कराड : वेणूताई चव्हाण कॉलेजमध्ये अग्रणी महाविद्यालय उपक्रमांतर्गत राज्यशास्त्र विभागाच्या वतीने ‘महाराष्ट्राच्या राजकारणातील स्त्रियांचा सहभाग व योगदान’ या विषयावर एक दिवसीय कार्यशाळा आयोजित करण्यात आली होती. या कार्यशाळेत प्रमुख पाहुण्या म्हणून प्रा. डॉ. सौ. एम. पी. मोहिते बोलताना म्हणाल्या की, स्त्री सबलीकरणासाठी पुरूष प्रधान समाज व्यवस्थेतील पुरूषी मानसिकता बदलली तर स्त्रियांना राजकीय स्वातंत्र उपभोगता येईल.
कार्यशाळेच्या द्वितीय सत्राचे प्रमुख पाहुणे प्रा. विजयकुमार पानस्कर म्हणाले की, स्त्रियांचा राजकीय प्रक्रियेत सहभाग वाढावा यासाठी 73 वी व 74 घटना दुरूस्ती महत्वपूर्ण भूमिका बजावत आहे. परंतू व्यवहारात मात्र त्याची फलश्रुती दिसत नाही. म्हणून स्त्रियांना राजकारणात सक्रीय करण्यासाठी त्यांच्या राजकीय हक्कांबद्ल त्यांना जागृत करणे अत्यंत आवश्यक आहे.
कार्यक्रमाचे अध्यक्ष प्राचार्य. डॉ. एल. जी. जाधव म्हणाले की, आज समाजामध्ये स्त्रियांची होत असलेली विटंबना हि खूप चिंतनीय बाब आहे. यासाठी समाजातील सर्व घटकांनी स्त्री सबलीकरणासाठी जाणिवपूर्वक प्रयत्न करणे गरजेचे आहे. राजकारणातील स्त्रियांचा सहभाग वाढला तरच स्त्रियांचे खर्या अर्थाने सबलीकरण झाले असे वाटेल.
या कार्यशाळेचे प्रास्ताविक प्रा.डॉ.डी.एस.सावंत यांनी केले. त्यात त्यांनी कार्यशाळा आयोजना पाठीमागील उद्देश स्पष्ट केला. प्रमुख पाहुण्यांचा परिचय प्रा. एस. एम. मुल्ला यांनी करून दिला. प्रा. सौ.आर.बी. कांबिरे यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले. तर प्रा. पी. एस. कराडे यांनी कार्यक्रमाचे आभार व्यक्त केले. या कार्यशाळेसाठी प्रा.डॉ.आर.ए. केंगार, प्रा. एम. एम. बागवान, प्रा. डॉ. ए. बी. मुळीक, डॉ. सौ. वंदना लोंढे, डॉ.सौ.सुवर्णा जाधव, डॉ. सौ. सुनिता चव्हाण, प्रा. सौ. वंदना थोरात, प्रा. सौ. स्वप्ना डांगे, प्रा.आकांक्षा जोशी, प्रा.भाग्यश्री पोवार, प्रा.शोभा पाटील व बहुसंख्येने विद्यार्थी उपस्थित होते.
सातारा जिल्ह्यात तब्बल पन्नास हजार नवमतदार |
स्व. यशवंतराव चव्हाण यांना भारतरत्न देण्याची मागणी पंतप्रधान मोदींकडे करणार |
कराड तालुक्याच्या विकासासाठी एकत्र प्रयत्न करूया: खा. उदयनराजे भोसले |
खोऱ्याने मते घेणाऱ्या नेत्यांनी केले पाटण खोऱ्याकडे दुर्लक्ष |
सातारा जिल्ह्यातील दोन पोलिस अधिकाऱ्यांसह ११ जणांना महासंचालक सन्मानचिन्ह जाहीर |
सांगलीच्या सिंचनासाठी मागणी झाली कमी |
पोटात चाकू भोसकून एकाला जिवे मारण्याचा प्रयत्न |
ठोसेघर येथे एकाचा डोक्यात दगड घालून निर्घृण खून |
उंच भरारी योजनेचे ब्रँन्ड ऍम्बेसिडर म्हणून मोनिका राठी तसेच सौरभ भोसले यांची निवड |
केट्स पॉईंट वरुन आत्महत्त्या केलेल्याचा मृतदेह दरीबाहेर काढण्यात यश |
शेंद्रे येथील तिहेरी अपघात प्रकरणी तिघांवर गुन्हा |
सुमारे अडीच लाखांच्या बांधकाम साहित्याची चोरी |
एकास मारहाण केल्याप्रकरणी पाच जणांवर गुन्हा |
सातार्यातून युवक बेपत्ता |
नागठाण्यात युवकाची आत्महत्या |
सांगलीच्या सिंचनासाठी मागणी झाली कमी |
पोटात चाकू भोसकून एकाला जिवे मारण्याचा प्रयत्न |
ठोसेघर येथे एकाचा डोक्यात दगड घालून निर्घृण खून |
उंच भरारी योजनेचे ब्रँन्ड ऍम्बेसिडर म्हणून मोनिका राठी तसेच सौरभ भोसले यांची निवड |
केट्स पॉईंट वरुन आत्महत्त्या केलेल्याचा मृतदेह दरीबाहेर काढण्यात यश |
शेंद्रे येथील तिहेरी अपघात प्रकरणी तिघांवर गुन्हा |
सुमारे अडीच लाखांच्या बांधकाम साहित्याची चोरी |
एकास मारहाण केल्याप्रकरणी पाच जणांवर गुन्हा |
सातार्यातून युवक बेपत्ता |
नागठाण्यात युवकाची आत्महत्या |
उदयनराजे यांना मतदान करून गादीचा सन्मान ठेवा |
जपानचे स्लिम लँडर तिसऱ्यांदा जागृत |
कोल्हापुरातील अंबाबाईच्या रथोत्सव |
छत्रपतींच्या वंशजांना जावळीचा स्वाभिमान सांगू नका |
माझ्याकडे विरोधकांच्या अनेक भानगडी |