कराड : मांडूळ तस्करीप्रकरणी अटक करण्यात आलेल्या दोघांना सोमवारी येथील प्रथमवर्ग न्यायालयासमोर हजर केले असताना न्यायालयाने त्यांची न्यायालयीन कोठडीत रवानगी केली. पांडुरंग भगवान शिंदे (वय 34), जयवंत शंकर ताटे (वय 33, दोघेही रा. कासेगाव ता. वाळवा, जि. सांगली), अशी त्यांची नावे आहेत.
मालखेड (ता. कराड) गावच्या हद्दीतील सम्राट लॉज परिसरात दोघेजण मांडूळ विक्रीसाठी येणार असल्याची माहिती पोलीस उपनिरीक्षक अशोक भापकर यांना खबर्याकडून मिळाली होती. त्यानुसार उपनिरीक्षक भापकर व पोलीस हवालदार म्हेत्रे यांनी रविवारी (दि. 12) सायंकाळी पाचच्या सुमारास मालखेड येथील सम्राट लॉज परिसरात सापळा रचून मांडूळ विक्रीसाठी आलेल्या पांडुरंग शिंदे व जयवंत ताटे यांना ताब्यात घेतले होते. तसेच त्यांनी आणलेले 30 लाख रूपये किंमतीचे मांडूळ ताब्यात घेऊन गुन्ह्यात वापरलेली दुचाकी जप्त केली होती. या गुन्ह्यात अटक केल्यानंतर दोघांना सोमवारी न्यायालयात हजर केले असता त्यांना न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली.
मांडूळाला अधिवासात सोडण्यास परवानगी
दरम्यान, वनविभागाच्या माध्यमातून मांडूळाला सुरक्षितरित्या नैसर्गिक अधिवासात सोडण्यास परवानगी मिळावी, असा अर्ज तालुका पोलिसांनी न्यायालयात केला होता. पोलिसांच्या मागणीनुसार मांडूळाला नैसर्गिक अधिवासात सोडण्यास न्यायालयाने परवानगी दिल्याने मांडूळाला वन विभागाच्या ताब्यात देऊन नैसर्गिक अधिवासात सोडण्यात येणार आहे. याबाबतची कायदेशीर आणि कागदोपत्री कार्यवाही पूर्ण झाल्यानंतर मांडूळ वन विभागाच्या ताब्यात दिले जाणार असल्याचे उपनिरीक्षक भापकर यांनी सांगितले.
सातारा जिल्ह्यात तब्बल पन्नास हजार नवमतदार |
स्व. यशवंतराव चव्हाण यांना भारतरत्न देण्याची मागणी पंतप्रधान मोदींकडे करणार |
कराड तालुक्याच्या विकासासाठी एकत्र प्रयत्न करूया: खा. उदयनराजे भोसले |
खोऱ्याने मते घेणाऱ्या नेत्यांनी केले पाटण खोऱ्याकडे दुर्लक्ष |
सातारा जिल्ह्यातील दोन पोलिस अधिकाऱ्यांसह ११ जणांना महासंचालक सन्मानचिन्ह जाहीर |
सांगलीच्या सिंचनासाठी मागणी झाली कमी |
पोटात चाकू भोसकून एकाला जिवे मारण्याचा प्रयत्न |
ठोसेघर येथे एकाचा डोक्यात दगड घालून निर्घृण खून |
उंच भरारी योजनेचे ब्रँन्ड ऍम्बेसिडर म्हणून मोनिका राठी तसेच सौरभ भोसले यांची निवड |
केट्स पॉईंट वरुन आत्महत्त्या केलेल्याचा मृतदेह दरीबाहेर काढण्यात यश |
शेंद्रे येथील तिहेरी अपघात प्रकरणी तिघांवर गुन्हा |
सुमारे अडीच लाखांच्या बांधकाम साहित्याची चोरी |
एकास मारहाण केल्याप्रकरणी पाच जणांवर गुन्हा |
सातार्यातून युवक बेपत्ता |
नागठाण्यात युवकाची आत्महत्या |
सांगलीच्या सिंचनासाठी मागणी झाली कमी |
पोटात चाकू भोसकून एकाला जिवे मारण्याचा प्रयत्न |
ठोसेघर येथे एकाचा डोक्यात दगड घालून निर्घृण खून |
उंच भरारी योजनेचे ब्रँन्ड ऍम्बेसिडर म्हणून मोनिका राठी तसेच सौरभ भोसले यांची निवड |
केट्स पॉईंट वरुन आत्महत्त्या केलेल्याचा मृतदेह दरीबाहेर काढण्यात यश |
शेंद्रे येथील तिहेरी अपघात प्रकरणी तिघांवर गुन्हा |
सुमारे अडीच लाखांच्या बांधकाम साहित्याची चोरी |
एकास मारहाण केल्याप्रकरणी पाच जणांवर गुन्हा |
सातार्यातून युवक बेपत्ता |
नागठाण्यात युवकाची आत्महत्या |
उदयनराजे यांना मतदान करून गादीचा सन्मान ठेवा |
जपानचे स्लिम लँडर तिसऱ्यांदा जागृत |
कोल्हापुरातील अंबाबाईच्या रथोत्सव |
छत्रपतींच्या वंशजांना जावळीचा स्वाभिमान सांगू नका |
माझ्याकडे विरोधकांच्या अनेक भानगडी |