02:05am | Mar 30, 2018 |
वाई : येथील धोम- बलकवडी विभागातील कनिष्ठ लिपिकांने दारूच्या नशेत शिवीगाळ करत शाखा अभियंता रविंद्र रामचंद्र शिंदे याच्यावर कोयत्याने हल्ला करून जखमी केल्याची खळबळाजनक घटना बुधवारी ( दि. २८ ) घडली आहे. विशेष कार्यालयीन कामकाज चालु असताना हा प्रकार घडला आहे. आरोप राजेद्र वसंत पगार ( रा. धोम कॉलनी, वाई ) हा घटनेनंतर पसार झाला आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, जखमी शाखा अभियंता शिंदे व आरोप पगार हे धोम- बलकवडी विभागात कार्यरत आहेत. बुधवारी दुपारच्या सुमारास पगार हा दारू पिवुन कार्यालयात आला होता. त्यावेळी अचानक त्याने आपल्या कामात व्यस्त असेलेले शिंदे यांना शिवीगाळ केली. यावेळी कार्यालयातील अन्य कर्मचा-यांनी समजावुन सांगत त्याला घरी पाठवले. मात्र पुन्हा चार वाजण्याच्या सुमारास तो कार्यालयात हातात कोयता घेऊन शिंदे यांना मारण्याच्या उद्देशाने आत घुसला व पुन्हा शिवीगाळ करत त्याच्या अंगावर धावुन जात वार करण्याचा प्रयत्न केला. मात्र शिंदे हे सावध असल्याने त्यांनी तो अंगावरील वार चुकवण्याचा प्रयत्न केला. यावेळी त्यांच्यात झटापटी झाली त्यावेळी पगार याने पुन्हा केलेला वार शिंदे याच्या मांडीवर बसला. हल्ला केल्यानंतर पगार हा घटनास्थळावरून पळुन गेला. जखमी शिंदे याच्यावर खाजगी रूग्णालयात उपचार सुरू आहेत. जखमी शिंदे यांनी स्वतः याबाबतची फिर्याद वाई पोलिस ठाण्यात दिली असुन पोलिसांनी आरोपी पगार याच्यावर मारहाणीचा गुन्हा दाखल केला आहे.
अधिकारी तपास पोलिस नाईक गोरख तांबडे हे करीत आहेत.
सातारा जिल्ह्यात तब्बल पन्नास हजार नवमतदार |
स्व. यशवंतराव चव्हाण यांना भारतरत्न देण्याची मागणी पंतप्रधान मोदींकडे करणार |
कराड तालुक्याच्या विकासासाठी एकत्र प्रयत्न करूया: खा. उदयनराजे भोसले |
खोऱ्याने मते घेणाऱ्या नेत्यांनी केले पाटण खोऱ्याकडे दुर्लक्ष |
सातारा जिल्ह्यातील दोन पोलिस अधिकाऱ्यांसह ११ जणांना महासंचालक सन्मानचिन्ह जाहीर |
सांगलीच्या सिंचनासाठी मागणी झाली कमी |
पोटात चाकू भोसकून एकाला जिवे मारण्याचा प्रयत्न |
ठोसेघर येथे एकाचा डोक्यात दगड घालून निर्घृण खून |
उंच भरारी योजनेचे ब्रँन्ड ऍम्बेसिडर म्हणून मोनिका राठी तसेच सौरभ भोसले यांची निवड |
केट्स पॉईंट वरुन आत्महत्त्या केलेल्याचा मृतदेह दरीबाहेर काढण्यात यश |
शेंद्रे येथील तिहेरी अपघात प्रकरणी तिघांवर गुन्हा |
सुमारे अडीच लाखांच्या बांधकाम साहित्याची चोरी |
एकास मारहाण केल्याप्रकरणी पाच जणांवर गुन्हा |
सातार्यातून युवक बेपत्ता |
नागठाण्यात युवकाची आत्महत्या |
सांगलीच्या सिंचनासाठी मागणी झाली कमी |
पोटात चाकू भोसकून एकाला जिवे मारण्याचा प्रयत्न |
ठोसेघर येथे एकाचा डोक्यात दगड घालून निर्घृण खून |
उंच भरारी योजनेचे ब्रँन्ड ऍम्बेसिडर म्हणून मोनिका राठी तसेच सौरभ भोसले यांची निवड |
केट्स पॉईंट वरुन आत्महत्त्या केलेल्याचा मृतदेह दरीबाहेर काढण्यात यश |
शेंद्रे येथील तिहेरी अपघात प्रकरणी तिघांवर गुन्हा |
सुमारे अडीच लाखांच्या बांधकाम साहित्याची चोरी |
एकास मारहाण केल्याप्रकरणी पाच जणांवर गुन्हा |
सातार्यातून युवक बेपत्ता |
नागठाण्यात युवकाची आत्महत्या |
उदयनराजे यांना मतदान करून गादीचा सन्मान ठेवा |
जपानचे स्लिम लँडर तिसऱ्यांदा जागृत |
कोल्हापुरातील अंबाबाईच्या रथोत्सव |
छत्रपतींच्या वंशजांना जावळीचा स्वाभिमान सांगू नका |
माझ्याकडे विरोधकांच्या अनेक भानगडी |