सातारा : सातारा येथील महेश नागरी पतसंस्थेत खोटी कागदपत्रे तयार करुन सुमारे सव्वा कोटी रुपयांचा अपहार केल्याचे प्रकरण उघडकीस आल्यामुळे सातार्यातील सहकार क्षेत्रामध्ये खळबळ उडाली असून या प्रकरणी शाखा व्यवस्थापकासह सहाजणांना अटक करण्यात आली आहे.
याबाबत सविस्तर माहिती अशी की, सातारा येथील भवानी पेठेत महेश नागरी पतसंस्था आहे. या पतसंस्थेचा व्यवस्थापक म्हणून अनिल जाधव हा 2003 ते 2013 दरम्यान कार्यभार सांभाळत होता. या पतसंस्थेचे सर्व आर्थिक व्यवहार जाधव हा दहा वर्षापासून सांभाळत असल्यामुळे त्याने आपल्या अधिकारांचा गैरवापर करीत अनेक खोटी कागदपत्रे तयार केली. त्या खोट्या कागदपत्रांच्या आधारे विविध कर्ज व सेव्हिंग खात्यामध्ये खोटे हिशोब, जमाखर्चाची जाधव याने नोंद केली. तसेच रेकॉर्डमध्ये व्हाईटनरच्या सहाय्याने खाडाखोड करुन नोंदी बदलल्या. या सर्व अपहारामध्ये सुधीर जयसिंग जाधव, विजया अनिल जाधव, जयसिंग मानसिंग जाधव (सर्व रा. करंडी, ता. सातारा), अजित श्रीमंत देशमुख व शिवाजीराव बाजीराव देशमुख (दोघे रा. मांडवे, ता. सातारा) या सर्वांनी संगनमत करुन महेश नागरी पतसंस्थेच्या संचालक मंडळाची कोणतीही परवानगी न घेता सुमारे 1 कोटी 21 लाख 8 हजार रुपयांचा अपहार केल्याचे संचालक मंडळाच्या निदर्शनास आले. त्यानुसार पतसंस्थेचे सनदी लेखपाल हेमंत अनंत कुलकर्णी यांनी या प्रकरणी शाहूपुरी पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली होती. त्यानुसार शाहूपुरी पोलिसांनी या घटनेची गंभीर दखल घेत संशयित आरोपींना अटक केली असून अधिक तपास शाहूपुरी पोलीस करीत आहेत.
सातारा जिल्ह्यात तब्बल पन्नास हजार नवमतदार |
स्व. यशवंतराव चव्हाण यांना भारतरत्न देण्याची मागणी पंतप्रधान मोदींकडे करणार |
कराड तालुक्याच्या विकासासाठी एकत्र प्रयत्न करूया: खा. उदयनराजे भोसले |
खोऱ्याने मते घेणाऱ्या नेत्यांनी केले पाटण खोऱ्याकडे दुर्लक्ष |
सातारा जिल्ह्यातील दोन पोलिस अधिकाऱ्यांसह ११ जणांना महासंचालक सन्मानचिन्ह जाहीर |
सांगलीच्या सिंचनासाठी मागणी झाली कमी |
पोटात चाकू भोसकून एकाला जिवे मारण्याचा प्रयत्न |
ठोसेघर येथे एकाचा डोक्यात दगड घालून निर्घृण खून |
उंच भरारी योजनेचे ब्रँन्ड ऍम्बेसिडर म्हणून मोनिका राठी तसेच सौरभ भोसले यांची निवड |
केट्स पॉईंट वरुन आत्महत्त्या केलेल्याचा मृतदेह दरीबाहेर काढण्यात यश |
शेंद्रे येथील तिहेरी अपघात प्रकरणी तिघांवर गुन्हा |
सुमारे अडीच लाखांच्या बांधकाम साहित्याची चोरी |
एकास मारहाण केल्याप्रकरणी पाच जणांवर गुन्हा |
सातार्यातून युवक बेपत्ता |
नागठाण्यात युवकाची आत्महत्या |
सांगलीच्या सिंचनासाठी मागणी झाली कमी |
पोटात चाकू भोसकून एकाला जिवे मारण्याचा प्रयत्न |
ठोसेघर येथे एकाचा डोक्यात दगड घालून निर्घृण खून |
उंच भरारी योजनेचे ब्रँन्ड ऍम्बेसिडर म्हणून मोनिका राठी तसेच सौरभ भोसले यांची निवड |
केट्स पॉईंट वरुन आत्महत्त्या केलेल्याचा मृतदेह दरीबाहेर काढण्यात यश |
शेंद्रे येथील तिहेरी अपघात प्रकरणी तिघांवर गुन्हा |
सुमारे अडीच लाखांच्या बांधकाम साहित्याची चोरी |
एकास मारहाण केल्याप्रकरणी पाच जणांवर गुन्हा |
सातार्यातून युवक बेपत्ता |
नागठाण्यात युवकाची आत्महत्या |
उदयनराजे यांना मतदान करून गादीचा सन्मान ठेवा |
जपानचे स्लिम लँडर तिसऱ्यांदा जागृत |
कोल्हापुरातील अंबाबाईच्या रथोत्सव |
छत्रपतींच्या वंशजांना जावळीचा स्वाभिमान सांगू नका |
माझ्याकडे विरोधकांच्या अनेक भानगडी |