RNI REG.NO. MAHMAR/2014/56135

What are you looking for?

Contact Us

Address:

Email:

Tel:

Sadar Bazar, Satara, Maharashtra 415001

contact@tmnnews.com

02162 237 474

What are you looking for?

×

फलटणच्या आखाड्यात आता माजी आमदार कॅप्टन अभिजीत अडसूळ

08 September 2019 at 15:11

फलटण विधानसभेसाठी ज्युनिअर अडसुळांसाठी शिवसेना हायकमांड अनुकूल

सातारा : माजी केंद्रीय मंत्री तथा कोरेगाव तालुक्याचे सुपूत्र आनंदराव अडसूळ यांचे चिरंजीव माजी आमदार कॅप्टन अभिजीत अडसूळ यांनी फलटण विधानसभा मतदारसंघातून शड्डू ठोकण्याचा निर्णय घेतला असून यासंदर्भात ‘मातोश्री’वर खलबते झाल्याचे खात्रीलायक वृत्त ‘सातारा टुडे’च्या हाती लागले आहे. माजी आ. अभिजीत अडसूळांच्या एन्ट्रीमुळे फलटण तालुक्यातील राजकीय समीकरणे मात्र बिघडणार आहेत.

अमरावती जिल्ह्यातील दर्यापूर मतदारसंघातून 2009 च्या विधानसभा निवडणुकीत शिवसेनेच्या तिकिटावर कॅप्टन अभिजीत अडसूळ यांनी निवडणूक लढवली होती. या निवडणुकीत त्यांनी दणदणीत विजय मिळवला होता. परंतू 2014 साली झालेल्या विधानसभा निवडणुकीत युती तुटल्यामुळे भाजपच्या रमेश गणपतराव बुंदिले यांनी अडसूळ यांचा पराभव केला होता. सध्या युतीच्या जागावाटपात दर्यापूर हा मतदारसंघ भाजपला जाण्याची शक्यता असल्यामुळे शिवसेनेकडून कॅप्टन अभिजीत अडसूळ यांच्यासाठी सेफ मतदारसंघाची शोधाशोध सुरु होती. अखेर फलटणमध्ये सुरु असलेल्या राजकीय नाट्याचा फायदा घेत शिवसेनेने अभिजीत अडसूळांसाठी फलटण विधानसभा मतदारसंघ फायनल केल्याचे समजते.

2009 साली मतदारसंघ पुनर्रचनेत फलटण विधानसभा मतदारसंघ अनुसूचित जातीसाठी राखीव झाला होता. त्यामुळे अनेक राजकीय धुरिणांची गोची झाली होती. परंतू जे आजपर्यंत माण विधानसभा मतदारसंघात झाले, तेच फलटण विधानसभा मतदारसंघात होत आहे. 2009 साली झालेल्या निवडणुकीत विधान परिषदेचे सभापती मिस्टर रामराजे नाईक-निंबाळकर यांचे मांडलिकत्व पत्करलेले दीपक चव्हाण मोठ्या मताधिक्याने निवडून आले होते. मात्र शिवसेनेचे उमेदवार बाबुराव माने यांनी त्यांना कडवी लढत दिली होती. मात्र, मिस्टर रामराजेंच्या फलटण तालुक्यातील राजकारणामुळे राष्ट्रवादीच्या उमेदवारांनी एकहाती विजय संपादन केलेला होता. मात्र, 2014 साली फलटण तालुक्यात मिस्टर रामराजे विरोधी लाट होती. परंतू युती आणि आघाड्या तुटल्याचा फायदा रामराजेंच्या उमेदवाराला झाला. परिणामी मिस्टर रामराजेंचे मांडलिक समजले जाणारे दीपक चव्हाण याही निवडणुकीत विजयी झाले. परंतू ऐनवेळी राष्ट्रीय कॉंग्रेसची उमेदवारी पत्करलेले दिगंबर आगवणे थोड्या फरकाने पराभूत झाले. शिवसेनेचे उमेदवार डॉ. नंदकुमार तासगावकर यांनीही या निवडणुकीत पंधरा हजारांच्या वर मते घेतली.

नुकत्याच पार पडलेल्या सतराव्या लोकसभा निवडणुकीत भाजपचे उमेदवार रणजितसिंह नाईक-निंबाळकर यांनी माढा लोकसभा मतदारसंघातून राष्ट्रवादीचे उमेदवार संजयमामा शिंदे यांचा दणदणीत पराभव करुन विजय संपादन केल्यामुळे फलटण तालुक्यातील राजकीय समीकरणे बदलली आहेत. रणजितसिंह नाईक-निंबाळकरांच्या झंझावातासमोर फलटण तालुक्यातील बडे-बडे पुढारी निष्प्रभ ठरत आहेत. विधान परिषदेचे सभापती मिस्टर रामराजे नाईक-निंबाळकर हेही राष्ट्रवादीला गुडबाय करण्याच्या तयारीत आहेत. फ्युचरच्या नावाखाली ते आतापर्यंत भाजपसह शिवसेनेचे उंबरठे झिजवत आहेत. ‘मला घ्या, मला घ्या’ म्हणून ते शिवसेनेसह भाजपच्या हायकमांडच्या संपर्कात असल्याची चर्चा आहे. सभापतीपद वाचविण्यासाठी ते फलटणच्या जागेवर पाणी सोडण्यास तयार असल्याची खात्रीलायक माहिती मिळत आहे. युतीमध्ये फलटण विधानसभा मतदारसंघ शिवसेनेच्या हक्काचा आहे. कदाचित युतीच्या जागावाटपामध्ये हा मतदारसंघ शिवसेनेला सुटणार आहे. माजी केंद्रीय मंत्री आनंदराव अडसूळ व शिवसेना सुप्रिमो उद्धव ठाकरे यांचे संबंध पाहता उद्धव ठाकरे हे कॅप्टन अभिजीत अडसूळ यांच्यासाठी फलटण विधानसभा मतदारसंघातून त्यांनाच तिकिट देणार असल्याचे जवळजवळ फायनल झाले आहे. मात्र अभिजीत अडसूळ यांच्यासाठी खा. रणजितसिंह नाईक निंबाळकर यांचा कौल घेणे गरजेचे असणार आहे. तरच फलटण तालुक्यात युतीची डाळ शिजणार आहे.

आगामी विधानसभा निवडणुकीसाठी सालाबादप्रमाणे अनेकांनी गुडघ्याला बाशिंगे बांधलेली आहेत. सध्या सुरु असलेल्या गणेशोत्सवादरम्यान अनेक इच्छुक उमेदवारांनी निवडणुकीची रंगीत तालीम घ्यायला सुरुवात केली आहे. मात्र कॅप्टन अभिजीत अडसूळांच्या एन्ट्रीमुळे मात्र फलटण तालुक्यातील राजकारणात ट्विस्ट निर्माण झाला आहे.


नंदगिरी महाराजांवर दाखल केलेल्या खोट्या गुन्ह्याचा सोळशी ग्रामस्थांकडून निषेध

सोळशी, ता. कोरेगाव येथील शनी देवस्थानच्या नंदगिरी महाराजांवर सोळशी येथील काही लोकांनी विनयभंगाचा खोटा गुन्हा दाखल केला होता. नंदगिरी महाराज गेल्या अनेक वर्षांपासून सोळशी येथील शनी देवस्थानमध्ये लोकांची सेवा करीत आहेत. अशा व्यक्तीवर पूर्वग्रहदूषित

56 minutes before

श्री शिवाजी विद्यालयात स्व.पी.डी. पाटील यांची पुण्यतिथी साजरी

येथील श्री शिवाजी विद्यालयात स्व.पी.डी.पाटील यांचा 11 वा पुण्यस्मरण दिन विविध उपक्रमांनी साजरा करण्यात आला.

14 hours before

मलकापूरच्या मतदार यादीत बोगस नावे

मतदार यादी पुनर्निरीक्षण कार्यक्रमादरम्यान कराड दक्षिण विधानसभा मतदार संघातील मलकापूर शहरात मतदार यादीमध्ये ऑनलाईन दाखल अर्जांची पडताळणी न करता बोगस नावांचा समावेश झाला आहे. बीएलओंकडून पडताळणी व प्रत्यक्ष कागदपत्रांची तपासणी न झालेली

14 hours before

असंघटीत कामगार मेळावा हा कष्टकर्‍यांना बळ देणारा : सुदर्शन पाटसकर

युवा विकास प्रतिष्ठान कराड व भाजपा युवा मोर्चा तर्फे असंघटीत कामगार मेळाव्याचे आयोजन बाबुभाई पद्मसी शहा हॉल विठ्ठल चौक कराड येथे नुकतेच करण्यात आले. सदर मेळाव्यास मोहन जाधव संचालक पुणे म्हाडा हे प्रमुख अतिथी म्हणून उपस्थिती होते.

14 hours before