02:35pm | Apr 09, 2018 |
कराड : मालमत्तेच्या वादातून आई आणि मोठ्या भावाचा धारदार शस्त्राने तब्बल 50 हून अधिकवेळा वार करुन निर्घृण हत्या केल्याची घटना आज दि. 9 रोजी पहाटे मलकापूर, आगाशिवनगर येथील आझाद कॉलनीजवळ घडली आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, मलकापूर, आगाशिवनगर येथील आझाद कॉलनीत राजेश गजानन घोडके (वय 40), जयश्री गजानन घोडके व राकेश गजानन घोडके (वय 38) हे राहण्यास आहेत. गेल्या काही दिवसांपासून या कुटूंबामध्ये मालमत्तेच्या कारणावरुन टोकाचे वाद निर्माण झाले होते. जयश्री घोडके यांचा धाकटा मुलगा राकेश हा मालमत्तेच्या कारणावरुन आई व मोठ्या भावाशी सतत वाद घालत होता. सोमवारी पहाटेही याच कारणावरुन घोडके कुटूंबामध्ये जोरदार वाद झाला. यावेळी चिडलेल्या राकेशने त्याच्या जवळील असणार्या धारदार शस्त्राने राजेश घोडके व आई जयश्री घोडके यांच्यावर सुमारे पन्नासपेक्षा जास्त वार केले. यामुळे दोघांचाही जागीच मृत्यू झाला. आरडाओरडा ऐकून या परिसरातील लोकांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेतली. यानंतर उपस्थित नागरिकांनी या घटनेची माहिती कराड शहर पोलिसांना दिली. पोलिसांनी घटनास्थळी दाखल होवून पंचनामा केला असून यातील संशयित आरोपी राकेश घोडके याला पोलिसांनी घटनास्थळावरुन अटक केली आहे. याबाबत अधिक तपास पोलीस उप अधीक्षक नवनाथ ढवळे, वरिष्ठ पोलीस निरीक्षक प्रमोद जाधव करीत आहेत. याबाबत गुन्हा दाखल करण्याचे काम सुरु आहे. दरम्यान, या दुहेरी हत्याकांडामुळे कराड शहरासह तालुक्यामध्ये खळबळ उडाली आहे.
सातारा जिल्ह्यात तब्बल पन्नास हजार नवमतदार |
स्व. यशवंतराव चव्हाण यांना भारतरत्न देण्याची मागणी पंतप्रधान मोदींकडे करणार |
कराड तालुक्याच्या विकासासाठी एकत्र प्रयत्न करूया: खा. उदयनराजे भोसले |
खोऱ्याने मते घेणाऱ्या नेत्यांनी केले पाटण खोऱ्याकडे दुर्लक्ष |
सातारा जिल्ह्यातील दोन पोलिस अधिकाऱ्यांसह ११ जणांना महासंचालक सन्मानचिन्ह जाहीर |
सांगलीच्या सिंचनासाठी मागणी झाली कमी |
पोटात चाकू भोसकून एकाला जिवे मारण्याचा प्रयत्न |
ठोसेघर येथे एकाचा डोक्यात दगड घालून निर्घृण खून |
उंच भरारी योजनेचे ब्रँन्ड ऍम्बेसिडर म्हणून मोनिका राठी तसेच सौरभ भोसले यांची निवड |
केट्स पॉईंट वरुन आत्महत्त्या केलेल्याचा मृतदेह दरीबाहेर काढण्यात यश |
शेंद्रे येथील तिहेरी अपघात प्रकरणी तिघांवर गुन्हा |
सुमारे अडीच लाखांच्या बांधकाम साहित्याची चोरी |
एकास मारहाण केल्याप्रकरणी पाच जणांवर गुन्हा |
सातार्यातून युवक बेपत्ता |
नागठाण्यात युवकाची आत्महत्या |
सांगलीच्या सिंचनासाठी मागणी झाली कमी |
पोटात चाकू भोसकून एकाला जिवे मारण्याचा प्रयत्न |
ठोसेघर येथे एकाचा डोक्यात दगड घालून निर्घृण खून |
उंच भरारी योजनेचे ब्रँन्ड ऍम्बेसिडर म्हणून मोनिका राठी तसेच सौरभ भोसले यांची निवड |
केट्स पॉईंट वरुन आत्महत्त्या केलेल्याचा मृतदेह दरीबाहेर काढण्यात यश |
शेंद्रे येथील तिहेरी अपघात प्रकरणी तिघांवर गुन्हा |
सुमारे अडीच लाखांच्या बांधकाम साहित्याची चोरी |
एकास मारहाण केल्याप्रकरणी पाच जणांवर गुन्हा |
सातार्यातून युवक बेपत्ता |
नागठाण्यात युवकाची आत्महत्या |
उदयनराजे यांना मतदान करून गादीचा सन्मान ठेवा |
जपानचे स्लिम लँडर तिसऱ्यांदा जागृत |
कोल्हापुरातील अंबाबाईच्या रथोत्सव |
छत्रपतींच्या वंशजांना जावळीचा स्वाभिमान सांगू नका |
माझ्याकडे विरोधकांच्या अनेक भानगडी |