01:45am | Sep 21, 2018 |
कराड : राजेंद्रसिंह यादव हे ताकदवान आहेत त्यांना आता भाजप पक्षाच्या माध्यामातून आणखी ताकद दिली जाईल, अशी ग्वाही राज्याचे महसूलमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांनी दिली.
येथील जनशक्ती आघाडीचे नेते, माजी उपनगराध्यक्ष राजेंद्रसिंह यादव यांच्या वाढदिवसानिमित्त हेड पोस्टाजवळ आयोजित भव्य युवा मेळाव्यात बोलत होते. अभिनेते डॉ. अमोल कोल्हे, राज्यसरकार सहकार परिषदेचे अध्यक्ष शेखर चरेगावकर, विठ्ठल रूक्मिणी मंदिरे समितीचे अध्यक्ष डॉ. अतुल भोसले, युवा नेते सम्राट महाडिक, रयत शेतकरी संघटनेचे सागर खोत, नगराध्यक्षा रोहिणी शिंदे, उपनगराध्यक्ष जयवंतराव पाटील, भाजपाचे जिल्हाध्यक्ष विक्रम पावसकर, सचिन नलवडे, मसुद्दीक आंबेकरी, डॉ.प्राची पाटील यांच्यासह मान्यवरांची उपस्थिती होती.
चंद्रकांतदादा म्हणाले की, प्रकृती बरी नसली तरी मुख्यमंत्री देवेंंद्र फडवणवीस यांच्या आग्रहाने आपण यादव यांच्या वाढदिवसासाठी उपस्थित राहिलो आहे. अनेक जण प्रंचड खर्च कयन वाढदिवस साजरे करतात. मात्र यादव यांनी सामाजिक बांधिलकीचे भान ठेवून विविध उपक्रम राबवले आहेत. गेल्या तीन वर्षापासून आपला आणि त्यांचा परिचय आहे. गेल्या दोन ते तीन महिन्यात तो आणखी वाढला. मी त्यांना भाजपामध्ये या. तुम्ही आलात तर कराडच्या विकासासाठी खूप निधी मिळेेल, असे सांगितले होते. त्यावर त्यांनी व जयवंतराव पाटीेल यांनी खुप विचार करून निर्णय घेतला. नुकताच जयवंतराव पाटील यांच्या निवासस्थानी मी गेलो होतो. त्यावेळी त्यांनी भाजपामध्ये येण्याच्या निर्णय घेेतला आहे. त्यावेळी त्यांनी भरपूर ताकद दिली जाईल.
शेखर चरेगावकर म्हणाले, यादव यांच्या वाढदिवसाला होणारी गर्दी पाहता पुढील वर्षी शिवाजी स्टेडीयममध्ये हा मेळावा घ्यावा. मुख्यमंत्र्यांनी त्यांना शुभेच्छा दिल्या असून यादव यांचा भाजपप्रवेश ही औपचारिकता राहिली आहे. त्यामुळे भविष्यात कराडात वेगळी राजकीय वाटचल सुरू होईल. यादव यांच्यावर आमचे मित्र म्हणून व राजकीय प्रेम आहे. भाजप त्यांना वेगळा मानत नाही. स्व. यशवंतराव चव्हाण यांचा वारसा जपण्यासाठी धडाधडीच्या व्यक्तिमत्वाची गरज होती. भाजपाची ती उणीव राजेंद्रसिंह व जयवंतराव पाटील यांनी भरून काढली आहे.
विक्रम पावसकर म्हणाले की, राजेंद्रसिंह यांना भाजप सरकारकडून त्यांना ताकद दिली जाणार आहे. आता त्यांनी लवकरात लवकर निर्णय घेऊन पक्षात सक्रिय व्हावे.
डॉ. अतुल भोसले म्हणाले, परकियांकडून वार झाला तर आपण समर्थपणे तोंड देतो. राजेंदसिंह यादव व मित्रपरिवाराने वार करणारे आपल्यातील फितुर ओळखून निर्णय घेतला आहे. त्यांनी यापुढे कराडसाठी फक्त निधीचा मागणी करावी. आम्ही मुख्यमंत्र्यांच्या माध्यमातून तो मिळवून देऊ. यादव यांच्यासारख्या कर्तृत्वान व्यक्तिमत्वाला राज्यपातळीवर संधी देण्याबाबतही सरकार विचार करेल.
अभिनेते अमोल कोल्हे म्हणाले की, खासदार उदयनराजे भोसले यांनी सांगितल्याने दुसर्यावेळी या कार्यक्रमास मी आलो आहे. यादव यांनी खुली ऑफर अनेकांनी दिली आहे. मात्र त्यांनी स्वतःच एक सत्तास्थान म्हणून विकसित व्हावे. इतके मोठे व्हावे की, पदे त्यांच्यासमोर झुकतील. नगराध्यक्षा रोहिणी शिंदे, सचिन नलवडे, सम्राट महाडिक, सागर खोत यांची भाषणे झाली.
सातारा जिल्ह्यात तब्बल पन्नास हजार नवमतदार |
स्व. यशवंतराव चव्हाण यांना भारतरत्न देण्याची मागणी पंतप्रधान मोदींकडे करणार |
कराड तालुक्याच्या विकासासाठी एकत्र प्रयत्न करूया: खा. उदयनराजे भोसले |
खोऱ्याने मते घेणाऱ्या नेत्यांनी केले पाटण खोऱ्याकडे दुर्लक्ष |
सातारा जिल्ह्यातील दोन पोलिस अधिकाऱ्यांसह ११ जणांना महासंचालक सन्मानचिन्ह जाहीर |
सांगलीच्या सिंचनासाठी मागणी झाली कमी |
पोटात चाकू भोसकून एकाला जिवे मारण्याचा प्रयत्न |
ठोसेघर येथे एकाचा डोक्यात दगड घालून निर्घृण खून |
उंच भरारी योजनेचे ब्रँन्ड ऍम्बेसिडर म्हणून मोनिका राठी तसेच सौरभ भोसले यांची निवड |
केट्स पॉईंट वरुन आत्महत्त्या केलेल्याचा मृतदेह दरीबाहेर काढण्यात यश |
शेंद्रे येथील तिहेरी अपघात प्रकरणी तिघांवर गुन्हा |
सुमारे अडीच लाखांच्या बांधकाम साहित्याची चोरी |
एकास मारहाण केल्याप्रकरणी पाच जणांवर गुन्हा |
सातार्यातून युवक बेपत्ता |
नागठाण्यात युवकाची आत्महत्या |
सांगलीच्या सिंचनासाठी मागणी झाली कमी |
पोटात चाकू भोसकून एकाला जिवे मारण्याचा प्रयत्न |
ठोसेघर येथे एकाचा डोक्यात दगड घालून निर्घृण खून |
उंच भरारी योजनेचे ब्रँन्ड ऍम्बेसिडर म्हणून मोनिका राठी तसेच सौरभ भोसले यांची निवड |
केट्स पॉईंट वरुन आत्महत्त्या केलेल्याचा मृतदेह दरीबाहेर काढण्यात यश |
शेंद्रे येथील तिहेरी अपघात प्रकरणी तिघांवर गुन्हा |
सुमारे अडीच लाखांच्या बांधकाम साहित्याची चोरी |
एकास मारहाण केल्याप्रकरणी पाच जणांवर गुन्हा |
सातार्यातून युवक बेपत्ता |
नागठाण्यात युवकाची आत्महत्या |
उदयनराजे यांना मतदान करून गादीचा सन्मान ठेवा |
जपानचे स्लिम लँडर तिसऱ्यांदा जागृत |
कोल्हापुरातील अंबाबाईच्या रथोत्सव |
छत्रपतींच्या वंशजांना जावळीचा स्वाभिमान सांगू नका |
माझ्याकडे विरोधकांच्या अनेक भानगडी |