सातारा : खेळत असताना घरात असणारी उवा मारण्याची पावडर खाल्ल्याने अत्यवस्थ झालेल्या अंदोरी (ता.खंडाळा) येथील शानू अविनाश सपकाळ (वय 4 वर्षे) आणि आरती अविनाश सपकाळ (वय अडीच वर्षे) या दोघींना उपचारासाठी गुरुवारी दुपारी जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. दुर्देवाने मात्र यातील आरतीचा मृत्यू झाला असून शानूची प्रकृती स्थिर आहे. दरम्यान, या सर्व घटनेमुळे सपकाळ कुटुंबियांवर दु:खाचा डोंगर कोसळला असून घटनेने हळहळ व्यक्त आहे.
याबाबत प्राथमिक माहिती अशी, अंदोरी (ता.खंडाळा) येथे आरती व शानू या बहिणी गुरुवारी सकाळी अकराच्या सुमारास घरात खेळत होत्या. खेळत असताना चुकून दोघींना उवा मारण्यासाठी वापरण्यात येणारी विषारी पावडरची पुडी सापडली. पुडी घेवून त्यातील असणारी पावडर दोघींनी खाल्ली. पावडर खाल्ल्यानंतर थोड्या वेळाने त्यांना उलट्यांचा त्रास होवू लागला. खेळणार्या दोघी अचानक उलट्या करु लागल्याने कुटुंबिय घाबरुन गेले.
पालकांनी मुलींकडे चौकशी केली असता शानूने खेळताना सापडलेल्या पुडीमधील पावडर खाल्ल्याची माहिती कुटुंबियांना दिली. तत्काळ या दोघींना लोणंद येथील खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. याठिकाणी उपचार सुरु असतानाच आरतीची प्रकृती अत्यवस्थ बनली. यामुळे सपकाळ कुटुंबियांनी त्यांना उपचारासाठी जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल केले. दोघींवर उपचार सुरु असताना मात्र आरतीचा मृत्यु झाला.
मुलीचा मृत्यू झाल्याचे कुटुंबियांना समजताच त्यांनी आक्रोश केला. या घटनेने सिव्हील रुग्णालयात हळहळ व्यक्त होत होती. दरम्यान, शानूची प्रकृती स्थिर असून तीच्यावर उपचार सुरु आहेत. याची प्राथमिक नोंद सातारा शहर पोलीस ठाण्यात झाली आहे.
सातारा जिल्ह्यात तब्बल पन्नास हजार नवमतदार |
स्व. यशवंतराव चव्हाण यांना भारतरत्न देण्याची मागणी पंतप्रधान मोदींकडे करणार |
कराड तालुक्याच्या विकासासाठी एकत्र प्रयत्न करूया: खा. उदयनराजे भोसले |
खोऱ्याने मते घेणाऱ्या नेत्यांनी केले पाटण खोऱ्याकडे दुर्लक्ष |
सातारा जिल्ह्यातील दोन पोलिस अधिकाऱ्यांसह ११ जणांना महासंचालक सन्मानचिन्ह जाहीर |
सांगलीच्या सिंचनासाठी मागणी झाली कमी |
पोटात चाकू भोसकून एकाला जिवे मारण्याचा प्रयत्न |
ठोसेघर येथे एकाचा डोक्यात दगड घालून निर्घृण खून |
उंच भरारी योजनेचे ब्रँन्ड ऍम्बेसिडर म्हणून मोनिका राठी तसेच सौरभ भोसले यांची निवड |
केट्स पॉईंट वरुन आत्महत्त्या केलेल्याचा मृतदेह दरीबाहेर काढण्यात यश |
शेंद्रे येथील तिहेरी अपघात प्रकरणी तिघांवर गुन्हा |
सुमारे अडीच लाखांच्या बांधकाम साहित्याची चोरी |
एकास मारहाण केल्याप्रकरणी पाच जणांवर गुन्हा |
सातार्यातून युवक बेपत्ता |
नागठाण्यात युवकाची आत्महत्या |
सांगलीच्या सिंचनासाठी मागणी झाली कमी |
पोटात चाकू भोसकून एकाला जिवे मारण्याचा प्रयत्न |
ठोसेघर येथे एकाचा डोक्यात दगड घालून निर्घृण खून |
उंच भरारी योजनेचे ब्रँन्ड ऍम्बेसिडर म्हणून मोनिका राठी तसेच सौरभ भोसले यांची निवड |
केट्स पॉईंट वरुन आत्महत्त्या केलेल्याचा मृतदेह दरीबाहेर काढण्यात यश |
शेंद्रे येथील तिहेरी अपघात प्रकरणी तिघांवर गुन्हा |
सुमारे अडीच लाखांच्या बांधकाम साहित्याची चोरी |
एकास मारहाण केल्याप्रकरणी पाच जणांवर गुन्हा |
सातार्यातून युवक बेपत्ता |
नागठाण्यात युवकाची आत्महत्या |
उदयनराजे यांना मतदान करून गादीचा सन्मान ठेवा |
जपानचे स्लिम लँडर तिसऱ्यांदा जागृत |
कोल्हापुरातील अंबाबाईच्या रथोत्सव |
छत्रपतींच्या वंशजांना जावळीचा स्वाभिमान सांगू नका |
माझ्याकडे विरोधकांच्या अनेक भानगडी |