12:39am | Oct 28, 2018 |
कराड : मुंढे, ता. कराड येथील काळवाट या शिवारात दुपारी दोन वाजण्याच्या सुमारास अचानकपणे लागलेल्या आगीत येथील शेकडो एकर ऊस जळून खाक झाला. ही आग शॉर्ट सर्किटने लागल्याचा प्राथमिक अंदाज असून मुंढे, गोटे, खोडशी, वनवासमाची गावातील युवकांनी या शिवाराकडे धाव घेत ऊस तोडवण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे शिवारातील अनेक एकर ऊस आगीपासून वाचवण्यात यश आले आहे. या आगीत शेतकऱ्यांचे लाखो रूपयांचे नुकसान झाले आहे.
मुंढे, गोटे,खोडशी व वनवासमाची या चार गावांची हद्द असणाऱ्या काळवाट या शिवारात हजारो एकर ऊस शेती आहे. अत्यंत चांगल्या प्रतीचा ऊसाचे उत्पादन या शिवारातून होते. शनिवारी दुपारी अचानकपणे मुंढे गावच्या हद्दीत काळवाट शिवारात ऊसाला आग लागली. या आगीने रौद्ररूप धारण केल्यानंतर चारही गावातील शेतकऱ्यांच्या ही बाब लक्षात आली.
आग विझवण्यासाठी युवकांसह शेतकऱ्यांनी प्रयत्न केला. मात्र आगीने रौद्ररूप धारण केल्याने त्यांना आगीकडे पाहत बसण्याशिवाय पर्याय उरला नाही. मात्र आग लागलेला परिसर सोडून अन्य ठिकाणी आगीचा संपर्क होऊ नये म्हणून आगीच्या चौफेर ऊस तोडवण्यात आला. तर वीज कंपनीने तातडीने या विभागतील वीज प्रवाह खंडीत केला. आगीत शिवारातील आडसाल, सुरूची लागण तसेच खोडवी असणारा ऊस आगीच्या भक्षस्थानी आला. त्यामुळे शेतकऱ्यांचे लाखो रूपयांचे नुकसान झाले आहे.
दरम्यान, महसूल विभागाचे मंडलअधिकारी, तलाठी, वीज कंपनीचे शाखा अभियंता यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली. महसूल विभागाच्यातीने पंचनामा करण्याचे काम सुरू होते.
वीज वाहिन्यांचे जाळे
मुंढे, गोटे, खोडशी, वनवासमाचीच्या काळवाट शिवारात मोठ्याप्रमाणावर वीज वाहिन्यांचे जाळे आहे. ४२० वॉल्टपासून ते मेघा लाईनपर्यंतच्या सर्व वाहिन्या याशिवारातून जात आहेत. मात्र अनेक ठिकाणचे वीज खांब वाकलेले आहेत तर अनेक वाहिन्या सहज हाताला येणाऱ्या सारख्या आहेत. त्यामुळे या परिसरात सातत्याने शॉट सर्किटच्या घटना घडत असल्याचे येथील शेतकऱ्याचे म्हणणे आहे. याबाबत वारंवार तक्रारी करूनही वीज कंपनीकडून कोणतीही काळजी घेतली जात नसल्याचा आरोपही शेतकरी वर्गातून होत आहे.
वीज कंपनीच जबाबदार
मुंढे काळावाट परिसरात वीज वाहिन्यांचे जाळे मोठ्या प्रमाणावर आहे. अनेक वाहिन्या येथील ऊसाला टेकत आहेत तर खांब वाकले आहेत. त्यामुळे शॉर्ट सर्किट सारख्या घटना या विभागात वारंवार घडत आहेत. यााबाबत वीज कंपनीकडे वारंवार तक्रारी करूनही दखल घेतली जात नाही.
- सागर पाटील, उपसरपंच मुंढे
सातारा जिल्ह्यात तब्बल पन्नास हजार नवमतदार |
स्व. यशवंतराव चव्हाण यांना भारतरत्न देण्याची मागणी पंतप्रधान मोदींकडे करणार |
कराड तालुक्याच्या विकासासाठी एकत्र प्रयत्न करूया: खा. उदयनराजे भोसले |
खोऱ्याने मते घेणाऱ्या नेत्यांनी केले पाटण खोऱ्याकडे दुर्लक्ष |
सातारा जिल्ह्यातील दोन पोलिस अधिकाऱ्यांसह ११ जणांना महासंचालक सन्मानचिन्ह जाहीर |
सांगलीच्या सिंचनासाठी मागणी झाली कमी |
पोटात चाकू भोसकून एकाला जिवे मारण्याचा प्रयत्न |
ठोसेघर येथे एकाचा डोक्यात दगड घालून निर्घृण खून |
उंच भरारी योजनेचे ब्रँन्ड ऍम्बेसिडर म्हणून मोनिका राठी तसेच सौरभ भोसले यांची निवड |
केट्स पॉईंट वरुन आत्महत्त्या केलेल्याचा मृतदेह दरीबाहेर काढण्यात यश |
शेंद्रे येथील तिहेरी अपघात प्रकरणी तिघांवर गुन्हा |
सुमारे अडीच लाखांच्या बांधकाम साहित्याची चोरी |
एकास मारहाण केल्याप्रकरणी पाच जणांवर गुन्हा |
सातार्यातून युवक बेपत्ता |
नागठाण्यात युवकाची आत्महत्या |
सांगलीच्या सिंचनासाठी मागणी झाली कमी |
पोटात चाकू भोसकून एकाला जिवे मारण्याचा प्रयत्न |
ठोसेघर येथे एकाचा डोक्यात दगड घालून निर्घृण खून |
उंच भरारी योजनेचे ब्रँन्ड ऍम्बेसिडर म्हणून मोनिका राठी तसेच सौरभ भोसले यांची निवड |
केट्स पॉईंट वरुन आत्महत्त्या केलेल्याचा मृतदेह दरीबाहेर काढण्यात यश |
शेंद्रे येथील तिहेरी अपघात प्रकरणी तिघांवर गुन्हा |
सुमारे अडीच लाखांच्या बांधकाम साहित्याची चोरी |
एकास मारहाण केल्याप्रकरणी पाच जणांवर गुन्हा |
सातार्यातून युवक बेपत्ता |
नागठाण्यात युवकाची आत्महत्या |
उदयनराजे यांना मतदान करून गादीचा सन्मान ठेवा |
जपानचे स्लिम लँडर तिसऱ्यांदा जागृत |
कोल्हापुरातील अंबाबाईच्या रथोत्सव |
छत्रपतींच्या वंशजांना जावळीचा स्वाभिमान सांगू नका |
माझ्याकडे विरोधकांच्या अनेक भानगडी |