04:51am | Apr 30, 2019 |
कराड : कमी प्रतिचे पनीर उच्च दर्जाचे भासवून त्याचे उत्पादन व विक्री करणार्या तासवडे (ता. कराड) एमआयडीसीतील संतोष मिल्क अँण्ड मिल्क प्रॉडक्टस प्रा. लि. वर छापा टाकून अन्न व औषध प्रशासनाच्या सातारा येथील पथकाने 9 लाख 74 हजार रूपये किंमतीचा मलई, पनीर व क्रीमचा साठ जप्त केला. सोमवारी सकाळी दहाच्या सुमारास ही कारवाई करण्यात आली.
याबाबतची माहिती अशी, अन्न-औषध प्रशासन विभागाच्या पुणे कार्यालयाचे सहआयुक्त सुरेश देशमुख यांच्या उपस्थितीत दि. 26 रोजी कॅम्प पुणे येथील मॉडर्न डेअरीवर छापा टाकून 1 लाख 3 हजार रुपये किंमतीचे हलक्या प्रतिचे दही, मलई, पनीर व क्रीम जप्त केले होते. ते दुग्धजन्य पदार्थ तासवडे एमआयडीसीतील संतोष मिल्क अँड मिल्क प्रॉडक्ट्स प्रा. लि. येथे उत्पादीत केल्याचे आढळून आले होते. त्यामुळे सातारा कार्यालयाच्या पथकाने तासवडे एमआयडीसीत संतोष मिल्कवर छापा टाकून हलक्या दर्जाचे 2 लाख 4 हजार 840 रूपये किंमतीचे 1 हजार 24 किलो मलाई आणि पनीर, 7 लाख 49 हजार रूपये किंमतीचे 468 किलो हलक्या प्रतीच्या क्रीमचा साठा जप्त केला. तसेच मलई-पनीरच्या 250 ग्रॅमच्या पॅकेटवर मॉडर्न डेअरी, कॅम्प पुणे असे छापल्याचे आढळून आले. प्रत्यक्षात पनीरचे उत्पादन कर्नाटकातील महालीगपुर येथे झाले आहे. ते पनीर संतोष मिल्क अॅण्ड मिल्क प्रॉडक्टस प्रा. लि. तासवडे एमआयडीसी, ता. कराड येथे उत्पादीत झाल्याचे भासवून पॅकींग केले जात होते. कर्नाटकात उत्पादीत केलेले पनीर रातोरात संतोष मिल्क अँड मिल्क प्रॉडक्टस प्रा. लि. येथे आणले जात होते. तसेच पनीर येथे आणल्याचा कसल्याही प्रकारचा पुरावा ठेवला जात नव्हता.
दरम्यान, दुध व दुग्धजन्य पदार्थ ज्या ठिकाणी उत्पादीत केले जात होते, त्या ठिकाणी अस्वच्छता व किटकांचा वावर आढळून आला. तसेच दुग्धजन्य पदार्थाचे मार्केटींग करण्याकरीता मॉडर्न डेअरी पुणे यांना परवाना नसल्याचेही आढळून आले आहे.
ही कारवाई पुणे विभागाचे सहआयुक्त सुरेश देशमुख यांच्या नेतृत्वाखाली आणि पुणे कार्यालयाचे सहाय्यक आयुक्त (अन्न) संपतराव देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली अन्न सुरक्षा अधिकारी रोहन शहा, अनिल पवार, युवराज ढेबरे व राहुल खंडागळे यांच्या पथकाने केली. प्रयोगशाळेकडून नमुन्याचे अहवाल प्राप्त होताच पुढील कारवाई करण्यात येणार असल्याचे सहायक आयुक्त (अन्न) शिवकुमार कोडगिरे यांनी सांगितले.
केट्स पॉईंट वरुन आत्महत्त्या केलेल्याचा मृतदेह दरीबाहेर काढण्यात यश |
शेंद्रे येथील तिहेरी अपघात प्रकरणी तिघांवर गुन्हा |
सुमारे अडीच लाखांच्या बांधकाम साहित्याची चोरी |
एकास मारहाण केल्याप्रकरणी पाच जणांवर गुन्हा |
सातार्यातून युवक बेपत्ता |
नागठाण्यात युवकाची आत्महत्या |
उदयनराजे यांना मतदान करून गादीचा सन्मान ठेवा |
जपानचे स्लिम लँडर तिसऱ्यांदा जागृत |
कोल्हापुरातील अंबाबाईच्या रथोत्सव |
छत्रपतींच्या वंशजांना जावळीचा स्वाभिमान सांगू नका |
माझ्याकडे विरोधकांच्या अनेक भानगडी |
महाभकास आघाडीला निवडणुकीत जागा दाखवा |
साताऱ्यात मेघगर्जनेसह बरसल्या पावसाच्या सरी |
जनता बँकेत पुर्नगठीत बोर्ड ऑफ मॅनेजमेंटच्या चेअरमनपदी विनोद कुलकर्णी |
बोंडारवाडीसह धरणांची कामे मार्गी लावणार उदयनराजेंचे आश्वासन |
नागठाण्यात युवकाची आत्महत्या |
उदयनराजे यांना मतदान करून गादीचा सन्मान ठेवा |
जपानचे स्लिम लँडर तिसऱ्यांदा जागृत |
कोल्हापुरातील अंबाबाईच्या रथोत्सव |
छत्रपतींच्या वंशजांना जावळीचा स्वाभिमान सांगू नका |
माझ्याकडे विरोधकांच्या अनेक भानगडी |
महाभकास आघाडीला निवडणुकीत जागा दाखवा |
साताऱ्यात मेघगर्जनेसह बरसल्या पावसाच्या सरी |
जनता बँकेत पुर्नगठीत बोर्ड ऑफ मॅनेजमेंटच्या चेअरमनपदी विनोद कुलकर्णी |
बोंडारवाडीसह धरणांची कामे मार्गी लावणार उदयनराजेंचे आश्वासन |
दलित महासंघ,पॅंथरचा उदयनराजेंना जाहीर पाठींबा |
सातारकरांना बाहेरच्यांनी स्वाभिमान शिकवू नये |
साताऱ्यात कोट्यावधीची कामे हीच आपली जमेची बाजू |
जुगार प्रकरणी एकावर कारवाई |
नोकरीच्या अमिषाने सुमारे पावणे सहा लाखांची फसवणूक |