सातारा : मोटरसायकल व चारचाकी वाहनाच्या अपघातातील तिघांच्या मृत्यूस कारणीभूत ठरल्याप्रकरणी तिघा वकीलांचा जामीन सत्र न्यायालयाने फेटाळला आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, दि. 24 फेब्रुवारी रोजी रात्री आंबेघरवाडी, ता. जावली येथे मेढा-महाबळेश्वर रस्त्यावर कुलदीप अशोक भोसले (रा. भोसलेमळा, सातारा) याने त्याच्या ताब्यातील असेंट गाडी भरधाव वेगात दारुच्या नशेत चालवून तसेच गाडी रस्त्याच्या रॉंग साईडला घेवून समोरुन येणार्या हिरो होंडा पॅशन मोटर सायकलला जोराची धडक दिली. या अपघातात मोटरसायकलवर ट्रिपल सीट असलेले प्रशांत कोंडीबा सावले, समीर बबन पार्टे, संजय दगडू सावले (सर्व रा. भामघर, ता. जावली) हे तिघेही मयत झाले आहेत. अपघातानंतर कुलदीप भोसले व त्याचे साथीदार रविंद्र रामदास चांगण, प्रशांत रामचंद्र लोंबटे व कारमधील आणखी एक इसम यांनी दारुच्या नशेत कारच्या बॉनेटवरील प्रेत रस्त्याच्या कडेला टाकून, संबंधित मोटरसायकल रस्त्याच्या मध्यभागी ठेवली व असेंट कार रोडपासून रानात लपवून पुरावा नष्ट करण्याचा प्रयत्न केला अशा तक्रारीवरुन मेढा पोलीस ठाण्यात संबंधित तिघांवर गुन्हा नोंद करण्यात आला होता.
या गुन्ह्यातील आरोपी हे गुन्ह्याच्या तपासकामी सापडत नव्हते. यानंतर या तिघांनी सातारा येथील सत्र न्यायालयातून दि. 26 फेब्रुवारी रोजी अँड इंटेरियम ऍन्टीसिपेटरी बेल घेतला होता. हे आरोपी तपासात काहीएक सहकार्य करीत नव्हते. त्यांच्या जामीनाबाबतची सुनावणी दि. 9 रोजी झाली असून मेढा पोलीस ठाण्याचे तपासी अधिकारी जीवन माने यांनी या जामीनाबाबत जोरदार हरकती घेतल्या.
सरकारी पक्षाच्यावतीने मिलिंद ओक यांनी युक्तीवाद केला. दोन्ही पक्षांचे म्हणणे ऐकून सत्र न्यायालयाने संबंधित तिघा वकीलांचा जामीन फेटाळला आहे. या गुन्ह्याचा तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक जीवन माने करीत आहेत.
सातारा जिल्ह्यात तब्बल पन्नास हजार नवमतदार |
स्व. यशवंतराव चव्हाण यांना भारतरत्न देण्याची मागणी पंतप्रधान मोदींकडे करणार |
कराड तालुक्याच्या विकासासाठी एकत्र प्रयत्न करूया: खा. उदयनराजे भोसले |
खोऱ्याने मते घेणाऱ्या नेत्यांनी केले पाटण खोऱ्याकडे दुर्लक्ष |
सातारा जिल्ह्यातील दोन पोलिस अधिकाऱ्यांसह ११ जणांना महासंचालक सन्मानचिन्ह जाहीर |
सांगलीच्या सिंचनासाठी मागणी झाली कमी |
पोटात चाकू भोसकून एकाला जिवे मारण्याचा प्रयत्न |
ठोसेघर येथे एकाचा डोक्यात दगड घालून निर्घृण खून |
उंच भरारी योजनेचे ब्रँन्ड ऍम्बेसिडर म्हणून मोनिका राठी तसेच सौरभ भोसले यांची निवड |
केट्स पॉईंट वरुन आत्महत्त्या केलेल्याचा मृतदेह दरीबाहेर काढण्यात यश |
शेंद्रे येथील तिहेरी अपघात प्रकरणी तिघांवर गुन्हा |
सुमारे अडीच लाखांच्या बांधकाम साहित्याची चोरी |
एकास मारहाण केल्याप्रकरणी पाच जणांवर गुन्हा |
सातार्यातून युवक बेपत्ता |
नागठाण्यात युवकाची आत्महत्या |
सांगलीच्या सिंचनासाठी मागणी झाली कमी |
पोटात चाकू भोसकून एकाला जिवे मारण्याचा प्रयत्न |
ठोसेघर येथे एकाचा डोक्यात दगड घालून निर्घृण खून |
उंच भरारी योजनेचे ब्रँन्ड ऍम्बेसिडर म्हणून मोनिका राठी तसेच सौरभ भोसले यांची निवड |
केट्स पॉईंट वरुन आत्महत्त्या केलेल्याचा मृतदेह दरीबाहेर काढण्यात यश |
शेंद्रे येथील तिहेरी अपघात प्रकरणी तिघांवर गुन्हा |
सुमारे अडीच लाखांच्या बांधकाम साहित्याची चोरी |
एकास मारहाण केल्याप्रकरणी पाच जणांवर गुन्हा |
सातार्यातून युवक बेपत्ता |
नागठाण्यात युवकाची आत्महत्या |
उदयनराजे यांना मतदान करून गादीचा सन्मान ठेवा |
जपानचे स्लिम लँडर तिसऱ्यांदा जागृत |
कोल्हापुरातील अंबाबाईच्या रथोत्सव |
छत्रपतींच्या वंशजांना जावळीचा स्वाभिमान सांगू नका |
माझ्याकडे विरोधकांच्या अनेक भानगडी |