कराड : बहुमत पाठीशी नसताना भाजपने मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. मात्र विश्वासदर्शक ठरावावेळी याबाबतचे चित्र स्पष्ट होईल. शिवसेना, राष्ट्रवादी, काँग्रेस यांचे सरकार सत्तेवर येईल, असा विश्वास राष्ट्रवादीचे अध्यक्ष खासदार शरद पवार यांनी आज सोमवारी कराड येथे पत्रकार परिषदेत बोलताना व्यक्त केला. दरम्यान, अजित पवार यांनी बंड का केले याची आपल्याला माहिती नसून त्यांच्या बंडामागे आपला हात नाही, असे स्पष्टीकरणही त्यांनी दिले.
स्वर्गीय यशवंतराव चव्हाण पुण्यतिथी निमित्त शरद पवार यांनी सोमवारी कराड येथे येऊन स्वर्गीय यशवंतराव चव्हाण यांच्या समाधीला अभिवादन केले. यानंतर वेणूताई चव्हाण स्मारक येथे यशवंतराव चव्हाण समितीची आढावा बैठक झाली. यानंतर शरद पवार यांनी पत्रकार परिषद घेतली. यावेळी खासदार श्रीनिवास पाटील, आमदार बाळासाहेब पाटील, राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष सुनील माने, सारंग पाटील यांच्यासह राष्ट्रवादीचे पदाधिकारी उपस्थित होते.
शरद पवार म्हणाले, की अजित पवार यांनी बंड का केले आपल्याला माहिती नसून त्यांच्या बंडामागे आपला हात नाही. आपण व्यक्तिशः त्यांच्याशी संपर्क केला नसल्याचे शरद पवार यांनी यावेळी सांगितले. सत्तेचा गैरवापर करून हवे तसे निर्णय भाजपने घेतले आहेत. तरी बहुमत सिद्ध करताना याबाबतचे चित्र स्पष्ट होईल. शिवसेना, राष्ट्रवादी, काँग्रेस यांचे सरकार सत्तेवर येईल, असा विश्वासही शरद पवार यांनी व्यक्त केला.
सातारा जिल्ह्यात तब्बल पन्नास हजार नवमतदार |
स्व. यशवंतराव चव्हाण यांना भारतरत्न देण्याची मागणी पंतप्रधान मोदींकडे करणार |
कराड तालुक्याच्या विकासासाठी एकत्र प्रयत्न करूया: खा. उदयनराजे भोसले |
खोऱ्याने मते घेणाऱ्या नेत्यांनी केले पाटण खोऱ्याकडे दुर्लक्ष |
सातारा जिल्ह्यातील दोन पोलिस अधिकाऱ्यांसह ११ जणांना महासंचालक सन्मानचिन्ह जाहीर |
सांगलीच्या सिंचनासाठी मागणी झाली कमी |
पोटात चाकू भोसकून एकाला जिवे मारण्याचा प्रयत्न |
ठोसेघर येथे एकाचा डोक्यात दगड घालून निर्घृण खून |
उंच भरारी योजनेचे ब्रँन्ड ऍम्बेसिडर म्हणून मोनिका राठी तसेच सौरभ भोसले यांची निवड |
केट्स पॉईंट वरुन आत्महत्त्या केलेल्याचा मृतदेह दरीबाहेर काढण्यात यश |
शेंद्रे येथील तिहेरी अपघात प्रकरणी तिघांवर गुन्हा |
सुमारे अडीच लाखांच्या बांधकाम साहित्याची चोरी |
एकास मारहाण केल्याप्रकरणी पाच जणांवर गुन्हा |
सातार्यातून युवक बेपत्ता |
नागठाण्यात युवकाची आत्महत्या |
सांगलीच्या सिंचनासाठी मागणी झाली कमी |
पोटात चाकू भोसकून एकाला जिवे मारण्याचा प्रयत्न |
ठोसेघर येथे एकाचा डोक्यात दगड घालून निर्घृण खून |
उंच भरारी योजनेचे ब्रँन्ड ऍम्बेसिडर म्हणून मोनिका राठी तसेच सौरभ भोसले यांची निवड |
केट्स पॉईंट वरुन आत्महत्त्या केलेल्याचा मृतदेह दरीबाहेर काढण्यात यश |
शेंद्रे येथील तिहेरी अपघात प्रकरणी तिघांवर गुन्हा |
सुमारे अडीच लाखांच्या बांधकाम साहित्याची चोरी |
एकास मारहाण केल्याप्रकरणी पाच जणांवर गुन्हा |
सातार्यातून युवक बेपत्ता |
नागठाण्यात युवकाची आत्महत्या |
उदयनराजे यांना मतदान करून गादीचा सन्मान ठेवा |
जपानचे स्लिम लँडर तिसऱ्यांदा जागृत |
कोल्हापुरातील अंबाबाईच्या रथोत्सव |
छत्रपतींच्या वंशजांना जावळीचा स्वाभिमान सांगू नका |
माझ्याकडे विरोधकांच्या अनेक भानगडी |