नारायणपूर (छत्तीसगड): इंडो-तिबेटीयन सीमा पोलीस दलातील (ITBP)एका जवानानं आज, बुधवारी सहकाऱ्यांवर अंदाधुंद गोळीबार केला. यात पाच जवान ठार झाले, तर दोन जवान गंभीर जखमी झाले आहेत. या घटनेनंतर त्यानं स्वतःवरही गोळी झाड़ून आत्महत्या केली. छत्तीसगड येथील नारायणपूर जिल्ह्यात ही घटना घडली. त्यांच्यात सुट्टीवरून वाद झाल्याचं समजतं.
नारायणपूर येथील पोलीस अधीक्षक मोहित गर्ग यांच्या माहितीनुसार, इंडो-तिबेटीयन सीमा पोलीस दलातील जवानांमध्ये आज सकाळी जोरदार वाद झाला. यातून झालेल्या गोळीबारात सहा जणांचा मृत्यू झाला. यात आणखी दोन जवान जखमी झाले आहेत. मीडिया रिपोर्ट्सनुसार, रहमान खान या कॉन्स्टेबलनं आपल्या पाच सहकारी जवानांवर गोळीबार केला. त्यानंतर स्वतःवरही गोळी झाडून आत्महत्या केली. जखमींना उपचारासाठी रायपूरला हलवले.
छत्तीसगडचे पोलीस महानिरीक्षक डी. एम. अवस्थी यांनी 'टाइम्स ऑफ इंडिया'ला या घटनेची माहिती दिली. आयटीबीपीच्या नारायणपूरमधील कडेनर कॅम्पमध्ये जवानांमध्ये वाद झाला. त्यानंतर एका जवानानं सहकाऱ्यांवर अंदाधुंद गोळीबार केला. त्यानंतर त्यानं स्वतःवरही गोळी झाडून आत्महत्या केली. दोन जण जखमी झाले आहेत. त्यांना उपचारासाठी विमानानं रायपूरला नेण्यात आलं आहे, अशी माहिती त्यांनी दिली. वादामागील कारणांचा शोध घेण्यात येत असल्याचंही ते म्हणाले.
आयटीबीपीच्या बी/४५ बटालियनच्या केडनर येथील कॅम्पमध्ये बुधवारी सकाळी साधारण साडेनऊच्या सुमारास ही घटना घडली. कॉन्स्टेबल रेहमान खान यांनी स्वतःजवळील रायफलमधून सहकाऱ्यांवर अंदाधुंद गोळीबार केला,' अशी माहिती पोलिसांनी दिली.
सातारा जिल्ह्यात तब्बल पन्नास हजार नवमतदार |
स्व. यशवंतराव चव्हाण यांना भारतरत्न देण्याची मागणी पंतप्रधान मोदींकडे करणार |
कराड तालुक्याच्या विकासासाठी एकत्र प्रयत्न करूया: खा. उदयनराजे भोसले |
खोऱ्याने मते घेणाऱ्या नेत्यांनी केले पाटण खोऱ्याकडे दुर्लक्ष |
सातारा जिल्ह्यातील दोन पोलिस अधिकाऱ्यांसह ११ जणांना महासंचालक सन्मानचिन्ह जाहीर |
सांगलीच्या सिंचनासाठी मागणी झाली कमी |
पोटात चाकू भोसकून एकाला जिवे मारण्याचा प्रयत्न |
ठोसेघर येथे एकाचा डोक्यात दगड घालून निर्घृण खून |
उंच भरारी योजनेचे ब्रँन्ड ऍम्बेसिडर म्हणून मोनिका राठी तसेच सौरभ भोसले यांची निवड |
केट्स पॉईंट वरुन आत्महत्त्या केलेल्याचा मृतदेह दरीबाहेर काढण्यात यश |
शेंद्रे येथील तिहेरी अपघात प्रकरणी तिघांवर गुन्हा |
सुमारे अडीच लाखांच्या बांधकाम साहित्याची चोरी |
एकास मारहाण केल्याप्रकरणी पाच जणांवर गुन्हा |
सातार्यातून युवक बेपत्ता |
नागठाण्यात युवकाची आत्महत्या |
सांगलीच्या सिंचनासाठी मागणी झाली कमी |
पोटात चाकू भोसकून एकाला जिवे मारण्याचा प्रयत्न |
ठोसेघर येथे एकाचा डोक्यात दगड घालून निर्घृण खून |
उंच भरारी योजनेचे ब्रँन्ड ऍम्बेसिडर म्हणून मोनिका राठी तसेच सौरभ भोसले यांची निवड |
केट्स पॉईंट वरुन आत्महत्त्या केलेल्याचा मृतदेह दरीबाहेर काढण्यात यश |
शेंद्रे येथील तिहेरी अपघात प्रकरणी तिघांवर गुन्हा |
सुमारे अडीच लाखांच्या बांधकाम साहित्याची चोरी |
एकास मारहाण केल्याप्रकरणी पाच जणांवर गुन्हा |
सातार्यातून युवक बेपत्ता |
नागठाण्यात युवकाची आत्महत्या |
उदयनराजे यांना मतदान करून गादीचा सन्मान ठेवा |
जपानचे स्लिम लँडर तिसऱ्यांदा जागृत |
कोल्हापुरातील अंबाबाईच्या रथोत्सव |
छत्रपतींच्या वंशजांना जावळीचा स्वाभिमान सांगू नका |
माझ्याकडे विरोधकांच्या अनेक भानगडी |