कराड : शिराळा-सांगली-सातारा एस. टी. बसच्या महिला वाहकाचा विनयभंग केल्याप्रकरणी एकावर शहर पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद झाला आहे. संजय किसन आढाव (रा. विश्रामबाग, सांगली), असे त्याचे नाव आहे. दरम्यान, संशयितही एसटीचाच कर्मचारी असल्याचे महिला वाहकाने दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, शिराळा-सांगली-सातारा ही एसटी शुक्रवारी (दि. 16) सकाळी साडे दहाच्या सुमारास कराड डेपोतून सातारला जाण्यासाठी बाहेर पडली. कोल्हापूर नाक्यावर प्रवाशी घेतल्यानंतर एसटी सातारकडे मार्गस्थ झाली. पीडित महिला वाहक प्रवाशांना तिकिटे देत होत्या. एसटी कोयना नदीच्या पुलावर असताना संजय आढाव याने महिला वाहकाशी लज्जास्पद वर्तन करून तिचा विनयभंग केला. दरम्यान, संशयिताला तिकिटाबाबत विचारल्यानंतर त्याने स्टाफ म्हणून सांगितले. त्यावर महिला वाहकाने त्याच्याकडे ओळखपत्र आणि पगार स्लीप मागितली. ती त्याने दाखविली. त्यावेळी ओळखपत्रावरील नावावरून फिर्यादी महिला वाहकाने संजय किसन आढाव, असे संशयिताचे नाव फिर्यादीत नमूद केले आहे. याप्रकरणी विनायक आढाव याच्यावर गुन्हा नोंद झाला आहे.
सातारा जिल्ह्यात तब्बल पन्नास हजार नवमतदार |
स्व. यशवंतराव चव्हाण यांना भारतरत्न देण्याची मागणी पंतप्रधान मोदींकडे करणार |
कराड तालुक्याच्या विकासासाठी एकत्र प्रयत्न करूया: खा. उदयनराजे भोसले |
खोऱ्याने मते घेणाऱ्या नेत्यांनी केले पाटण खोऱ्याकडे दुर्लक्ष |
सातारा जिल्ह्यातील दोन पोलिस अधिकाऱ्यांसह ११ जणांना महासंचालक सन्मानचिन्ह जाहीर |
सांगलीच्या सिंचनासाठी मागणी झाली कमी |
पोटात चाकू भोसकून एकाला जिवे मारण्याचा प्रयत्न |
ठोसेघर येथे एकाचा डोक्यात दगड घालून निर्घृण खून |
उंच भरारी योजनेचे ब्रँन्ड ऍम्बेसिडर म्हणून मोनिका राठी तसेच सौरभ भोसले यांची निवड |
केट्स पॉईंट वरुन आत्महत्त्या केलेल्याचा मृतदेह दरीबाहेर काढण्यात यश |
शेंद्रे येथील तिहेरी अपघात प्रकरणी तिघांवर गुन्हा |
सुमारे अडीच लाखांच्या बांधकाम साहित्याची चोरी |
एकास मारहाण केल्याप्रकरणी पाच जणांवर गुन्हा |
सातार्यातून युवक बेपत्ता |
नागठाण्यात युवकाची आत्महत्या |

उदयनराजे यांना मतदान करून गादीचा सन्मान ठेवा |
जपानचे स्लिम लँडर तिसऱ्यांदा जागृत |
कोल्हापुरातील अंबाबाईच्या रथोत्सव |
छत्रपतींच्या वंशजांना जावळीचा स्वाभिमान सांगू नका |
माझ्याकडे विरोधकांच्या अनेक भानगडी |