वाई : वाई तालुक्याच्या पश्चिम भागात गेल्या काही दिवसांपासून धुवाँधार पाऊस पडत आहे. त्यामुळे धोम धरणात पाण्याची आवक वाढली आहे. पावसाचा जोर कायम असल्याने धोम धरण 96 टक्के भरले आहे. पाण्याची आवक जास्त असल्याने धरण व्यवस्थापनाने गुरुवारी रात्री 10 हजार क्युसेकने पाण्याचा विसर्ग सुरू केला आहे.
यामुळे कृष्णा नदीची पाणीपातळी वाढली असून पाण्याने महागणपतीच्या चरणाला स्पर्श केला आहे. वाई तालुक्यात जुलै महिन्यात पावसाने जोरदार बॅटींग केल्यानंतर 15 दिवस जणू पाऊस गायबच झाला होता. मात्र, श्रावण महिना सुरू झाल्यानंतर तालुक्यात पावसाचा जोर पुन्हा वाढला आहे. तालुक्याच्या पश्चिम भागात असणार्या धोम धरणात या पावसामुळे सेकंदाला 6400 क्युसेक पाण्याची आवक होत आहे. धरणाची पाणीसाठवण क्षमता 13.50 टीएमसी असून सध्या धरण 13.03 टीएमसी भरले आहे. त्यामुळे गुरूवारी रात्रीपासूनच 2 क्युसेक्सने पाण्याचा विसर्ग सुरू करण्यात आला आहे.
कृष्णा नदीत पाण्याचा विसर्ग वाढल्याने कृष्णा नदीची पाणी पातळी वाढली आहे वाई शहरात हे पाणी महागणपतीच्या पायाशी आले आहे. या मोसमातील हा पहिला पूर असल्याने या पाण्यात पोहण्याचा अनेकांनी आनंद लुटला. नदीच्या पाणी पातळीत झपाट्याने वाढ झाल्याने नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. बलकवडी धरण पूर्ण क्षमतेने भरले असल्याने त्यातून धोम धरणात पाण्याचा विसर्ग सुरू आहे. मुसळधार पावसामुळे डोंगरातून पाणी मोठ्या प्रमाणात ओढे नाल्यात येत असल्यानेही नदीची पाणी पातळी वाढली आहे. धरणाचे तीन दरवाजे 1 तर दोन दरवाजे दीड फुटाने उचलण्यात आले आहे. यामधून 10 हजार क्युसेक पाण्याचा विसर्ग सुरू आहे.
सातारा जिल्ह्यात तब्बल पन्नास हजार नवमतदार |
स्व. यशवंतराव चव्हाण यांना भारतरत्न देण्याची मागणी पंतप्रधान मोदींकडे करणार |
कराड तालुक्याच्या विकासासाठी एकत्र प्रयत्न करूया: खा. उदयनराजे भोसले |
खोऱ्याने मते घेणाऱ्या नेत्यांनी केले पाटण खोऱ्याकडे दुर्लक्ष |
सातारा जिल्ह्यातील दोन पोलिस अधिकाऱ्यांसह ११ जणांना महासंचालक सन्मानचिन्ह जाहीर |
सांगलीच्या सिंचनासाठी मागणी झाली कमी |
पोटात चाकू भोसकून एकाला जिवे मारण्याचा प्रयत्न |
ठोसेघर येथे एकाचा डोक्यात दगड घालून निर्घृण खून |
उंच भरारी योजनेचे ब्रँन्ड ऍम्बेसिडर म्हणून मोनिका राठी तसेच सौरभ भोसले यांची निवड |
केट्स पॉईंट वरुन आत्महत्त्या केलेल्याचा मृतदेह दरीबाहेर काढण्यात यश |
शेंद्रे येथील तिहेरी अपघात प्रकरणी तिघांवर गुन्हा |
सुमारे अडीच लाखांच्या बांधकाम साहित्याची चोरी |
एकास मारहाण केल्याप्रकरणी पाच जणांवर गुन्हा |
सातार्यातून युवक बेपत्ता |
नागठाण्यात युवकाची आत्महत्या |
सांगलीच्या सिंचनासाठी मागणी झाली कमी |
पोटात चाकू भोसकून एकाला जिवे मारण्याचा प्रयत्न |
ठोसेघर येथे एकाचा डोक्यात दगड घालून निर्घृण खून |
उंच भरारी योजनेचे ब्रँन्ड ऍम्बेसिडर म्हणून मोनिका राठी तसेच सौरभ भोसले यांची निवड |
केट्स पॉईंट वरुन आत्महत्त्या केलेल्याचा मृतदेह दरीबाहेर काढण्यात यश |
शेंद्रे येथील तिहेरी अपघात प्रकरणी तिघांवर गुन्हा |
सुमारे अडीच लाखांच्या बांधकाम साहित्याची चोरी |
एकास मारहाण केल्याप्रकरणी पाच जणांवर गुन्हा |
सातार्यातून युवक बेपत्ता |
नागठाण्यात युवकाची आत्महत्या |
उदयनराजे यांना मतदान करून गादीचा सन्मान ठेवा |
जपानचे स्लिम लँडर तिसऱ्यांदा जागृत |
कोल्हापुरातील अंबाबाईच्या रथोत्सव |
छत्रपतींच्या वंशजांना जावळीचा स्वाभिमान सांगू नका |
माझ्याकडे विरोधकांच्या अनेक भानगडी |