शिवथर : शिवथर (ता. सातारा) येथे विहिरीवरील विद्युत मोटारी चोरणार्या चोरट्यांना शिवथर ग्रामस्थांनी पकडून पोलिसांच्या ताब्यात दिले. गेले अनेक दिवस मोटारींची चोरी होऊनही चोरटे सापडत नसल्याने शिवथर ग्रामस्थांनी पोलिसांना धारेवर धरले. 10 ते 15 दिवसांपूर्वी शिवथर गावच्या शिवारातील विहिरीवरील विद्युत मोटारी चोरीला गेल्या होत्या, तर काही विहिरींवरील मोटरच्या पाईप कापल्या होत्या. त्यामुळे शेतकर्यांचे हजारो रुपयांचे नुकसान झाले होते. दोन वर्षांत कॅनॉलवरील, विहिरींवरील, ओढ्यांवरील शिवथर व शिवथर परिसरातील गावांच्या शेतातून शेकडो मोटारी चोरीला गेल्या आहेत.
चोरट्यांनी बोअरमधील मोटारी चोरुन नेल्या आहेत. शेकडो विद्युत मोटारी चोरीस नेवूनही पोलिसांना चोरटे सापडत नव्हते, त्यामुळे शिवथर ग्रामस्थांनी गेली आठ दिवस रात्रगस्त घातली तसेच मोटारी कोण विकत घेत आहेत, त्यांचीही चौकशी केली. चौकशीवेळी रेवडी येथील सत्याप्पा नावाच्या माणसाला चोरटे मोटारी विकत असल्याचे समजले. त्याच्याकडे चौकशी केली असता त्याने शिवथर येथील धनंजय ईश्वर साबळे (वय 22), राज हणमंत माने (वय 17), उमेश बाळकृष्ण बोर्डे (वय 18), हणमंत किसन माने (वय 49) यांची नावे सांगितली. या सर्व चोरट्यांना पकडले असता त्यांनी मोटारी चोरुन विकत असल्याची कबुली दिली. या घटनेची पोलिसांना माहिती मिळाल्यानंतर पीएसआय शैलेश औटे, एच.सी. मुलाणी, पी.सी. महांगडे, पी.सी. कुंभार, दिपक बर्गे यांनी घटनास्थळी जावून चोरट्यांना ताब्यात घेतले.
पोलिसांनी गावातील मोटारी चोरणार्या चोरट्यांची नावे वरील चोरट्यांना विचारली तेव्हा चोरट्यांनी योगेश कमलाकर साबळे-पाटील, अविनाश दडस, करन छगन जाधव त्याचबरोबर सातार्यातील तिघे (नावे समजू शकली नाहीत) वाईचा बबल्या, आकाश संदिप साबळे यांची नावे सांगितली. विशेष म्हणजे सातारा जिल्ह्यातून तिघेजण तडीपार असूनही त्यांचाही मोटारी चोरण्यात सहभाग असल्याचे चोरट्याने सांगितले.
सातारा जिल्ह्यात तब्बल पन्नास हजार नवमतदार |
स्व. यशवंतराव चव्हाण यांना भारतरत्न देण्याची मागणी पंतप्रधान मोदींकडे करणार |
कराड तालुक्याच्या विकासासाठी एकत्र प्रयत्न करूया: खा. उदयनराजे भोसले |
खोऱ्याने मते घेणाऱ्या नेत्यांनी केले पाटण खोऱ्याकडे दुर्लक्ष |
सातारा जिल्ह्यातील दोन पोलिस अधिकाऱ्यांसह ११ जणांना महासंचालक सन्मानचिन्ह जाहीर |
सांगलीच्या सिंचनासाठी मागणी झाली कमी |
पोटात चाकू भोसकून एकाला जिवे मारण्याचा प्रयत्न |
ठोसेघर येथे एकाचा डोक्यात दगड घालून निर्घृण खून |
उंच भरारी योजनेचे ब्रँन्ड ऍम्बेसिडर म्हणून मोनिका राठी तसेच सौरभ भोसले यांची निवड |
केट्स पॉईंट वरुन आत्महत्त्या केलेल्याचा मृतदेह दरीबाहेर काढण्यात यश |
शेंद्रे येथील तिहेरी अपघात प्रकरणी तिघांवर गुन्हा |
सुमारे अडीच लाखांच्या बांधकाम साहित्याची चोरी |
एकास मारहाण केल्याप्रकरणी पाच जणांवर गुन्हा |
सातार्यातून युवक बेपत्ता |
नागठाण्यात युवकाची आत्महत्या |
सांगलीच्या सिंचनासाठी मागणी झाली कमी |
पोटात चाकू भोसकून एकाला जिवे मारण्याचा प्रयत्न |
ठोसेघर येथे एकाचा डोक्यात दगड घालून निर्घृण खून |
उंच भरारी योजनेचे ब्रँन्ड ऍम्बेसिडर म्हणून मोनिका राठी तसेच सौरभ भोसले यांची निवड |
केट्स पॉईंट वरुन आत्महत्त्या केलेल्याचा मृतदेह दरीबाहेर काढण्यात यश |
शेंद्रे येथील तिहेरी अपघात प्रकरणी तिघांवर गुन्हा |
सुमारे अडीच लाखांच्या बांधकाम साहित्याची चोरी |
एकास मारहाण केल्याप्रकरणी पाच जणांवर गुन्हा |
सातार्यातून युवक बेपत्ता |
नागठाण्यात युवकाची आत्महत्या |
उदयनराजे यांना मतदान करून गादीचा सन्मान ठेवा |
जपानचे स्लिम लँडर तिसऱ्यांदा जागृत |
कोल्हापुरातील अंबाबाईच्या रथोत्सव |
छत्रपतींच्या वंशजांना जावळीचा स्वाभिमान सांगू नका |
माझ्याकडे विरोधकांच्या अनेक भानगडी |