RNI REG.NO. MAHMAR/2014/56135

What are you looking for?

Contact Us

Address:

Email:

Tel:

Sadar Bazar, Satara, Maharashtra 415001

contact@tmnnews.com

02162 237 474

What are you looking for?

×

साताऱ्यात बाप्पांच्या विसर्जनासाठी १०० टनाची महाकाय क्रेन

11 September 2019 at 23:22

सातारा : सातारा शहरातील विविध गणेशोत्सव मंडळांच्या गणेश मूर्तीचे विसर्जन महाकाय क्रेनच्या माध्यमातुन  यावर्षीसुध्दा केले जाणार आहे. 

सातारा शहरातील बुधवार नाक्याजवळ नगरपालिकेच्या वतीने तयार करण्यात आलेला कृत्रिम तलाव गणेश विसर्जनासाठी सज्ज झाला आहे. मूर्ती विसर्जनासाठी १०० टनाची महाकाय क्रेन पुण्याहून मागवण्यात आली आहे. तसेच  यावर्षी विसर्जन मार्गावर वीस ठिकाणी सीसीटीव्ही केमेरे लावले आहेत. सुरक्षेसाठी तळ्याभोवती बॅरिकेट्स लावण्यात आले आहेत, अशी माहिती नगरपालिकेच्या बांधकाम विभागाकडून देण्यात आली. नगरपालिकेने बनविलेल्या कृत्रीम तळ्यात गणेश व दुर्गा देवीच्या मूर्तीचे विसर्जन करण्यात येते. दरवर्षी कराव्या लागणार्‍या तळयाच्या खोदकामाला यावर्षी खो बसला आहे. मागीलवर्षीचे तळे जैसे थे परिस्थितीत ठेवल्यामुळे यावर्षी पुन्हा तळे खोदण्याच्या खर्चाला कात्री बसली आहे. कृत्रीम तळे निर्मीती करण्यासाठी लाखो रूपयांचा करावा लागणारा खर्च यावर्षी वाचला आहे. 'कृत्रीम तळे खायला मिळे' ही म्हण त्यामुळे यावर्षी वापरता आली नाही. हे तळे बंदिस्त न केल्याने यंदा खोदकामाचा मोठा वेळ वाचला तळ्यात प्लास्टिक कागद टाकण्यात आला असून शेजारी असलेल्या विहिरीवर मोटारी लावून त्यामध्ये पाणीसाठा करून सार्वजनिक गणेश मंडळाच्या दहा दिवसांच्या गणेश मूर्ती या तळ्यात विसर्जित केल्या जातात. पालिकेकडून विसर्जनाची तयारी पूर्ण झाली आहे . मंगळवारी या ठिकाणी विजेचे तीन मनोरे उभारले जाणार आहेत. विसर्जनासाठी कोणत्याही प्रकारचा अडथळा येऊ नये व पुरेसा प्रकाश मिळावा यासाठी एका मनोर्‍यावर १५ हॅलोजन लावले आहेत. गतवर्षी क्रेन मातित रुतल्याने  विसर्जनाच्या तोंडावरच पालिकेला अनेक अडचणी निर्माण झाल्या होत्या. हा अनुभव लक्षात घेता यावेळी प्रशासनाकडून सर्व प्रकारची खबरदारी घेण्यात आली आहे.   पाणी साठवण क्षमता सुमारे ऐंशी लाख असून हे तळे पाण्याने भरले आहे.  राजवाडा, मोती चौक, देवी चौक, ५०१ पार्टी, सम्राट चौक, गोलबाग, गणेश विसर्जन तलाव  या ठिकाणी सीसीटीव्ही लावले, विसर्जन मार्गावरील खड्डे बुजवले, मिरवणुकीला अडथळा ठरणार्‍या विजेच्या तारांची दुरुस्ती केली आहे. 

६५० पोलिसाचा बंदोबस्त विसर्जनासाठी असून तळयावर सुरक्षारक्षकांची नेमणूक केली आहे. एकूण तीन शिफ्टमध्ये आठ सुरक्षारक्षक काम करणार आहेत.

 

शहरातील बहुतांश मंडळांनी मोठ्या उंचीच्या गणेशमूर्तींचे विसर्जन न करण्याचा निर्णय घेतला आहे. ढोल ताश्याच्या गजरात मिरवणुक पहायला मिळत आहे. कायमस्वरूपी तळ्याच्या मागणीचे झाले काय. हे तळे आहे त्याच परिस्थितीत कायम ठेवल्यास पालिकेच्या खर्चाची बचत होणार आहे. तसेच शहरातील गणेश विसर्जनाचा कायमचा प्रश्‍न सुटणार आहे. त्यामुळे कृत्रीम तळे कायमचे या ठिकाणीच रहावे अशी लोकभावना तयार झाली आहे.

नंदगिरी महाराजांवर दाखल केलेल्या खोट्या गुन्ह्याचा सोळशी ग्रामस्थांकडून निषेध

सोळशी, ता. कोरेगाव येथील शनी देवस्थानच्या नंदगिरी महाराजांवर सोळशी येथील काही लोकांनी विनयभंगाचा खोटा गुन्हा दाखल केला होता. नंदगिरी महाराज गेल्या अनेक वर्षांपासून सोळशी येथील शनी देवस्थानमध्ये लोकांची सेवा करीत आहेत. अशा व्यक्तीवर पूर्वग्रहदूषित

33 minutes before

श्री शिवाजी विद्यालयात स्व.पी.डी. पाटील यांची पुण्यतिथी साजरी

येथील श्री शिवाजी विद्यालयात स्व.पी.डी.पाटील यांचा 11 वा पुण्यस्मरण दिन विविध उपक्रमांनी साजरा करण्यात आला.

13 hours before

मलकापूरच्या मतदार यादीत बोगस नावे

मतदार यादी पुनर्निरीक्षण कार्यक्रमादरम्यान कराड दक्षिण विधानसभा मतदार संघातील मलकापूर शहरात मतदार यादीमध्ये ऑनलाईन दाखल अर्जांची पडताळणी न करता बोगस नावांचा समावेश झाला आहे. बीएलओंकडून पडताळणी व प्रत्यक्ष कागदपत्रांची तपासणी न झालेली

14 hours before

असंघटीत कामगार मेळावा हा कष्टकर्‍यांना बळ देणारा : सुदर्शन पाटसकर

युवा विकास प्रतिष्ठान कराड व भाजपा युवा मोर्चा तर्फे असंघटीत कामगार मेळाव्याचे आयोजन बाबुभाई पद्मसी शहा हॉल विठ्ठल चौक कराड येथे नुकतेच करण्यात आले. सदर मेळाव्यास मोहन जाधव संचालक पुणे म्हाडा हे प्रमुख अतिथी म्हणून उपस्थिती होते.

13 hours before