RNI REG.NO. MAHMAR/2014/56135

What are you looking for?

Contact Us

Address:

Email:

Tel:

Sadar Bazar, Satara, Maharashtra 415001

contact@tmnnews.com

02162 237 474

What are you looking for?

×

खा. श्री. छ. उदयनराजे राष्ट्रवादीचे स्टार प्रचारक; पण, 'दहा नंबरी' !

09 June 2019 at 18:08

सातारा : सतराव्या लोकसभा निवडणुकीत मोदी लाटेतही खा. श्री. छ. उदयनराजे भोसले सुमारे दीड लाखांच्या मताधिक्याने निवडून आले आहेत. काहीही म्हटले तरी सातारा जिल्ह्यात उदयनराजेंची क्रेझ आहे. ज्या राष्ट्रवादीच्या तिकिटावर उदयनराजे निवडणूक लढवून जिंकूनही आले, त्याच खा. श्री. छ. उदयनराजेंना राष्ट्रवादीकडून सापत्नभावाची वागणूक दिली जात असल्याचे चित्र उघड झाले आहे. राज्यातील महापालिकांच्या पोट निवडणुकांच्या निवडणूक स्टार प्रचारक म्हणून उदयनराजेंचे दहा नंबरवर घसरल्यामुळे सातार्‍यातील तसेच राज्यातील उदयनराजे समर्थकांमध्ये मात्र प्रक्षुब्धतेची लाट निर्माण झाली आहे.

राज्यात सध्या महापालिकांच्या पोट निवडणुकांचा कार्यक्रम जाहीर झाला आहे. राष्ट्रवादीनेही राज्यातील पोट निवडणुका जिंकण्याचा चंग बांधला आहे. त्यासाठी राष्ट्रवादीने पक्षातील सुमारे वीस आमदार व खासदारांची स्टार प्रचारक म्हणून निवड केली आहे. त्याची यादी राज्य निवडणूक आयोगाकडे पाठविण्यात आली आहे. यामध्ये प्रथम क्रमांकावर राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील असून त्यानंतर अनुक्रमे आ. छगन भुजबळ, अजित पवार, दिलीप वळसे-पाटील, सुनिल तटकरे, खा. सुप्रिया सुळे, आ. धनंजय मुंडे, खा. अमोल कोल्हे, माजी आ. गणेश नाईक, तर दहा नंबरवर सातार्‍याचे खा. श्री. छ. उदयनराजे यांचे नाव आहे. उदयनराजेंचे नाव स्टार प्रचारक म्हणून दहाव्या नंबरवर असल्यामुळे खा. उदयनराजेंना स्टार प्रचारक कसे म्हणायचे, असा संतप्त सवाल खा. उदयनराजे प्रेमींनी केला आहे. नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत राष्ट्रवादीचा विजयी झालेला कोणताही उमेदवार उदयनराजेंना मिळालेल्या मताधिक्याच्या जवळपासही नाही. राष्ट्रवादी सुप्रिमो शरद पवार उदयनराजेंना राष्ट्रवादीचा चेहरा म्हणून राज्यभर फिरवित आहेत. खा. उदयनराजेंनीही निकालाच्या दिवसापासूनच राज्यभरात जनसंपर्कासाठी भिरकीट लावली आहे. परवा झालेल्या शिवराज्याभिषेक दिन सोहळ्यासाठी खा. उदयनराजेंनी रायगडावर हजेरी लावली होती. रायगडावरुनच उदयनराजेंनी भाजप-शिवसेने विरोधात रणशिंग फुंकून 1857 च्या लढ्याची महाराष्ट्रातील जनतेला आठवण करुन दिली. एकूणच उदयनराजेंचे आगामी इरादे स्पष्ट आहेत. मात्र शरद पवार घेत असलेल्या भूमिकेला राष्ट्रवादीतीलच काही लोकांकडून हरताळ फासला जात आहे. एकीकडे उदयनराजेंना स्टार प्रचारक म्हणून राज्यभर फिरवायचे उदयनराजेच राष्ट्रवादीचे मुख्यमंत्रीपदाचे दावेदार आहेत, अशा बातम्या पेरायच्या, तर दुसरीकडे स्टार प्रचारक म्हणून उदयनराजेंचे नाव दहाव्या नंबरवर घसरवायचे. अशी दुटप्पी भूमिका राष्ट्रवादीने सोडावी, अशी तीव्र भावना उदयनराजेंचे कट्टर समर्थक संग्राम बर्गे यांनी ‘सातारा टुडे’शी बोलताना व्यक्त केली.

नुकत्याच झालेल्या केंद्रीय मंत्रीमंडळाच्या शपथविधीवेळी राष्ट्रपती कार्यालयाने पाठविलेल्या निमंत्रणामध्ये राष्ट्रवादी सुप्रिमो खा. शरद पवार यांची जागा पाचव्या रांगेमध्ये आरक्षित केली होती. शेवटपर्यंत पहिल्या रांगेत बसण्यासंदर्भात सूचना न दिली गेल्याने पवारांनी शपथविधी सोहळ्यावर बहिष्कार टाकून तिथे जाणे टाळले होते. यावरुन देशभरात बराच खल झाला होता. शरद पवार जर बसण्यावरुन मानापमान नाट्य करीत असतील, तर ते अध्यक्ष असलेल्या राष्ट्रवादीतही खा. उदयनराजेंना दहा नंबर देवून राष्ट्रवादीने आपला खरा चेहरा उघड केला आहे, अशी जळजळीत भावना उदयनराजे प्रेमींनी ‘सातारा टुडे’कडे व्यक्त केली आहे.


वाहनांच्या बेशिस्त पार्किंगमुळे आरटीओ कार्यालयासमोरच वाहतुकीचे तीन तेरा

वाहनचालकांना वाहतुकीचे नियम शिकवणार्‍या उप प्रादेशिक परिवहन कार्यालय (आरटीओ) कार्यालयासमोरच रस्त्याच्या दुतर्फा होत असलेल्या बेकायदेशीर चारचाकी व दुचाकीच्या पार्किंगमुळे अजिंक्य हॉस्पिटल ते सैनिक स्कूल मार्गावर आरटीओ अधिकारी आणि एजंटांच्या संगनमताने

31 minutes before

जेसीबी पलटी होऊन झालेल्या अपघातात एकाचा मृत्यू

नलवडे (बिचुकले), ता. कोरेगाव येथील वाडगं तथा मोरदरा नावाच्या शेतशिवारातील जेसीबी पलटी होऊन झालेल्या अपघातात सामाजिक वनीकरण विभागाचा कंत्राटी कामगार जागीच ठार झाला.

2 hours before

फलटण येथील दत्त नगर येथे महिलेचा खून

दत्त नगर, चौधरवाडी ता. फलटण येथील हेमंत निंबाळकर यांच्या शेतातील घरात रहात असलेल्या महिलेचा अज्ञाताने खून केल्याची घटना घडली असून अरीफा रशीद शेख (वय ४८) असे मृत महिलेचे नाव आहे.

14 hours before

इथिओपियाचा फिक्रू अबेरा दादी प्रथम

ढगाळ वातावरण... यवतेश्वर घाटातील धबधबे ...रस्त्यावर आलेले ढग ... अशा आल्हाददायी वातावरणात आज सातारा हिल हाफ मॅरेथॉन स्पर्धा उत्साहात झाली. स्पर्धकांमुळे येवतेश्वर घाट फुलला होता. सातारकरांनी मार्गाच्या दुतर्फा उभे राहून टाळ्यांच्या गजरात धावपटूंचे

14 hours before