07:26pm | Jan 16, 2020 |
सातारा : सामुदायिक विकास व संसाधन व्यवस्थापन संस्था, सातारा यांचे वतीने दिला जाणारा २०२० या वर्षाचा वैचारिक अधिष्ठान असणारा ५ वा अश्वघोष पुरस्कार ज्येष्ठ विचारवंत तथा साहित्यिक व बौध्द धम्माचे अभ्यासक, कृतीशील प्रचारक डॉ. आ. ह. साळुंखे यांना जाहीर झाला असून शिवाजी विद्यापीठाचे कुलगुरु डॉ. देवानंद शिंदे यांच्या हस्ते २ फेब्रुवारी २०२० रोजी धम्म महोत्सवात समारंभ पूर्वक प्रदान करण्यात येणार आहे. परिवर्तनाच्या साहित्य निर्मितीबद्दलचा 'अस्मिताघोष' युवा पुरस्कार, साहित्यिक व पत्रकार अरुण जावळे यांना देण्यात येणार असल्याची माहिती संस्थेचे अध्यक्ष मिलिंद कांबळे यांनी पत्रकार परिषदेत दिली.
सामाजिक परिवर्तनाच्या क्षेत्रात राज्यस्तरीय व देशपातळीवरील काम करणाऱ्या लेखक, कवी, लोक कलाकारांना अश्वघोष पुरस्कार देवून संस्थेच्या वतीने दरवर्षी गौरविण्यात येते. आजअखेर महाकवी वामनदादा कर्डक, लेखक प्रताप गंगावणे, शाहीर संभाजी भगत, सत्यपाल महाराज यांना अश्वघोष पुरस्काराने गौरविण्यात आले आहे. संस्थेच्या वतीने यावर्षापासून 'अस्मिताघोष' हा विशेष युवा पुरस्कार सूरू केला असून स्वातंत्र्य, समता, बंधुता, विज्ञाननिष्ठा, न्याय या पंचतत्वांचा जागर करणा-या आणि मानवीमूल्यांची अस्मिता उदघोषित करणा-या विविध क्षेत्रातील एका युवा मान्यवरास हा पुरस्कार देण्याचे योजले आहे. यंदाच्या या पहिल्या पुरस्काराचे मानकरी परिवर्तनाच्या चळवळीतील साहित्यिक व पत्रकार अरुण जावळे हे ठरले आहेत.
धम्ममहोत्सव संयोजन समिती, सातारा जिल्हा व सामुदायिक विकास व संसाधन व्यवस्थापन संस्था, सातारा यांच्या वतीने २ फेब्रुवारी २०२० रोजी येथील सैनिक स्कूल, साताराच्या डहाणुकर प्रेक्षागृहात भव्य धम्ममहोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे, त्यामध्ये हा पुरस्कार वितरण सोहळा होणार आहे. महोत्सवाच्या पहिल्या सत्रात सकाळी ११ वाजता भदंत खेमधम्मो महाथेरो, यवतमाळ, भदंत दिपंकरजी, सातारा, धम्मचारी यशोरत्न, पुणे व मा. व्ही. आर. थोरवडे, जिल्हाध्यक्ष, भारतीय बौध्द महासभा, सातारा यांच्या उपस्थितीत उदघाटन होणार आहे. दुस-या सत्रात दुपारी १ वाजता परिवर्तनवादी कवींचे कवीसंमेलन आयोजित केले आहे. यामध्ये पश्चिम महाराष्ट्रातील नामवंत कवी सहभागी होणार असून संचालन कवी वसंत शिंदे करणार आहेत. भोजनानंतर 'मी सावित्री बोलतेय' हा एकपात्री नाटयप्रयोग प्रख्यात कलाकार व समतादूत उषा कांबळे सादर करणार आहेत. चौथ्या सत्रामध्ये दुपारी ४ वाजता 'बुध्दयान ते संविधान' या विषयावर भारतीय संविधानाचे अभ्यासक आणि घटनातज्ञ ॲड. असिम सरोदे यांचे मार्गदर्शन होणार आहे. यावेळी सांगली - जत येथील उपविभागीय अधिकारी तुषार ठोंबरे अध्यक्षस्थान भूषविणार आहेत. त्यानंतरच्या समारोप सत्रात सायंकाळी ५.३० वाजता पुरस्कार वितरण सोहळा होईल. यावेळी सर्वोत्तम भूमिपूत्र गोतम बुध्द या पुस्तकाचे लेखक, प्राच्यविद्यापंडीत डॉ. आ. ह. साळुखे यांचे विशेष मार्गदर्शन होईल. त्यानंतर शिवाजी विद्यापीठाचे कुलगूरु प्राचार्य डॉ. देवानंद शिंदे यांच्या हस्ते त्यांना 'अश्वघोष' पुरस्कार देऊन गौरविण्यात येणार आहे. साहित्यिक अरुण जावळे यांनांही 'अस्मिताघोष' पुरस्काराने सन्मानित केले जाणार आहे. यावेळी राज्यभरातून विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित राहणार आहेत. जिल्हावासियांनी या कार्यक्रमाचा बहुसंख्येने लाभ घ्यावा. अशी माहिती धम्म महोत्सव समितीच्या वतीने योगेश मस्के व किरण कांबळे यांनी दिली आहे. हा महोत्सव सातारा जिल्ह्याचा असून सर्व धम्मबांधवानी यामध्ये सहभागी व्हावे, असे आवाहन राहुल देवकांत, संकेत मस्के, विजय भंडारे व ॲड. नितीन कांबळे यांच्यासह महोत्सव समितीने केले आहे.
सातारा जिल्ह्यात तब्बल पन्नास हजार नवमतदार |
स्व. यशवंतराव चव्हाण यांना भारतरत्न देण्याची मागणी पंतप्रधान मोदींकडे करणार |
कराड तालुक्याच्या विकासासाठी एकत्र प्रयत्न करूया: खा. उदयनराजे भोसले |
खोऱ्याने मते घेणाऱ्या नेत्यांनी केले पाटण खोऱ्याकडे दुर्लक्ष |
सातारा जिल्ह्यातील दोन पोलिस अधिकाऱ्यांसह ११ जणांना महासंचालक सन्मानचिन्ह जाहीर |
सांगलीच्या सिंचनासाठी मागणी झाली कमी |
पोटात चाकू भोसकून एकाला जिवे मारण्याचा प्रयत्न |
ठोसेघर येथे एकाचा डोक्यात दगड घालून निर्घृण खून |
उंच भरारी योजनेचे ब्रँन्ड ऍम्बेसिडर म्हणून मोनिका राठी तसेच सौरभ भोसले यांची निवड |
केट्स पॉईंट वरुन आत्महत्त्या केलेल्याचा मृतदेह दरीबाहेर काढण्यात यश |
शेंद्रे येथील तिहेरी अपघात प्रकरणी तिघांवर गुन्हा |
सुमारे अडीच लाखांच्या बांधकाम साहित्याची चोरी |
एकास मारहाण केल्याप्रकरणी पाच जणांवर गुन्हा |
सातार्यातून युवक बेपत्ता |
नागठाण्यात युवकाची आत्महत्या |
सांगलीच्या सिंचनासाठी मागणी झाली कमी |
पोटात चाकू भोसकून एकाला जिवे मारण्याचा प्रयत्न |
ठोसेघर येथे एकाचा डोक्यात दगड घालून निर्घृण खून |
उंच भरारी योजनेचे ब्रँन्ड ऍम्बेसिडर म्हणून मोनिका राठी तसेच सौरभ भोसले यांची निवड |
केट्स पॉईंट वरुन आत्महत्त्या केलेल्याचा मृतदेह दरीबाहेर काढण्यात यश |
शेंद्रे येथील तिहेरी अपघात प्रकरणी तिघांवर गुन्हा |
सुमारे अडीच लाखांच्या बांधकाम साहित्याची चोरी |
एकास मारहाण केल्याप्रकरणी पाच जणांवर गुन्हा |
सातार्यातून युवक बेपत्ता |
नागठाण्यात युवकाची आत्महत्या |
उदयनराजे यांना मतदान करून गादीचा सन्मान ठेवा |
जपानचे स्लिम लँडर तिसऱ्यांदा जागृत |
कोल्हापुरातील अंबाबाईच्या रथोत्सव |
छत्रपतींच्या वंशजांना जावळीचा स्वाभिमान सांगू नका |
माझ्याकडे विरोधकांच्या अनेक भानगडी |