12:49am | Aug 20, 2018 |
कराड : मराठा समाजाला आरक्षण यासह विविध मागणी घेऊन कराडच्या मराठा रणरागिनींनी मुंबई येथील आझाद मैदानावर दि. २३ ऑगस्टपासून बेमुदत ठिय्या आंदोलनाला प्रारंभ करत आहेत. मराठा समाजाच्या सर्व मागण्या सरकार जोपर्यंत मान्य करत नाही, तोपर्यंत उठणार नाही असा निर्धार करत राज्यातील महिलांनी या आंदोलनात सहभागी व्हावे, असे आवाहन कराड मधील मराठा महिला भगिनींनी केले आहे.
कराडमध्ये मराठा समन्वय समिती सदस्यांची बैठकीनंतर मराठा महिला समन्वय सदस्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी त्या बोलत होत्या.
त्या म्हणाल्या, कराडमध्ये आज झालेल्या मराठा समाज समन्वय समितीच्या बैठकीत मुंबईमध्ये ठिय्या आंदोलन करण्याचा निर्णय मराठा महिला भगिनींनी घेतला असल्याचे सांगण्यात आले. या निर्णयानुसार मुंबईमध्ये आझाद मैदानावर दि. २३ ऑगस्टपासून कराडमधील मराठा महिला भगिनी बेमुदत ठिय्या आंदोलन सुरू करणार आहेत. मराठा समाजाला आरक्षण मिळालेच पाहिजे. या प्रमुख मागणीसह समाजाच्या इतर सर्व मागण्या मान्य होईपर्यंत आंदोलन सुरूच राहणार असल्याचे यावेळी स्पष्ट करण्यात आले. कोणत्याही परिस्थितीत आंदोलन स्थगित केले जाणार नाही. या महिलांच्या ठिय्या आंदोलनामध्ये राज्यभरातील मराठा महिला भगिनींनी सहभागी व्हावे, असे आवाहनही यावेळी करण्यात आले.
क्रांतीची सुरुवात कराड मधून होते. त्याच प्रकारे संपूर्ण राज्यभर प्रथम मराठा महिलांच्या ठिय्या आंदोलनाची सुरुवात कराडमधून झाली आहे. या आंदोलनाची धग आणखी वाढविण्यासाठी आम्ही कराडमधील महिला मुंबईमध्ये आझाद मैदानावर ठिय्या आंदोलनाला बसणार असल्याचा निर्धार आम्ही केला आहे. जोपर्यंत शासन आमच्या मागण्या मान्य करणार नाही तोपर्यंत आम्ही मुंबई किंवा आझाद मैदानावरून उठणार नाही. कराड मधून सुरू झालेले महिलांचे ठिय्या आंदोलन शासन मागण्या मान्य होत नाही तोपर्यंत सुरू ठेवण्यासाठी आम्ही हा निर्णय घेतला आहे. त्याला मराठा समाजातील सर्व घटकांचे सहकार्य मिळेल, अशी अपेक्षाही मराठा समाज महिला समन्वय समिती सदस्य व मराठा महिला भगिनींनी व्यक्त केली आहे.
नेतृत्वाशिवाय आंदोलन
मराठा समाजाच्या सर्व मागण्या शासनाला माहिती आहेत. त्याबाबतचे निवेदन शासनाला दिले जाणार आहे. त्यानंतर मात्र मराठा समाजाचा कोणीही प्रतिनिधी अथवा नेता ठिय्या आंदोलनाला बसलेल्या महिलांचा प्रतिनिधी म्हणून शासनाबरोबर तसेच इतर कोणाशीही संवाद साधणार नाही. मग तो पुण्याचा असो, वा मुंबईचा किंवा राज्यातील कोणीही असेही यावेळी कराडच्या महिला भगिनींनी ठणकावून सांगितले.
सातारा जिल्ह्यात तब्बल पन्नास हजार नवमतदार |
स्व. यशवंतराव चव्हाण यांना भारतरत्न देण्याची मागणी पंतप्रधान मोदींकडे करणार |
कराड तालुक्याच्या विकासासाठी एकत्र प्रयत्न करूया: खा. उदयनराजे भोसले |
खोऱ्याने मते घेणाऱ्या नेत्यांनी केले पाटण खोऱ्याकडे दुर्लक्ष |
सातारा जिल्ह्यातील दोन पोलिस अधिकाऱ्यांसह ११ जणांना महासंचालक सन्मानचिन्ह जाहीर |
सांगलीच्या सिंचनासाठी मागणी झाली कमी |
पोटात चाकू भोसकून एकाला जिवे मारण्याचा प्रयत्न |
ठोसेघर येथे एकाचा डोक्यात दगड घालून निर्घृण खून |
उंच भरारी योजनेचे ब्रँन्ड ऍम्बेसिडर म्हणून मोनिका राठी तसेच सौरभ भोसले यांची निवड |
केट्स पॉईंट वरुन आत्महत्त्या केलेल्याचा मृतदेह दरीबाहेर काढण्यात यश |
शेंद्रे येथील तिहेरी अपघात प्रकरणी तिघांवर गुन्हा |
सुमारे अडीच लाखांच्या बांधकाम साहित्याची चोरी |
एकास मारहाण केल्याप्रकरणी पाच जणांवर गुन्हा |
सातार्यातून युवक बेपत्ता |
नागठाण्यात युवकाची आत्महत्या |
सांगलीच्या सिंचनासाठी मागणी झाली कमी |
पोटात चाकू भोसकून एकाला जिवे मारण्याचा प्रयत्न |
ठोसेघर येथे एकाचा डोक्यात दगड घालून निर्घृण खून |
उंच भरारी योजनेचे ब्रँन्ड ऍम्बेसिडर म्हणून मोनिका राठी तसेच सौरभ भोसले यांची निवड |
केट्स पॉईंट वरुन आत्महत्त्या केलेल्याचा मृतदेह दरीबाहेर काढण्यात यश |
शेंद्रे येथील तिहेरी अपघात प्रकरणी तिघांवर गुन्हा |
सुमारे अडीच लाखांच्या बांधकाम साहित्याची चोरी |
एकास मारहाण केल्याप्रकरणी पाच जणांवर गुन्हा |
सातार्यातून युवक बेपत्ता |
नागठाण्यात युवकाची आत्महत्या |
उदयनराजे यांना मतदान करून गादीचा सन्मान ठेवा |
जपानचे स्लिम लँडर तिसऱ्यांदा जागृत |
कोल्हापुरातील अंबाबाईच्या रथोत्सव |
छत्रपतींच्या वंशजांना जावळीचा स्वाभिमान सांगू नका |
माझ्याकडे विरोधकांच्या अनेक भानगडी |