्की संपर्क कोणाला करायचा? असा संतप्त सवालही इंटरनेट वापरणार्या ग्राहकांनी केलेला आहे. आगावू पैसे भरुनही जॉयस्टर व नेहा नेट कंपनीच्या मग्रुरीमुळे ऐन लॉक डाऊनमध्ये वर्क फ्रॉम होमचा पूरता फज्जा झालेला आहे. प्रशासनाने इंटरनेट सेवा अत्यावश्यक सेवेमध्ये समाविष्ट केली आहे. त्यामुळे इंटरनेट ऑपरेटर कंपन्यांच्या कर्मचार्यांना पोलिसांद्वारे काम सुरु ठेवण्यासाठी पासेसही पुरविण्यात आले आहेत. असे असताना गेल्या दोन दिवसांपासून जॉयस्टर व नेहा नेट केबल ऑपरेटरचे कर्मचारी इंटरनेटची सेवा बंद ठेवून नक्की गेलेत तरी कुठे? याचा शोध घ्यावा तसेच अत्यावश्यक सेवेमध्ये समाविष्ट असूनही गेल्या दोन दिवसांपासून इंटरनेट सेवा बंद ठेवणार्या या दोन्ही कंपन्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी सातारा शहरातील इंटरनेट वापरणार्या हजारो ग्राहकांनी केलेली आहे.
सातारा जिल्ह्यात तब्बल पन्नास हजार नवमतदार |
स्व. यशवंतराव चव्हाण यांना भारतरत्न देण्याची मागणी पंतप्रधान मोदींकडे करणार |
कराड तालुक्याच्या विकासासाठी एकत्र प्रयत्न करूया: खा. उदयनराजे भोसले |
खोऱ्याने मते घेणाऱ्या नेत्यांनी केले पाटण खोऱ्याकडे दुर्लक्ष |
सातारा जिल्ह्यातील दोन पोलिस अधिकाऱ्यांसह ११ जणांना महासंचालक सन्मानचिन्ह जाहीर |
सांगलीच्या सिंचनासाठी मागणी झाली कमी |
पोटात चाकू भोसकून एकाला जिवे मारण्याचा प्रयत्न |
ठोसेघर येथे एकाचा डोक्यात दगड घालून निर्घृण खून |
उंच भरारी योजनेचे ब्रँन्ड ऍम्बेसिडर म्हणून मोनिका राठी तसेच सौरभ भोसले यांची निवड |
केट्स पॉईंट वरुन आत्महत्त्या केलेल्याचा मृतदेह दरीबाहेर काढण्यात यश |
शेंद्रे येथील तिहेरी अपघात प्रकरणी तिघांवर गुन्हा |
सुमारे अडीच लाखांच्या बांधकाम साहित्याची चोरी |
एकास मारहाण केल्याप्रकरणी पाच जणांवर गुन्हा |
सातार्यातून युवक बेपत्ता |
नागठाण्यात युवकाची आत्महत्या |
सांगलीच्या सिंचनासाठी मागणी झाली कमी |
पोटात चाकू भोसकून एकाला जिवे मारण्याचा प्रयत्न |
ठोसेघर येथे एकाचा डोक्यात दगड घालून निर्घृण खून |
उंच भरारी योजनेचे ब्रँन्ड ऍम्बेसिडर म्हणून मोनिका राठी तसेच सौरभ भोसले यांची निवड |
केट्स पॉईंट वरुन आत्महत्त्या केलेल्याचा मृतदेह दरीबाहेर काढण्यात यश |
शेंद्रे येथील तिहेरी अपघात प्रकरणी तिघांवर गुन्हा |
सुमारे अडीच लाखांच्या बांधकाम साहित्याची चोरी |
एकास मारहाण केल्याप्रकरणी पाच जणांवर गुन्हा |
सातार्यातून युवक बेपत्ता |
नागठाण्यात युवकाची आत्महत्या |
उदयनराजे यांना मतदान करून गादीचा सन्मान ठेवा |
जपानचे स्लिम लँडर तिसऱ्यांदा जागृत |
कोल्हापुरातील अंबाबाईच्या रथोत्सव |
छत्रपतींच्या वंशजांना जावळीचा स्वाभिमान सांगू नका |
माझ्याकडे विरोधकांच्या अनेक भानगडी |