कोपर्डे हवेली : कराड तालुक्यातील राजमाची येथील तलावात कॉलेज युवकाचा मृतदेह आढळून आला आहे. संबंधित कॉलेज युवकाने आत्महत्या केल्याचा संशय व्यक्त केला जात आहे. कुणाल सोपान गुंजाळ (वय १८, रा. आडगाव रेपाळ, ता. येवला, जि. नाशिक) असे तलावात मृतदेह आढळलेल्या कॉलेज युवकाचे नाव आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, कुणाल गुंजाळ हा कराड तालुक्यातील राजमाची येथील मोकाशी फूड टेक्नॉलॉजी कॉलेजमध्ये पहिल्या वर्षात शिक्षण घेत होता. रविवारी रात्री सात वाजण्याच्या सुमारास वसतिगृहामध्ये हजेरी घेण्यात आली. त्यावेळी कुणाल गुंजाळ तेथे आढळून आला नाही. त्यामुळे त्याचा कॉलेज परिसरात शोध घेण्यात आला. मात्र, तो कुठेच सापडला नाही. त्यानंतर त्याच्या मोबाईल क्रमांकावर संपर्क साधला असता त्याने फोन उचलला नाही. वसतिगृहात रुमवर फोन ठेवून तो बाहेर गेला होता. 'मी येथे सापडलो नाही तर तळ्यावर येऊन शोधा' अशा प्रकारचा मेसेज कुणाल गुंजाळ यांनी मोबाईल वरती टाईप करून ठेवला होता.
दरम्यान, कुणाल गुंजाळ बेपत्ता असल्याची फिर्याद रविवारी रात्री दहा वाजण्याच्या सुमारास पोलिसात देण्यात आली होती. सोमवारी सकाळी त्याचा शोध सुरू केला असता दुपारी एक वाजण्याच्या सुमारास राजमाची तलावामध्ये त्याचा मृतदेह आढळून आला. या प्रकाराने परिसरात खळबळ उडाली आहे.
सातारा जिल्ह्यात तब्बल पन्नास हजार नवमतदार |
स्व. यशवंतराव चव्हाण यांना भारतरत्न देण्याची मागणी पंतप्रधान मोदींकडे करणार |
कराड तालुक्याच्या विकासासाठी एकत्र प्रयत्न करूया: खा. उदयनराजे भोसले |
खोऱ्याने मते घेणाऱ्या नेत्यांनी केले पाटण खोऱ्याकडे दुर्लक्ष |
सातारा जिल्ह्यातील दोन पोलिस अधिकाऱ्यांसह ११ जणांना महासंचालक सन्मानचिन्ह जाहीर |
सांगलीच्या सिंचनासाठी मागणी झाली कमी |
पोटात चाकू भोसकून एकाला जिवे मारण्याचा प्रयत्न |
ठोसेघर येथे एकाचा डोक्यात दगड घालून निर्घृण खून |
उंच भरारी योजनेचे ब्रँन्ड ऍम्बेसिडर म्हणून मोनिका राठी तसेच सौरभ भोसले यांची निवड |
केट्स पॉईंट वरुन आत्महत्त्या केलेल्याचा मृतदेह दरीबाहेर काढण्यात यश |
शेंद्रे येथील तिहेरी अपघात प्रकरणी तिघांवर गुन्हा |
सुमारे अडीच लाखांच्या बांधकाम साहित्याची चोरी |
एकास मारहाण केल्याप्रकरणी पाच जणांवर गुन्हा |
सातार्यातून युवक बेपत्ता |
नागठाण्यात युवकाची आत्महत्या |
सांगलीच्या सिंचनासाठी मागणी झाली कमी |
पोटात चाकू भोसकून एकाला जिवे मारण्याचा प्रयत्न |
ठोसेघर येथे एकाचा डोक्यात दगड घालून निर्घृण खून |
उंच भरारी योजनेचे ब्रँन्ड ऍम्बेसिडर म्हणून मोनिका राठी तसेच सौरभ भोसले यांची निवड |
केट्स पॉईंट वरुन आत्महत्त्या केलेल्याचा मृतदेह दरीबाहेर काढण्यात यश |
शेंद्रे येथील तिहेरी अपघात प्रकरणी तिघांवर गुन्हा |
सुमारे अडीच लाखांच्या बांधकाम साहित्याची चोरी |
एकास मारहाण केल्याप्रकरणी पाच जणांवर गुन्हा |
सातार्यातून युवक बेपत्ता |
नागठाण्यात युवकाची आत्महत्या |
उदयनराजे यांना मतदान करून गादीचा सन्मान ठेवा |
जपानचे स्लिम लँडर तिसऱ्यांदा जागृत |
कोल्हापुरातील अंबाबाईच्या रथोत्सव |
छत्रपतींच्या वंशजांना जावळीचा स्वाभिमान सांगू नका |
माझ्याकडे विरोधकांच्या अनेक भानगडी |