04:57pm | Mar 28, 2020 |
कराड : लॉकडाऊन करण्यात आल्याने धास्तावलेल्या एका जोडप्याने बाइकवरून गावची वाट धरली असता शाहूवाडी येथे त्यांचा भीषण अपघात झाला. या अपघातात या जोडप्यासहीत त्यांचा लहान मुलगाही ठार झाला असून या दुर्देवी घटनेमुळे शाहूवाडीतील जांबूर या त्यांच्या गावावर शोककळा पसरली आहे.
करोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी राज्यात लॉकडाऊन करण्यात आल्यामुळे सर्जेराव भीमराव पाटील (वय ३३), पूनम सर्जेराव पाटील (वय २७) आणि त्यांचा मुलगा अभय सर्जेराव पाटील (वय ६) हे सर्वजण डोंबिवलीवरून गावी जांबूर येथे मंगळवारी जायला निघाले होते. जायला कोणतंही वाहन नसल्याने त्यांनी दुचाकीवरून गावी जाण्याचा निर्णय घेतला. ट्रिपल सीट निघालेल्या या जोडप्याने कराडपर्यंतच अंतरही पार केलं होतं. मात्र, कराडवरून चार-पाच किलोमीटरचं अंतर कापल्यानंतर शेडगेववाडीच्या दिशेने जात असताना त्यांचं भरधाव बाइकवरील नियंत्रण सुटलं आणि बाइक रस्त्याच्याकडेवरून घसरली. त्यामुळे त्यामुळे तिघे गंभीर जखमी झाले. त्यांना स्थानिकांन तात्काळ कृष्णा चॅरिटेबल हॉस्पिटलमध्ये दाखल केले. परंतु, दवाखान्यात पोहोचण्यापूर्वीच लहानग्या अभयचा मृत्यू झाला होता. तर सर्जेराव आणि त्यांची पत्नी पूनम हे दोघेही बेशुद्धावस्थेत होते. बुधवारी उपचार सुरू असताना सर्जेराव यांचा मृत्यू झाला तर पूनम यांची मृत्यूशी झुंज सुरूच होती. दवाखान्यात ३० तासांहून अधिक काळ मृत्यूशी झुंज देणाऱ्या पूनम यांची शुक्रवारी प्राणज्योत मालवली.
दरम्यान, सर्जेराव आणि अभय यांच्या पार्थिवावर बुधवारी रात्रीच त्यांच्या कुटुंबीयांनी अत्यंसंस्कार केले. तर पूनम यांच्या पार्थिवावर शुक्रवारी उशिरा अंत्यसंस्कार करण्यात आले.
सातारा जिल्ह्यात तब्बल पन्नास हजार नवमतदार |
स्व. यशवंतराव चव्हाण यांना भारतरत्न देण्याची मागणी पंतप्रधान मोदींकडे करणार |
कराड तालुक्याच्या विकासासाठी एकत्र प्रयत्न करूया: खा. उदयनराजे भोसले |
खोऱ्याने मते घेणाऱ्या नेत्यांनी केले पाटण खोऱ्याकडे दुर्लक्ष |
सातारा जिल्ह्यातील दोन पोलिस अधिकाऱ्यांसह ११ जणांना महासंचालक सन्मानचिन्ह जाहीर |
सांगलीच्या सिंचनासाठी मागणी झाली कमी |
पोटात चाकू भोसकून एकाला जिवे मारण्याचा प्रयत्न |
ठोसेघर येथे एकाचा डोक्यात दगड घालून निर्घृण खून |
उंच भरारी योजनेचे ब्रँन्ड ऍम्बेसिडर म्हणून मोनिका राठी तसेच सौरभ भोसले यांची निवड |
केट्स पॉईंट वरुन आत्महत्त्या केलेल्याचा मृतदेह दरीबाहेर काढण्यात यश |
शेंद्रे येथील तिहेरी अपघात प्रकरणी तिघांवर गुन्हा |
सुमारे अडीच लाखांच्या बांधकाम साहित्याची चोरी |
एकास मारहाण केल्याप्रकरणी पाच जणांवर गुन्हा |
सातार्यातून युवक बेपत्ता |
नागठाण्यात युवकाची आत्महत्या |
सांगलीच्या सिंचनासाठी मागणी झाली कमी |
पोटात चाकू भोसकून एकाला जिवे मारण्याचा प्रयत्न |
ठोसेघर येथे एकाचा डोक्यात दगड घालून निर्घृण खून |
उंच भरारी योजनेचे ब्रँन्ड ऍम्बेसिडर म्हणून मोनिका राठी तसेच सौरभ भोसले यांची निवड |
केट्स पॉईंट वरुन आत्महत्त्या केलेल्याचा मृतदेह दरीबाहेर काढण्यात यश |
शेंद्रे येथील तिहेरी अपघात प्रकरणी तिघांवर गुन्हा |
सुमारे अडीच लाखांच्या बांधकाम साहित्याची चोरी |
एकास मारहाण केल्याप्रकरणी पाच जणांवर गुन्हा |
सातार्यातून युवक बेपत्ता |
नागठाण्यात युवकाची आत्महत्या |
उदयनराजे यांना मतदान करून गादीचा सन्मान ठेवा |
जपानचे स्लिम लँडर तिसऱ्यांदा जागृत |
कोल्हापुरातील अंबाबाईच्या रथोत्सव |
छत्रपतींच्या वंशजांना जावळीचा स्वाभिमान सांगू नका |
माझ्याकडे विरोधकांच्या अनेक भानगडी |