10:33pm | Dec 31, 2018 |
सातारा : आयुष्यभर गोळ्या खाऊन जगायचे व रिपोर्ट नार्मल ठेवायचे म्हणजे आरोग्य नव्हे. आपण आजारीच पडणार नाही याची काळजी घेणे गरजेचे आहे. चांगल्या आरोग्यासाठी चांगल्या जीवनशैलीचा अवलंब केला पाहिजे, असा कानमंत्र विश्वगण आयुर्वेदचे आयुर्वेदाचार्य डॉ. प्रवीण माने यांनी दिला.
मसूर (ता. कराड) येथील ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते रामचंद्र तुकाराम चेणगे यांच्या द्वितीय स्मृतीदिनानिमित्त अष्टविनायक गल्लीतील दत्त मंदिरात 'आरोग्यदायी जीवनशैली' विषयावर डॉ. माने यांचे व्याख्यान आयोजित करण्यात आले होते. त्यावेळी ते बोलत होते. पूर्वी रोगजंतुमुळे आजार व्हायचे. आता जीवनशैली बदलल्यामुळे हृदयरोग, मधूमेह, रक्तदाब, निद्रानाश यासारख्या व्याधी होत आहेत. अयोग्य आहार, अयोग्य विहार, अयोग्य विचार, प्रतिकारशक्तीचा अभाव, अनुवंशिकता, अविचारी औषधे यामुळे आजार मागे लागतात. आजारी पडण्याची ही सहा प्रमुख कारणे आहेत. उत्तम आरोग्यासाठी पहाटे साडेपाचच्या आत उठलेच पाहिजे. अभ्यंग, व्यायाम केला पाहिजे. दररोज सूर्यनमस्कार केल्यास विशेष फायदा होतो, असे त्यांनी सांगितले. दूध आणि मीठ, फळे आणि दूध, मासे आणि दूध, मध व गरम पाणी, चहा चपाती हे विरूध्दान्न असून ते टाळले पाहिजे. आहार भूक असेल तेव्हा व भूक असेल तेवढा घ्यावा. आहारानंतर आईस्क्रीम, फलाहार, कोल्ड कॉफी घेऊ नये. सकाळचे जेवण यथेच्छ जेवावे, तर रात्रीचे अत्यल्प. त्यामुळे आरोग्यदायी राहता येईल असे त्यांनी सांगितले. स्लाईड शोद्वारे त्यांनी श्रोत्यांना विषय पटवून दिला. त्यानंतर उपस्थितांनी विचारलेल्या विविध प्रश्नांना त्यांनी समर्पक उत्तरे दिली.
याप्रसंगी गोपीनाथ कांबळे यांनीही मनोगत व्यक्त केले. प्रारंभी स्व. रामचंद्र चेणगे यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. त्यांना व ज्येष्ठ स्वातंत्र्य सैनिक बाबुराव पाटील किवळकर यांना श्रध्दांजली वाहण्यात आली. आयोजक डॉ. बसवेश्वर चेणगे यांनी प्रास्ताविक केले. सूर्यकांत बाजारे यांनी स्वागत केले. लालासाहेब अवघडे यांनी आभार मानले.
सातारा जिल्ह्यात तब्बल पन्नास हजार नवमतदार |
स्व. यशवंतराव चव्हाण यांना भारतरत्न देण्याची मागणी पंतप्रधान मोदींकडे करणार |
कराड तालुक्याच्या विकासासाठी एकत्र प्रयत्न करूया: खा. उदयनराजे भोसले |
खोऱ्याने मते घेणाऱ्या नेत्यांनी केले पाटण खोऱ्याकडे दुर्लक्ष |
सातारा जिल्ह्यातील दोन पोलिस अधिकाऱ्यांसह ११ जणांना महासंचालक सन्मानचिन्ह जाहीर |
सांगलीच्या सिंचनासाठी मागणी झाली कमी |
पोटात चाकू भोसकून एकाला जिवे मारण्याचा प्रयत्न |
ठोसेघर येथे एकाचा डोक्यात दगड घालून निर्घृण खून |
उंच भरारी योजनेचे ब्रँन्ड ऍम्बेसिडर म्हणून मोनिका राठी तसेच सौरभ भोसले यांची निवड |
केट्स पॉईंट वरुन आत्महत्त्या केलेल्याचा मृतदेह दरीबाहेर काढण्यात यश |
शेंद्रे येथील तिहेरी अपघात प्रकरणी तिघांवर गुन्हा |
सुमारे अडीच लाखांच्या बांधकाम साहित्याची चोरी |
एकास मारहाण केल्याप्रकरणी पाच जणांवर गुन्हा |
सातार्यातून युवक बेपत्ता |
नागठाण्यात युवकाची आत्महत्या |
सांगलीच्या सिंचनासाठी मागणी झाली कमी |
पोटात चाकू भोसकून एकाला जिवे मारण्याचा प्रयत्न |
ठोसेघर येथे एकाचा डोक्यात दगड घालून निर्घृण खून |
उंच भरारी योजनेचे ब्रँन्ड ऍम्बेसिडर म्हणून मोनिका राठी तसेच सौरभ भोसले यांची निवड |
केट्स पॉईंट वरुन आत्महत्त्या केलेल्याचा मृतदेह दरीबाहेर काढण्यात यश |
शेंद्रे येथील तिहेरी अपघात प्रकरणी तिघांवर गुन्हा |
सुमारे अडीच लाखांच्या बांधकाम साहित्याची चोरी |
एकास मारहाण केल्याप्रकरणी पाच जणांवर गुन्हा |
सातार्यातून युवक बेपत्ता |
नागठाण्यात युवकाची आत्महत्या |
उदयनराजे यांना मतदान करून गादीचा सन्मान ठेवा |
जपानचे स्लिम लँडर तिसऱ्यांदा जागृत |
कोल्हापुरातील अंबाबाईच्या रथोत्सव |
छत्रपतींच्या वंशजांना जावळीचा स्वाभिमान सांगू नका |
माझ्याकडे विरोधकांच्या अनेक भानगडी |