सातारा : मोक्काअंतर्गत दाखल गुन्ह्यात अटक करण्यासाठी शुक्रवारी रात्री प्रतापसिंहनगरात गेलेल्या पथकातील सातारा शहर पोलीस ठाण्याचे कर्मचारी अनिल स्वामी यांना धक्काबुक्की करत मारहाण केल्याप्रकरणी दत्ता जाधव याच्यासह पाचजणांवर सातारा शहर पोलीस ठाण्यात शुक्रवारी रात्री गुन्हा दाखल झाला आहे.
प्रतापसिंहनगरात राहणार्या दत्ता जाधव याच्याविरोधात मोक्काअंतर्गत कारवाई प्रस्तावित करण्यात आली आहे. मात्र तेव्हापासून दत्ता जाधव हा पसार होता. सातारा पोलिस शोध घेत जत तालुक्यातील प्रतापपूर येथे पोहचल्यानंतर दत्ता जाधव तेथूनही नाट्यमयरीत्या पसार झाला होता. यावेळी त्याच्या साथीदारांनी सातारा, सांगली पोलिसांवर तुफान दगडफेक व पोलीस व्हॅनची तोडफोड केली होती.
या घटनेनंतर दत्ता जाधव याचे वास्तव्य प्रतापसिंहनगरात असल्याची माहिती सातारा पोलिसांना मिळाली होती. यानुसार त्याला पकडण्यासाठी शुक्रवारी पोलीस पोलीस प्रतापसिंहनगर येथे गेले होते. रात्री सातनंतर पोलिसांच्या पथकांच्या हालचालींना मोठ्या प्रमाणात वेग आला. घरातून बाहेर पडून दत्ता जाधव हा देवळाजवळ असणार्या पत्र्याच्या शेडमध्ये असल्याचे स्पष्ट झाल्यानंतर साध्यावेशात असणार्या कर्मचार्यांची सगळी पथके त्या परिसरात एकत्रित करण्यात आली. पोलिसांच्या शोध मोहिमेवेळी दत्ता जाधव हा पत्र्याच्या शेडमध्ये लपल्याचे आढल्यानंतर त्याला पकडण्यात आले. दत्ता जाधव याला पकडल्यानंतर त्याने पोलिस पथकात असणार्या अनिल स्वामी या पोलीस कर्मचार्यास धक्काबुक्की केली. पोलिसांनी दत्ता जाधवला पकडल्याचे समजल्यानंतर त्याठिकाणी लक्ष्मी जाधव, गंगूबाई (पुर्ण नाव नाही), रमेश खुडे, झुंबर (पुर्ण नाव नाही) व इतर काहीजण आले. जाधवसह इतरांनी पोलीस पथकात असणार्या स्वामी यांचा गळा दाबला तसेच त्यांना खाली पाडून मारहाण करणे सुरु केले. यामुळे पोलिसांनी बळाचा वापर करत पोलिसांवर हल्ला करणार्यांना तेथून पिटाळून लावले.
या घटनेबाबत शहर पोलीस ठाण्यातील कर्मचारी राहुल खाडे यांनी रात्री तक्रार दिली. त्यानुसार दत्ता जाधवसह पाचजणांवर शासकीय कामात अडथळा आणल्याचा गुन्हा केला आहे. दरम्यान, जत येथेही पोलिस पकडण्यासाठी गेल्यानंतर अशाच पध्दतीने पोलिसांवर हल्ला केला होता. दहा दिवसांपूर्वी त्याने परत पोलिसांवर हल्ला केला.
सातारा जिल्ह्यात तब्बल पन्नास हजार नवमतदार |
स्व. यशवंतराव चव्हाण यांना भारतरत्न देण्याची मागणी पंतप्रधान मोदींकडे करणार |
कराड तालुक्याच्या विकासासाठी एकत्र प्रयत्न करूया: खा. उदयनराजे भोसले |
खोऱ्याने मते घेणाऱ्या नेत्यांनी केले पाटण खोऱ्याकडे दुर्लक्ष |
सातारा जिल्ह्यातील दोन पोलिस अधिकाऱ्यांसह ११ जणांना महासंचालक सन्मानचिन्ह जाहीर |
सांगलीच्या सिंचनासाठी मागणी झाली कमी |
पोटात चाकू भोसकून एकाला जिवे मारण्याचा प्रयत्न |
ठोसेघर येथे एकाचा डोक्यात दगड घालून निर्घृण खून |
उंच भरारी योजनेचे ब्रँन्ड ऍम्बेसिडर म्हणून मोनिका राठी तसेच सौरभ भोसले यांची निवड |
केट्स पॉईंट वरुन आत्महत्त्या केलेल्याचा मृतदेह दरीबाहेर काढण्यात यश |
शेंद्रे येथील तिहेरी अपघात प्रकरणी तिघांवर गुन्हा |
सुमारे अडीच लाखांच्या बांधकाम साहित्याची चोरी |
एकास मारहाण केल्याप्रकरणी पाच जणांवर गुन्हा |
सातार्यातून युवक बेपत्ता |
नागठाण्यात युवकाची आत्महत्या |
सांगलीच्या सिंचनासाठी मागणी झाली कमी |
पोटात चाकू भोसकून एकाला जिवे मारण्याचा प्रयत्न |
ठोसेघर येथे एकाचा डोक्यात दगड घालून निर्घृण खून |
उंच भरारी योजनेचे ब्रँन्ड ऍम्बेसिडर म्हणून मोनिका राठी तसेच सौरभ भोसले यांची निवड |
केट्स पॉईंट वरुन आत्महत्त्या केलेल्याचा मृतदेह दरीबाहेर काढण्यात यश |
शेंद्रे येथील तिहेरी अपघात प्रकरणी तिघांवर गुन्हा |
सुमारे अडीच लाखांच्या बांधकाम साहित्याची चोरी |
एकास मारहाण केल्याप्रकरणी पाच जणांवर गुन्हा |
सातार्यातून युवक बेपत्ता |
नागठाण्यात युवकाची आत्महत्या |
उदयनराजे यांना मतदान करून गादीचा सन्मान ठेवा |
जपानचे स्लिम लँडर तिसऱ्यांदा जागृत |
कोल्हापुरातील अंबाबाईच्या रथोत्सव |
छत्रपतींच्या वंशजांना जावळीचा स्वाभिमान सांगू नका |
माझ्याकडे विरोधकांच्या अनेक भानगडी |